सर्वोच्च एनएचबी रेटिंग मिळवणारी एकमेव आंब्याची श्री हरी नर्सरी
Shree Hari Nursery is the only mango nursery to achieve the highest NHB rating
Shree Hari Nursery श्री हरी नर्सरीची सुरुवात गुजरातच्या सुरत जिल्ह्याच्या मांडवी तालुक्याच्या अरेथ गावी २०१४ या वर्षी करण्यात आली. या रोपवाटिकेची संकल्पना आणि प्रेरणा संचालक प्रकाशभाईजी यांचे वडील श्री नागजीभाई वल्लभभाई धाडूक यांच्याकडून मिळाली.
मल्टीरूटस्टॉक आंब्याची विविध जातीची रोपे
श्री हरी नर्सरीत आंब्याची विविध जातीची खात्रीशीर रोपे मिळतात. त्यात गीर केसर, राजापुरी, लंगड़ा, दशहेरी, हापूस, तोतापुरी, बारमासी, जमादार, चौसा, सबजा, सालगट, आम्रपाली, सरदार, पचतीयो, रत्ना, नीलफान्सो, वनराज, बदाम, दादाम, एटीएम, दूधपेंदो, लालबाग, मालगोबो, सिंदुरी, मल्लीका, सुवर्णरेखा, पायरी, सोनपरी आणि केसरचे मल्टीरूटस्टॉक आंब्याची रोपे मिळतात.
आंब्याच्या विविध ३२ जाती उपलब्ध
सध्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेले रणतळे गाव, बडोदा आणि गांधीनगर येथे श्री हरी नर्सरीचे स्वतःचे विक्री केंद्र आहेत. श्री हरी नर्सरीमध्ये आंब्याच्या विविध ३२ जाती उपलब्ध आहेत, आंबा कटिंग्ज १ ते ५ वर्षांपर्यंत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. या ठिकाणचे विशेष मल्टीरूट रूटस्टॉक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अत्यंत उत्कृष्ट आणि क्रांतिकारी परिणाम देते. श्री हरी नर्सरीमध्ये ४-५ फुटांपासून ते १५ फुटांपर्यंतच्या आंब्याचे कलम मिळतात.
सेंद्रिय उपचारांची माहिती असलेले कॅलेंडर
श्री हरी नर्सरीमध्ये योग्य नियोजन आणि संशोधनाने आंब्याची रोपे तयार केली जातात. येथे शेतकऱ्यांना आंबा बागेसाठी प्रशिक्षित आणि अनुभवी कर्मचारी आणि मजूरही पुरवले जातात. जे शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आंब्याच्या बागा तयार करून देण्याची सेवा देतात. श्री हरी नर्सरीमधून आंब्याची रोपे खरेदी बरोबरच तुम्हाला आंब्याची काळजी, खते आणि औषधांचा वापर आणि मासिक सेंद्रिय उपचारांची संपूर्ण माहिती असलेले १२ महिन्यांचे कॅलेंडर दिले जाते. याव्यतिरिक्त फोनवर सतत मार्गदर्शन देखील प्रदान करतो.
रासायनिक मुक्त शेतीला प्रोत्साहन
श्री हरी नर्सरी ग्रीनसर्ट एनपीओपी (नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑरगॅनिक प्रोडक्शन) च्या मानकांनुसार प्रमाणित आहे. श्री हरी नर्सरीची मदर प्लांट रासायनिक मुक्त आणि सेंद्रिय शेतीसाठी समर्पित आहे. ही मानके गाय-आधारित नैसर्गिक शेतीच्या तत्त्वांवर आहेत आणि रासायनिक मुक्त शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्रदान केली जातात.
रोपे बदलून देण्याची हमी
श्री हरी नर्सरीत ग्राहकाने कोणत्याही आंबा जातीचे रोपे घेतल्यास दोन महिन्याच्या आत तुमची कोणतीही झाडे मेली तर ही नर्सरी शेतकऱ्यांना १००% बदलून देण्याची हमी देतात. यासाठी जवळच्या आउटलेटला भेट देऊन आणि व्हॉट्सॲपद्वारे फोटो आणि बिल सबमिट करून ते विनामूल्य बदलून घेऊ शकतात. उदाहरण द्यायचे झाले तर तुम्ही ५०० रोपे लावली आणि ती वाहतूक किंवा मजुरीच्या चुकांमुळे मरण पावली तर तुम्ही त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय परत मिळवू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही आणि त्यांची फळबाग सुरक्षित राहते.
विविध सेंद्रिय घटकांचा प्रभावी उपचार
श्री हरी नर्सरीत गाईचे शेण, गोमूत्र, दूध, दही, ताक आणि लोणी यांसारख्या विविध घटकांचा वापर करून गाय -आधारित नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देते. त्यांच्यापासून द्रव आणि अर्क तयार केले जातात, ज्याचा वापर विविध वनस्पतींच्या मिश्रणासह फॉर्म्युलेशन बनवून कमी खर्चात कोणत्याही रोगावर उपचार केले जातात परिणामी, नीमस्त्र, अग्नी अस्त्र, गौ नेम लिप यांसारखे प्रभावी उपचार उपलब्ध आहेत, जे रोग आणि कीटकांपासून आंब्याच्या झाडांचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात.
आंबा लागवडीची नैसर्गिक पद्धत
श्री हरी नर्सरीमध्ये शेतकऱ्यांना, विशेषत: रासायनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे नैसर्गिक आंबा लागवड करण्यासाठी नैसर्गिक शेती पद्धती उपलब्ध करून देतो. त्यांना गाय-आधारित नैसर्गिक शेती पद्धतींद्वारे समस्या सोडवण्याची माहिती प्रदान करतो. या संदर्भात आम्ही शेतकऱ्यांना एक कॅलेंडर प्रदान करतो ज्यामध्ये महिन्यानुसार बागेची काळजी आणि उपचार सूचना समाविष्ट आहेत. या दिनदर्शिकेद्वारे शेतकरी त्यांच्या बागेची प्रभावी काळजी घेऊ शकतात आणि नैसर्गिक पद्धतीने आंब्याचे चांगले पीक घेऊ शकतात.
सर्वस्तरीय ग्राहकांचा चांगला प्रतिसाद
श्री हरी नर्सरीचे ग्राहक सर्व स्तरातून आहेत. शेतकरी, व्यावसायिक, वैद्यकीय, वकीली, दुकानदार अशा क्षेत्रातील त्यांचे ग्राहक डॉ. प्रवीण पाटिल, दर्शन दवे, अल्पेश पटेल, किशन बारवलिया, मस्तान पटेल इ. असून श्री हरी नर्सरीच्या रोपविषयीचा त्यांचा अनुभव चांगला असून तशा प्रतिक्रियाही त्यांनी समाजमाध्यमावर दिल्या आहेत.
दरवर्षी २ लाख आंब्याची तयार रोपे
श्री हरी नर्सरीची वार्षिक उलाढाल ५ कोटी रुपये आहे. दरवर्षी २ लाख आंब्याची रोपे तयार केली जातात. त्यांचा मुख्य प्रयत्न अधिकाधिक शेतकऱ्यांना गाय-आधारित शेती, सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीशी जोडण्याचा आहे, जेणेकरून ते शाश्वत आणि फायदेशीर शेती पद्धतींचा अवलंब करू शकतील.
एनएचबीच्या मानकांनुसार सर्वोच्च रेटिंग
श्री हरी नर्सरी ही एनएचबी.(राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ)ची थ्री-स्टार रेटिंग मिळवणारी नर्सरी आहे. याचा अर्थ ही रोपवाटिका भारतातील फलोत्पादन विभागाकडून प्रमाणित आहे आणि तिला एनएचबीच्या मानकांनुसार सर्वोच्च रेटिंग प्राप्त झाली आहे. एनएचबी भारतातील प्रमाणित नर्सरींना त्यांच्या कामगिरीनुसार रेट करते, थ्री-स्टार रेटिंग सर्वोच्च मानले जाते. हे थ्री-स्टार रेटिंग मिळवणारी श्री हरी नर्सरी ही गुजरात आणि महाराष्ट्रातील एकमेव नर्सरी आहे. संपूर्ण भारतातील मोजक्याच नर्सरींना एनएचबीकडून हे 3-स्टार रेटिंग मिळते. हे रेटिंग अशा नर्सरींना दिले जाते ज्यांचे १००% एनएचबीच्या सर्व नियमांचे पालन होते आणि परिणामी त्यांना हे सर्वोच्च रेटिंग मिळते.
७-८ फुटी ते दोन वर्ष वयाची आंब्याची रोपे
केसर जातीच्या मल्टीरूटस्टॉक आंब्याची सहा फुटी उंचीची एक वर्ष वयाची रोपे ६५० रुपयास मिळते याला एक वर्षानंतर फळे येण्यास सुरुवात होते. त्याच प्रकारातील ७ ते ८ फुटी, एक वर्ष वयाची रोपे १००० रुपयाला मिळतात. मल्टीरूटस्टॉक दुसऱ्या प्रकारातील दोन वर्ष वयाची आंब्याची १२ फुटी रोप १५०० रुपयास असून तसेच मोठ्या प्रकारातील मल्टीरूटस्टॉक २ वर्ष वयाची, १२ फुटी रोप २००० रुपयांना विक्री होत असल्याचे श्री हरी नर्सरीचे प्रकाशभाई यांनी सांगितले.
कलमी रोपे पुरवणारी श्री हरी नर्सरीची ख्याती
मल्टीरूटस्टॉक-४ प्रकारातील २ वर्ष वयाचे १२ फुटी रोप २५०० रुपयांना विक्री करत असून याला पुढच्याच हंगामात फळे येतात अशी माहिती प्रकाशभाई यांनी दिली. गीर केसर आंब्याची ५ फूट उंचीची, एक वर्ष वयाची रोपे २२५ रुपयास विक्रीसाठी असून या रोपाला तीन वर्षानंतर फळे येतात. दुसऱ्या प्रकारात साडेपाच फूट उंचीची, एक वर्ष वयाची, तीन वर्षानंतर फळे येणारी रोपे ३०० रुपयात प्रति रोप विक्री होत असल्याचे प्रकाशभाई यांनी सांगितले. त्यांच्याकडे आंब्याच्या उंचीनुसार, झाडाच्या वयानुसार, जातीनुसार प्रतिरोपाचे दर आकारण्यात येतात. आंब्याच्या सर्व प्रकारच्या कलमी जातीची रोपे पुरवणारी श्री हरी नर्सरीची ख्याती आहे.
अधिक माहितीसाठी श्री हरी नर्सरी, ब्लॉक नं.११९, मु.पो.अरेथ,मेन कैनाल,अरेथ बोधन रोड, ता.मांडवी, जि.सुरत, मोबाईल नं- ६३५५८९००३५ / ९७२४४७००४४ /७८६२८८३३८१ ईमेल- shreeharinursary007@gmail.com वेब : https://shreeharinursery.com यावर संपर्क करावा.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment