name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): वाईनरीसाठी यंत्रसामुग्री (Winery equipment)

वाईनरीसाठी यंत्रसामुग्री (Winery equipment)

वाईनरीसाठी यंत्रसामुग्री
Winery equipment


Wainarisathi yantra samurgi

 कृषियोगचा द्राक्ष वाईनबद्दल समग्र माहिती देणारा व गैरसमज दूर करणारा संग्राह्य द्राक्ष वाईन विशेषांक प्रकाशित झाला होता. या अंकात वाईनसाठी द्राक्ष लागवड, द्राक्ष प्रक्रिया उद्योग धोरण, वाईनरीसाठी यंत्रसामुग्री, वाईन आणि आरोग्य, भारतीय वाईनला निर्यातीची संधी, वाईन बनविण्याची घरगुती पध्दत, वाईन उद्योगातील यशाची सुत्रे तसेच वाईन उद्योगाचा प्रकल्प अहवाल इ. विषय देण्यात आले होते. त्यातील वाईनरीसाठी यंत्रसामुग्री या विषयावरचा ब्लॉग देत आहोत...

द्राक्षरस यंत्र
 Wine press

यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार उपलब्ध असतात-१) न्यूमॅटीक प्रेस २) हायड्रॉलिक प्रेस-वेगवेगळ्या कपॅसिटमध्ये हे उपलब्ध होवू शकतात 

डिस्टेमर क्रशर
Distemer Crusher

हा क्रशर रेड वाईनसाठी द्राक्षाचे मणी देठापासून वेगळे करून थोड्याच प्रमाणात क्रश करणेसाठी वापरतात. तसेच व्हाईट द्राक्षांची देठ बाहेर काढण्यासाठीच याचा वापर केला जातो. 

पंम्प
Pump

विविध प्रकारचे  पंम्प वाईनरीमध्ये वापरले जातात यापैकी प्रामुख्याने डिस्टेमर बरोबर वापरला जाणारा पंप हा संपूर्ण द्राक्ष ट्रान्सफर करणेसाठी वापरला जातो. तो इसेंट्रीक स्क्रु किंवा लांब टाईपचा वापरला जातो. सर्व पंप स्टेनलेस स्टीलचेच असावेत.

फरमेंटेशन व्हेसल्स
 Fermentation Vessels

सामान्यतः रेड वाईन आणि व्हाईट वाईनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे वेसल्स वापरले जातात. दोघांच्या संरचनेमध्ये फरक असला तरी दोन्ही स्टेनलेस स्टीलमध्येच बनविलेले असतात व त्याला तापमान नियंत्रणासाठी जॅकेट किंवा क्वाईल्स दिलेले असतात. 

चिलींग प्लांट   
Chilling Plant   

तापमान नियंत्रणासाठी चिलींग प्लांटची आवश्यकता असते व चांगल्या कार्यक्षमतेचा, वाईनरीच्या क्षमतेला योग्य चिलींग प्लांटची निवड करणे अतिशय महत्वाचे असते. कारण वाईनरीमध्ये सर्वात जास्त विजेची गरज ह्याच प्लांटलाअसते म्हणून चुकिचा निर्णय आपल्या वाईनरीला घातक ठरू शकतो.

Wainarisathi yantra samurgi

फिल्ट्रेशन सिस्टीम
Filtration system

वाईन फिल्टर करणेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम असतात. त्यात प्रामुख्याने प्लेट अॅन्ड फ्रेम टाईप, केंट्रीज टाईप, रिवर्स ओसमॉयसीस, रोटरी वॅक्यूम टाईप फिल्टर्स असतात.

 बॉटलींग एक्विपमेंटस अॅण्ड मशिन्स 
Bottling Equipments and Machines

वाईन बाटलीमध्ये भरणेसाठी, स्वच्छ करणेसाठी बॉटल वॉशिंग मशिनची गरज भासते ह्यात बॉटल स्वच्छ करून झाल्यावर बॉटल फिलींग मशिन्सवर वाईन बॉटलमध्ये भरण्यासाठी सिंगल हेड मशिनपासून ते दोनशे हेडपर्यंत फिलर्स असतात. वाईनरीच्या क्षमतेनुसार याची निवड करता येते. बॉटलींगमध्ये वाईन भरल्यानंतर कॉर्किंग मशीनच्या सहाय्याने कॉर्क लावले जाते व त्यावर फॉईलींगच्या मदतीने अॅल्युमिनीयम अथवा इतर फॉईल लावून लेबलिंगसाठी बॉटल तयार करण्यात येते.

वॉटर ट्रिटमेंट व हॉट वॉटर सिस्टिम 
Water treatment and hot water system

आपल्या पाण्यामध्ये बऱ्याच प्रकारचे क्षार असतात. हे पाणी जर जसेच्या तसेच वापरले तर त्यातील काही क्षार मशिन्सच्या आतील भागात चिकटतात तसेच बाटल्यांच्या आतसुध्दा राहतात व प्रक्रिया होऊन वाईनमध्ये मिसळले जातात. याचा परिणाम सरळ वाईनच्या गुणवत्तेवर होतो म्हणून वाईनरीमध्ये वॉटर ट्रिटमेंट संयंत्र वापरणे अत्यंत गरजेचे असते.

अद्ययावत प्रयोगशाळा 
Modern laboratory

वाईन तयार होत असतांना त्यातील प्रत्येक घटकाचे प्रत्येक टप्यावर, त्यांचे प्रमाण तसेच गुणवत्ता तपासण्यासाठी व त्यात आवश्यक ती सुधारणा करण्यासाठी प्रत्येक वाईनरीमध्ये अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा असणे अपरीहार्य आहे. वाईनची द्राक्षे आणण्यापासून तर वाईन बाटलीमध्ये बंदिस्त होईपर्यंत विविध परिक्षणे व चाचण्या घेणे आवश्यक असते. व ह्यातूनच आपण उत्कृष्ट वाईनचे उत्पादन करू शकतो 

प्रशिक्षित मनुष्यबळ
Trained manpower

अतिशय महत्वाचा घटक म्हणजे वाईनरीमध्ये काम करणारे मनुष्यबळ, ह्या उद्योगामध्ये ज्या मशिन्स व संसाधने वापरली जातात. त्या व्यवस्थित चालविणे, त्यांची निगा राखणे व त्या अखंडपणे चालविता याव्यात यासाठी कामगार प्रशिक्षीत असणे गरजेचे असते. अन्यथा अगदी किरकोळ कारणामुळे वाईनरीचे काम बंद होवून नुकसान होणेची शक्यताही असते.

   द्राक्ष वाईनचा दर्जा टिकवणे व त्यासाठी लागणारे प्रशिक्षीत मनुष्यबळ निर्माण करणे या उद्देशाने देशातील पहिली द्राक्ष प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण व संशोधन इन्स्टीट्यूट सांगली जिल्ह्यातील पलूस येथे आहे. भारती विदयापीठाच्या सहकार्यानेच ती स्थापन करण्यात आली आहे तसेच पलूस येथे दीड कोटी रूपये खर्चाच्या वाईन लॅबोरेटरीचीही निर्मिती झाली  आहे.

कृषियोग द्राक्ष वाईन विशेषांक
मूल्य : ५० रू., पाने : ६५

© दीपक केदू अहिरे
नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


No comments:

Post a Comment

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड (Orchard cultivation using the Miyawaki method)

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड  Orchard cultivation using the Miyawaki method   जपानी झेन तत्त्वांवर आधारित फळबाग लागवड पद्धत या संकल्पनेत आध...