मनाच्या एका कोपऱ्यात
मनाच्या एका कोपऱ्यात, आपले स्थान आहे अढळ,
निश्चित श्रध्दा आपल्याप्रती,तुमचं स्थान राहिल अटल
मनाच्या एका कोपऱ्यात,हळवा काेपरा आपल्यासाठी,
आपण झालाेय एकजीव,प्राणपणाने लढा देण्यासाठी
मनाच्या एका कोपऱ्यात, साहित्य तुमचं बहारदार,
वाचनीय चेतना पेटवणारं, झेलताेय संघर्षाचे हे वार
मनाच्या एका कोपऱ्यात, धृवतार्याप्रमाणे तुमचं स्थान,
तुमच्याबाबत ऐकण्यासाठी माझे आतुर झालेय कान
© दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा