बारा बलुतेदाराचं आमलेवाडी गाव
Amlewadi village of Bara Balutedar
आमलेवाडी
बारा बलुतेदाराचं गाव,
डोळ्यासमोर तरळते
"साधना" मिसळचे नाव...
छोटेखानी चुलीवरची
मिसळ साधना,
आमले परिवाराची
ही मूळ संकल्पना...
आमलेवाडीत ताज्या करा
गावच्या आठवणी,
महाराष्ट्राची लोकसंस्कृती
बघण्यासाठी या...ह्या ठिकाणी...
येथे आहे गावातील
ग्रामपंचायत, पाटीलवाडा,
सावकाराची हवेली,
पोस्ट ऑफिस अन बैलांचा गाडा...
बारा बलुतेदारांच्या कला
पाहण्यासाठी काढा सहल,
चित्रपट, शूटिंग्जसाठी
हे आहे परफेक्ट स्थळ...
आरामदायी निवासाबरोबर
मिळते स्वादिष्ट भोजन,
सेल्फी पॉईंटची मजा लुटून,
भरेल तुमचं मन...
आमलेवाडी गाव जागवील
बालपणीच्या आठवणी,
झोका बालपणीचा घेऊनी
उत्साही व्हाल मनोमनी...
नव आयुष्यासाठी हे
आहे वेडिंग डेस्टिनेशन,
करा कॅमेऱ्यात कैद,
आपल्या आठवणींचे धन...
गावातील रस्त्यावर
उंटावर डोलत करा सफर,
कठपुतलीच्या मंत्रमुग्ध खेळाची
करा तुम्ही कदर...
© दीपक अहिरे, नाशिक
(कंटेंट राईटर, ब्लॉगर, लेखक)
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment