name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): जागतिक हिपॅटायटीस दिवस (World Hepatitis Day)

जागतिक हिपॅटायटीस दिवस (World Hepatitis Day)

 जागतिक हिपॅटायटीस दिवस
World Hepatitis Day


Jagtik hepatatis divas



जागतिक हिपेटायटिस दिनानिमित्त अपेक्स वेलनेस हॉस्पिटल गोविंदनगर, नाशिक येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे मा. सिव्हिल सर्जन डॉ. चारुदत्त शिंदे हे उपस्थित होते.


Jagtik hepatitis day
डॉ. नितिन बोरसे 



यावेळी बोलतांना अपेक्स वेलनेस हॉस्पिटलचे संचालक डॉ नितीन बोरसे यांनी हिपेटायटिस बद्दल बोलतांना लिव्हर हा आपल्या शरीरातील दुसरा सर्वात मोठा अवयव असून. आपल्या आरोग्यासाठी त्याचे अत्यंत महत्वाचे कार्य असते. पचनक्रिया पूर्ण करणे,जीवनावश्यक पोषक द्रव्याचे साठवण करणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, रक्त शुद्धीकरण करणे ही काही यकृताची प्रमुख कार्ये आहेत. विषाणू संसर्ग, खाण्याच्या सवयी, अल्कोहोलचे सेवन अनियंत्रित मधुमेह, व्यायामाचा अभाव, सदोष जीवनशैली, दूषित उपकरणांनी टॅटू काढणे  याव्यतिरिक्त, संक्रमित रक्ताच्या संपर्कात आलेल्याना  हिपॅटायटीस बी आणि सी होण्याचा धोका जास्त असतो

 दर ३० सेकंदाला हिपॅटायटीसशी संबंधित आजाराने एखाद्याचा मृत्यू होतोतसेच संसर्ग झाल्यावर हळूहळू हा आजार शरीराच्या सर्व अवयवांवर परिणाम करू लागतो


जागतिक हिपॅटायटीस दिवस का साजरा केला जातो?


हिपॅटायटीस ए, बी, सी, डी आणि ई या संसर्गजन्य रोगांसह हिपॅटायटीसबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी दरवर्षी २८ जुलै रोजी जागतिक हिपॅटायटीस दिवस साजरा केला जातो १९६० च्या दशकात हिपॅटायटीस बी विषाणूचा (HBV) शोध लावणारे आणि त्यासाठी निदान चाचणी आणि लस विकसित करणारे नोबेल पारितोषिक विजेते डॉ. बारूच ब्लमबर्ग यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही तारीख निवडण्यात आली होती. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक हिपॅटायटीस मुक्त मोहिमेद्वारे करण्यात आली.

जागतिक हिपॅटायटीस दिवस २०२४ ची थीम

"इट्स टाइम फॉर अॅक्शन (It’s Time for Action,)" अशी आहे. हे जागतिक स्तरावर हिपॅटायटीस आजाराने होणारे मृत्यू व त्याचे आर्थिक व सामाजिक परिणामाची व्याप्ती पाहता या करिता आवश्यक उपायांची नितांत गरज आहे. 

हिपॅटायटीस म्हणजे काय?

या आजारात यकृताला सूज येते त्याची लक्षणे वेळीच ओळखून उपचार करणे गरजेचे ठरते

हिपॅटायटीसचे अनेक प्रकार आहेत हिपॅटायटीस ए व इ हे सहजपणे आढळणारे प्रकार असून यांची लागण दूषित अन्न दूषित पाण्याचे सेवनामुळे होते त्यामुळे हातांची स्वच्छता व आहाराबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे.

हिपॅटायटीस बी सर्वात धोकादायक असून यामुळे सर्वप्रथम लिव्हरला सूज येऊन पेशी खराब होण्यास सुरुवात होते आणि हळूहळू त्यामुळे शरीराच्या सर्व अवयवांवर परिणाम होण्यास सुरुवात होते वेळीच वैद्यकीय मदत न मिळाल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो 

हिपॅटायटीसची लक्षणे आणि उपचार

हिपॅटायटीस बी आणि सी च्या लक्षणांमध्ये थकवा, कावीळ, गडद लघवी, पोटात दुखणे, मळमळ आणि उलट्या यांचा समावेश असू शकतो. दीर्घकालीन संसर्गामुळे गंभीर दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात, जसे की सिऱ्होसिस आणि यकृताचा कर्करोग. हिपॅटायटीस बी आणि सी साठी अत्यंत परिणामकारक उपचार उपलब्ध असून अद्यावत उपचारांनी या आजारावर पूर्ण नियंत्रण आणि गुंतागुंत टाळणे शक्य झाले आहे, भारत सरकारने व्हायरल हेपेटायटीसचा सामना करण्यासाठी २०१८ मध्ये राष्ट्रीय व्हायरल हेपेटायटीस नियंत्रण कार्यक्रम (NVHCP) सुरू केला आहे .

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी काय करावे 

हिपॅटायटीस बी संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हे सर्वात महत्वाचे साधन आहे. जन्माच्या वेळी सार्वत्रिक HBV डोस राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकात समाविष्ट केला गेला आहे परंतु त्याची व्यापक अंमलबजावणी आवश्यक आहे.

हिपॅटायटीस सी साठी कोणतीही लस नसली तरी, धोका असलेल्या व्यक्तींची तपासणी केल्यास संसर्ग लवकर ओळखण्यात आणि वेळेवर उपचार प्रदान करण्यात मदत होऊ शकते. निर्जंतुकीकरण सुया वापरा, सुरक्षित लैंगिक संबंध आणि रेझर आणि टूथब्रश यांसारख्या वस्तू आपसात सामायिक करणे टाळणे. सुरक्षित रक्तपेढी, डायलिसिस, इंजेक्शन्स आणि बायोमेडिकल कचरा विल्हेवाट लावणे देखील आवश्यक ठरते .

आहार :

स्वच्छ पाणी व संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. फास्टफूड, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खा. फळे, भाज्या, तृणधान्ये आणि मोड आलेली धान्ये यांचा आहारात समावेश करा.

वजन :

वाढलेले वजन यकृतावर ताण निर्माण करते. उंचीच्या प्रमाणात संतुलित वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा.

व्यायाम :

नियमित व्यायाम करा. व्यायामामुळे शरीरातील चरबी कमी होते आणि रक्तप्रवाहात सुधारणा होते ज्याचा यकृताला फायदा होतो.

व्यसन टाळणे :

धुम्रपान आणि मद्यपान यकृताकरिता अत्यंत धोकादायक आहे  लिव्हरच्या आजारांचे एक प्रमुख कारण असल्याने यांचे सेवन पूर्णपणे टाळणे आवश्यक ठरते  

औषधांचा वापर : 

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नये. काही औषधांच्या अनावश्यक सेवनाने  यकृतावर दुष्परिणाम होऊ शकतात.

आपले यकृत निरोगी ठेवा आणि निरामय जीवन जगा!

लेखक

डॉ. नितीन बोरसे 

(लेखक हे वरिष्ठ तज्ञ  पोट व लिव्हर, असून गेल्या 22 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात सर्वपरिचित आहेत, अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थांवर मानद सल्लागार, नाशिक गॅस्ट्रोइन्टेरोलॉजी सोसायटीचे अध्यक्ष असून गोविंद नगर नाशिक येथील अपेक्स वेलनेस सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक आहेत)

संकलन

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...