जागतिक व्याघ्र दिन
World Tiger Day
जागतिक व्याघ्र दिन
२९ जुलै होतो साजरा,
खूप होते वाघांची शिकार
म्हणून वाघांचे जतन करा...
जागतिकस्तरावर वाघांच्या संख्येत
होत आहे चिंताजनक घट,
व्याघ्र संवर्धनाची व्हावी जनजागृती
वाढावा त्यांचा बहुसंख्येने पट...
वन्यजीवांच्या अवैध तस्करीमुळे
वाघांना गंभीर धोक्याचा सामना,
नामशेष होणारी ही जात
वाघांच्या भवितव्यासाठी करा कामना...
व्याघ्र संरक्षणातील संधी आणि आव्हाने
जैव विविधतेचे करा जतन,
वन्यजीव गुन्हेगारीला घाला आळा
व्याघ्र अधिवास वाढण्यासाठी करा चिंतन...
© दीपक केदू अहिरे, नाशिक
deepakahire1973@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा