पुस्तक परिचय
(Introduction to the book)
कृषि क्षेत्रासाठी भारतीय बाजारपेठेतील कृषी रसायने : कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशके Agrochemicals in Indian Market for Agriculture Sector: Insecticides, Fungicides and Herbicides
कृषी क्षेत्रासाठी भारतीय बाजारपेठेतील कृषी रसायने : कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशके या पुस्तकाची सुधारित आवृत्ती असून या पुस्तकाचे लेखक डॉ. बाळासाहेब भगवान भोसले, डॉ. पी.आर.झंवर, प्रा. बी. व्ही. भेदे, प्रा. डॉ. ए.जी. बडगुजर, डॉ ए.एस. जाधव डॉ. दिनेश पं. कुळधर हे आहेत. हे सर्व शास्त्रज्ञ मराठवाडा कृषी विद्यापीठात कार्यरत असून यांना मागील ३५ वर्षांपासून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अनुभव आहे. आज कीटकनाशकांचा सुरक्षित वापर करणे गरजेचे आहे.
कीटकनाशकांचा वापर करून कीड व्यवस्थापन प्रभावीपणे करता येते. पण कीटकनाशके जेवढी फायदेशीर आहेत. तेवढीच धोकादायकसुद्धा आहेत. कीटकनाशकांचा दुष्परिणाम टाळण्यासाठी गरजेनुसार वापर, किडीनुसार कीटकनाशकांची फवारणी, योग्य कीटकनाशकांचे नावे, मात्रा, फवारणी वेळ आणि पद्धती जर योग्य असेल तर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून किडीचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन निश्चित करता येते हे या पुस्तकात दिले आहे.
कीडव्यवस्थापनासाठी आवश्यक माहिती, कीटकनाशकांचे वर्गीकरण, कीटकनाशकाचे लेबल क्लेम, कीटकनाशक वापरण्याच्या पद्धती, कीटकनाशकांचा सुरक्षित वापर, पीक सरंक्षण अवजारांची देखभाल, कृषी वापरासाठी रासायनिक कीटकनाशके दिली आहेत. कीटकनाशकाच्या डब्यावरील लेबलिंगमधील माहिती सचित्ररीत्या दिली आहे. कीटकनाशकाच्या विषारीपणानुसार वर्गवारीही यात दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला या बाबी सहजपणे कळायला मदत होते. कीटकनाशकाचे नाव, स्वरूप, गट, किडींवर कार्य करण्याची पद्धत, कीटकनाशकाच्या विषारीपणाची तीव्रता, तीव्रतेचा रंग, कीटकनाशकाचे व्यापारी नावे यात सविस्तरपणे नमूद करण्यात आली आहे.
कृषीक्षेत्रासाठी बुरशीनाशके, मिश्र बुरशीनाशके आठव्या प्रकरणात दिली असून बुरशीनाशकाचे नाव, बुरशीनाशकाचा गट, बुरशीनाशकाची कार्य करण्याची पद्धत, बुरशीनाशकाचा विषारीपणाचा तीव्रतेचा रंग, व्यापारी नावे, पिकामध्ये रोग व्यवस्थापनामध्ये वापर या गोष्टी दिल्या आहेत. नवव्या प्रकरणात कृषिक्षेत्रासाठी तणनाशके दिली आहेत. त्यात तणनाशकाचे नाव, तणनाशकाचा गट, तणनाशकाची कार्य करण्याची पध्दत, तणनाशकाचे विषारीपणाच्या तीव्रतेचा रंग, वापरण्याची वेळ, काही व्यापारी नावे यात मुद्देसुदरीत्या दिली आहेत.
पुस्तकाच्या दहाव्या प्रकरणात कृषी वापरासाठी जैविक कीटकनाशके, कृषी वापरासाठी जिवाणूजन्य कीटकनाशके, कृषी वापरासाठी बुरशीजन्य कीटकनाशके, कृषी वापरासाठी विषाणूजन्य कीटकनाशके, कृषी वापरासाठी निंबोळीयुक्त बुरशीनाशके, कृषी वापरासाठी जिवाणूजन्य बुरशीनाशके, कृषी वापरासाठी बुरशीजन्य बुरशीनाशके यात दिली आहे.
deepakahire1973@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा