निर्यातीची सुवर्णसंधी
Golden opportunity of export
जगाच्या बाजारपेठेत
भारतीय उत्पादनांना मागणी,
निर्यात करून उत्पादने
पोहचवा जागतिक स्थानी...
२०४७ पर्यंत आत्मनिर्भर
भारताची संकल्पना,
निर्यातीची मोठी सुवर्णसंधी
जाणून घ्या सरकारी योजना...
निर्यात उद्योगामध्ये
मिळते विदेशी चलन,
तुमच्या उत्पादनांना मिळते
जागतिक बाजारपेठेत स्थान...
बाजारातील ट्रेंड्स
लक्षात घ्या ग्राहकाची आवड,
मग करा तुम्ही सुयोग्य
निर्यातदार देशाची निवड...
निर्यातीसाठी आपल्याला
करावी निर्यातदार नोंदणी,
निर्यातीचे विविध टप्पे समजून
प्रशिक्षणाने व्हा तुम्ही ज्ञानी...
विविध सरकारी योजनेतून
अर्थसहाय्य तुम्ही मिळवा,
मार्गदर्शन आणि संसाधनाने
निर्यातीचा मागोवा घ्यावा...
जागतिक प्रदर्शनांमध्ये
आपले उत्पादन करावे सादर,
संभाव्य ग्राहकांच्या संवादामुळे
ज्ञान मिळते निर्यात प्रक्रियेवर...
योजना व सततच्या प्रयत्नामुळे
यशस्वी व्हा लक्ष्य निर्यातदार,
आपल्या उत्पादनांना न्यावे
आंतरराष्ट्रीय जागतिक स्तरावर...
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment