शेतीची पुस्तकं
Agricultural Books
शेतकरीदादा आता जावा शेती पुस्तकांच्या गावा,
शेतात नगदी पिकांबरोबर आता ज्ञानज्योत लावा...
पुस्तकात असते नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती,
प्रगतीशील शेतकरी हा मार्ग जरूर अनुसरती...
पुस्तकांमुळे कळतात पिकांच्या संकरित जाती,
त्यावरूनच शेतकरी प्रमाणफवारणीचे डोस देती...
पुस्तकं शिकवतात विकासाच्या प्रगतीचा मार्ग,
करू नका वाचण्याचा कंटाळा,भरभरून देईल निसर्ग...
दुसरं काही वाचण्यापेक्षा वाचा पुस्तकं शेतीची,
याच्या माहितीमुळे खुलतील दारे तुमच्या प्रगतीची...
आपल्या व्यवसायासाठी पुस्तकं करतात मार्गदर्शन,
जाणून घ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथेचे नंदनवन...
पुस्तकांच्या वाचण्याने व्हाल अनुभवी ज्ञानसंपन्न,
कुठच्या कुठे निघून जाईल तुमची अवस्था विपन्न...
तुम्ही म्हणाल पुस्तकानं होणार नाही शेती,
सर्व शेतकरी याच्या ज्ञानाचे गोडवे गाती...
आधी वाचा मग करा, शिकवतात पुस्तकं,
अनुभवाच्या कसोटीवर पळतील तुमची चाकं...
दीपू म्हणे करू नका आळस पुस्तकं घेण्या-देण्याचा,
शेतकरीदादा हाच एक मार्ग सुखाने जगण्याचा...
© दीपक केदू अहिरे, नासिक
deepakahire1973@gmail.com
No comments:
Post a Comment