name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): जागतिक स्तरावरची उत्कृष्ट वाईन उत्पादक कंपनी : सुला विनयार्ड्स (A world-class wine producing company: Sula Vineyards)

जागतिक स्तरावरची उत्कृष्ट वाईन उत्पादक कंपनी : सुला विनयार्ड्स (A world-class wine producing company: Sula Vineyards)

जागतिक स्तरावरची उत्कृष्ट वाईन उत्पादक कंपनी : सुला विनयार्ड्स 
A world-class wine producing company: Sula Vineyards

Sula wine

नाशिक येथील  वाइन उत्पादक कंपनी सुला विनयार्ड्स यांनी आर्थिक वर्ष २०२४ आणि चौथ्या तिमाहीतील आजवरच्या सर्वोच्च महसुलाची घोषणा केली आहे. सुलाचे सीईओ राजीव सामंत यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

श्री. सामंत म्हणाले की सर्वोच्च त्रैमासिक आणि संपूर्ण वर्षाच्या महसुलाचा अहवाल देताना आनंद होत आहे. वाईन पर्यटनातील महसूल सलग पाचव्या तिमाहीत दुहेरी अंकात वाढला आहे.

Sula wine

सुला'तर्फे 'माइलस्टोन सेलार्स' टेस्टिंग रूम

ओझर येथील नाशिक विमानतळाजवळ 'माइलस्टोन सेलार्स' या टेस्टिंग रूमची उभारणी केली आहे. 

यॉर्क वायनरीजवळ 'लेक व्ह्यू रिसॉर्ट'

यॉर्क वायनरी परिसरात लेक व्ह्यू रिसॉर्ट सुरू करण्याची घोषणादेखील त्यांनी केली.  यामध्ये प्रथमच बँक्वेट हॉल सुविधा उपलब्ध करून देऊ. हा रिसॉर्ट २०२५ च्या मध्यास सुरू होईल. असा अंदाज त्यांनी वर्तविला. रिसॉर्ट खोल्यांची संख्या १०४ वरून १३५ वर पोचणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाईन टुरिझमला सर्वोच्च प्राधान्य

येत्या काळात वाईन टुरिझमला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. म्हणूनच वाइन पर्यटनाचे फूटप्रिंट वाढविण्यासाठी नाशिक विमानतळापासून जवळच 'माइलस्टोन सेलार्स' हा वाइनरी कॅम्पसच्या बाहेरची पहिली टेस्टिंग रूम सुलाव्दारे नुकतीच उघडली आहे. 

Sula wine

गुजरात सीमेजवळ टेस्टिंग रूम, रेस्टॉरंट 

एन.डी.वाइनचे संपादन विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे. यामुळे वाइन पर्यटन व्यवसायाचा आणखी विस्तार होईल. यावर्षी डिसेंबरपर्यंत एनडी वाइनला टेस्टिंग रूम, रेस्टॉरंट आणि बॉटल शॉप उघडण्याचे ध्येय आहे. एनडी वाइन गुजरात सीमेपासून ५० किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असून वाइन पर्यटनाची प्रचंड क्षमता अससेले ठिकाण आहे. या प्रकल्पासह इतर बरेच येऊ घातले आहे. हा प्रकल्प बघता सुला भारतातील वाईन पर्यटनात आघाडीवर राहील अशी ग्वाही सामंत यांनी दिली आहे.

जानेवारीत विक्रमी पर्यटक

या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मोठ्या वीक एंडला अभ्यागतांची संख्या, महसूल आणि टेस्टिंगचा नवीन विक्रम प्रस्थापित केला. यातून चौथ्या तिमाहीत वाइन पर्यटन व्यवसायाने १६.४ कोटी, अशी वार्षिक ३१.३ टक्क्यांची मजबूत महसूल वाढ नोंदविली तसेच डोमेन सुला बेगलुरू, यॉर्क आणि प्रमुख नाशिक वायनरी या तीन कॅम्पसमध्ये ४ लाख ३५ हजार ग्राहकांनी भेट दिली आहे, असे सामंत म्हणाले.

Sula wine

एलिट, प्रीमियम वाईनच्या मागणीत वाढ

सामंत म्हणाले, की प्रिमियमायझेशनच्या प्रयत्नांनी एलिट आणि प्रीमियम वाइनचा हिस्सा ७५.१ टक्क्यांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. एलिट, प्रीमियम वाइन्सने या व १५.५ टक्यांनी वाढ नोंदविली. 'सुला'चा आर्थिक वर्ष २०२४ चा निव्वळ महसूल ६१६.४ कोटी रुपये आहे. यात एलिट प्रीमियम वाइनच्या महसुलात १५.५ टक्के वाढ झाली. 

लाभांशाची शिफारस 

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये करपश्चात नफा ९३.३ कोटी रुपये झाला आहे. संचालक मंडळाने साडेचार रुपये प्रतिशेअर लाभांशाची शिफारस केली असून आर्थिक वर्षात अंतिम लाभांश साडेआठ रुपये प्रतिशेअर मिळेल.

'रासा कॅबरनेट सॉव्हिग्नॉन' ला आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक

    सुला विनयार्डसला "रासा कॅबरनेट सॉव्हिग्नॉन" या वाइनसाठी ग्लोबल कॅबरनेट सॉव्हिग्नॉन मास्टर्स २०२४ मध्ये सुवर्णपदक जाहीर झाले आहे. अतिशय प्रतिष्ठित अशा ग्लोबल मास्टर्स अवॉर्ड्समध्ये कोणत्याही प्रकारात भारतीय वाईनला सुवर्णपदक मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

      इंग्लंड येथील ड्रिंक्स बिझनेस मॅगझिनद्वारे आयोजित केली होती. निवड निष्पक्ष व गोपनीय प्रक्रियेद्वारे केली जात असते. त्यासाठी वाईन उद्योगातील प्रतिष्ठित परीक्षकांच्या पॅनेलद्वारे परीक्षण केले जाते. सुला विनयार्ड्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव सामंत यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला. 

Sula wine

जागतिक स्तरावरची उत्कृष्ट वाइन

श्री. सामंत म्हणाले, की सुलाच्या २५ व्या वर्धापनदिनादरम्यान फ्लॅगशिप वाइनसाठी हे सुवर्णपदक मिळणे अभिमानास्पद आहे. २०२४ ग्लोबल कॅबरनेट सॉव्हिग्नॉन मास्टर्समधील हा सन्मान पुष्टी करतो, की सुला जागतिक स्तरावर उत्कृष्ट वाइन तयार करत आहे. यातून आम्हाला नावीन्यपूर्ण आणि उत्कृष्ट कार्य सुरु ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

Sula wine

भारतातील रेड वाइन

"रासा" या शृंखलेत सुवर्णपदक विजेते रासा कॅबरनेट सॉव्हिग्नॉन २०२२, रासा सिराज आणि रासा झिंफंडेल यांचा समावेश आहे. ही भारतातील रेड वाइन शिखराचे प्रतिनिधित्व करते. या मालिकेतील प्रत्येक वाईन अत्यंत काळजीपूर्वक तयार केली गेली आहे. आणि ती भारतीय विटीकल्चर आणि वाइन मेकिंगच्या उत्कृष्टतेचा, अत्याधुनिकतेचा पुरावा देत आहे. 

जागतिक दर्जाची वाइन उत्पादक कंपनी

   सुला विनयार्ड्स ही जागतिक दर्जाची वाइन उत्पादक म्हणून भारताची क्षमता प्रदर्शित करण्यासाठी समर्पित आहे. ग्लोबल कॅबरनेट मास्टर्समधील ही मान्यता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय वाइनच्या वाढत्या दर्जाला अधोरेखित करण्यासोबत जागतिक स्तरावर ख्याती मिळविणाऱ्या वाइनच्या निर्मितीसाठी मोलाची वचनबद्धता देखील अधोरेखित करते असे त्यांनी नमूद केले.

© दीपक केदू अहिरे, 
नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com


Facebook :

Instagram :

YouTube


Koo :
कू ऐप पर@दीपक1N673के दिलचस्प विचार सुनें https://www.kooapp.com/profile/दीपक1N673

Share chat :

Twitter :
@DeepakA86854129

Website :


No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...