name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): बसवंत गार्डन अ‍ॅपी-अ‍ॅग्री टूरिझम सेंटर (Baswant Garden Api-Agri Tourism Centre)

बसवंत गार्डन अ‍ॅपी-अ‍ॅग्री टूरिझम सेंटर (Baswant Garden Api-Agri Tourism Centre)

बसवंत गार्डन अ‍ॅपी-अ‍ॅग्री टूरिझम सेंटर

Baswant Garden Api-Agri Tourism Centre



नाशिक जिल्हा, निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील ‘पूर्वा केमटेक’ आणि ‘ग्रीनझोन अ‍ॅग्रोकेम’च्या सहयोगाने उपक्रमशील असे ‘बसवंत हनी बी पार्क व मधमाशीपालन प्रशिक्षण केंद्र’ तसेच ‘बसवंत कृषी उद्योग पर्यटन केंद्र’ उभारण्यात आले आहे. 

देशातील पहिले अ‍ॅपी-अ‍ॅग्री टूरिझम सेंटर म्हणून या केंद्राची ओळख निर्माण झाली आहे.  द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत शहराजवळील मुखेड रोडनजीक  हे पर्यटन केंद्र दोन एकरावर उभारण्यात आले आहे. 
Basavant garden Api-Agri Tourism centre

या अ‍ॅपी-अ‍ॅग्री टूरिझम सेंटरची माहिती देतांना संचालक श्री. संजय पवार यांनी सांगितले कि, मानवी जीवनातील मधमाशीचे महत्व सर्वांपर्यंत पोहचवून मधमाशीचे संरक्षण व संवर्धन व्हावे व मधमाशा संवर्धन करून शेती उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होते. 

मधमाशी प्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी हा यामागील उदेश असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, महिला, युवक, शहरी व ग्रामीण समाज आणि ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.

या ठिकाणी पर्यटन महोत्सव, राज्यस्तरीय ‘मधुक्रांती’ परिसंवाद, हनी बी फेस्टिवल, बसवंत फळ महोत्सव, द्राक्ष आणि किशमिश (बेदाणे) महोत्सव, मुख्याध्यापक/प्राचार्य परिषद, पर्यटन महोत्सव, चित्रकला स्पर्धा तसेच इतरही अनेक उपक्रम राबविले जातात.  
द्राक्ष महोत्सव, आंबा महोत्सव  तसेच इतरही अनेक उपक्रम वर्षभर राबविले जातात.

मधमाश्यांद्वारे परागीभवनातून होणारी उत्पादन वाढ लक्षात घेता बसवंत हनी बी पार्कमध्ये शेतकरी, विद्यार्थी तसेच बेरोजगार युवकांसाठी सर्व सुविधायुक्त बसवंत मधमाशी  प्रशिक्षण केंद्राचीही  स्थापना करण्यात आली असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले. 

Basavant garden Api-Agri Tourism centre

या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अनेक युवकांना प्रशिक्षित करून रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतीपूरक तसेच पर्यावरणपूरक अशा या प्रकल्पाला हजारो पर्यटकांनी भेटी दिल्या असून दिवसेंदिवस  प्रतिसाद वाढत असल्याचे  श्री. पवार म्हणाले.  

दोन एकरांवर उभारलेल्या या  बसवंत मधमाशी उद्यानात विविध संकल्पनेतून मधमाशीचे मानवी आहार, आरोग्यदायी मध, विविध पिकांचे उत्पादन वाढ तसेच स्वयंरोजगार निर्मितीतून शाश्वत ग्रामविकासाची संकल्पना बसवंत मधमाशी उद्यानात साकारली आहे.  

या मधमाशी उद्यानात  मधमाशीविषयी माहितीपट, मधमाशीचा जीवनक्रम, मधमाश्यांची वसाहत (अ‍ॅपिअरी), मधमाशांच्या गावाची प्रतिकृती, मधमाशीचे गाव,  गावातील सर्व शेतकरी एकत्र येऊन कशा प्रकारे मधमाशीपालन करू शकतात हे समजण्यासाठी ‘मधमाश्यांचे गाव’ ही संकल्पनेचा उपक्रम या ठिकाणी  आहे. 

मधमाश्यांच्या शहराची प्रतिकृती, बी-प्लँट नर्सरी - सीड बँक, डोरसेटा पॉईंट,  आग्या मधमाशी प्रतिकृती, मधमाश्यांचे पेंटिंग झोन जसे  ग्रामीण भागातील संस्कृती आणि मधमाशीचे कार्य वारली पेंटिंग्जच्या माध्यमातून समजावून देणारा विभागही आहे. बांबू, स्टोन, पेपर पेंटिंग, कला वस्तूंचे संग्रहालय, वाचनालय, विसावा, प्ले एरिया, बसवंत कॅफे, फूड कोर्ट, मधुबन, ‘बीनी’ आणि ‘बीनिव्हर्स’ (सेल्फी पॉइंट),, मधमाशीविषयी लघुपट अशा  अनेकविध आकर्षण असलेल्या गोष्टी येथे आहेत.

Basavant garden Api-Agri Tourism centre

याबरोबरच येथील खाद्यपदार्थ आणि विक्री विभागात आउटलेट आणि कॅफे, मधुबन फूड कोर्ट, विसावा, स्मरणवस्तू दुकान, गेम झोन कॅफे अशा विविध सुविधा आहेत. बसवंत कृषीउद्योग पर्यटन केंद्रात ‘गाव समृद्ध, तर देश समृद्ध’ ही महत्त्वाची विचारधारा अधोरेखित करणार्या ‘सेवरगाव’ या स्वयंपूर्ण आदर्श गावाची  संकल्पना प्रतिकृतीद्वारे मांडली आहे. 

अलीकडे प्रक्रिया उद्योगांतून रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात होते. यासाठी एक मध्यम स्वरूपाचे अन्नप्रक्रिया केंद्र (फूड प्रोसेसिंग युनिट), मध प्रक्रिया केंद्र, तसेच चॉकलेट फॅक्टरी येथे उभारून प्रशिक्षणाची सोयदेखील केली आहे. द्राक्षांची माहिती, बेदाणा निर्मिती प्रक्रिया आणि विविध प्रकारच्या बेदाण्यांची मांडणी येथे केली आहे.
 
ग्रामीण भागातल्या बहुतांश लोकांच्या उदरनिर्वाहाचे सजीव साधन असणार्या कृषी आधारित बैल-संस्कृतीची परिपूर्ण ओळख बसवंत गार्डनमध्ये मांडलेल्या बैलांच्या शिल्पकृतींमधून नवीन पिढीला अतिशय रंजकतेने करून दिली जाते. भारतातील बैलांच्या विविध जातींच्या हुबेहुब प्रतिकृती त्यांच्या माहितीसह येथे बघायला मिळतात. याबरोबरच स्पोर्ट्स झोन, फळांच्या मोठ्या प्रतिकृती, ससेपालन, टुक-टुक व्हॅन इ. विविध आकर्षणांचा यात समावेश आहे.

Basavant garden Api-Agri Tourism centre

अ‍ॅग्री टूरिझम-अ‍ॅपी टूरिझम हे क्षेत्र परिसरातील शेतकरी बंधुभगिनींना ‘कम्युनिटी टूरिझम’ या दृष्टीकोनातून पूरक ठरणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातील कृषी पर्यटन क्षेत्राला पथदर्शक तसेच प्रेरक ठरेल. हे अ‍ॅपी अ‍ॅग्री टूरिझम अधिकाधिक उपयुक्त आणि शाश्वत होण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे   श्री. पवार यांनी सांगितले.अनेक पर्यटक सहपरिवार येथे भेट देतात तसेच शाळा-महाविद्यालयांच्या सहलीही येथे येतात.

बसवंत हनी बी पार्क व कृषी पर्यटन केंद्र पाहण्यासाठी तिकीट लागते. फक्त प्रवेशासाठी १०० रुपये तिकीट असून ५ ते १२ वर्ष मुलांना प्रवेश ५० रु. आहे.   यात गेम झोनला प्रवेश नाही. गेम झोनमधे प्रवेश करण्यासाठी २०० रुपयांचे तिकीट सर्व वयोगटाला लागू आहे. त्यांनतर दोन्ही प्रोजेक्ट ची गायडेड टूरसह सर्व गेम झोन, फॅक्टरी विज़िट, मधमाशी उद्यान ते बसवंत गार्डनला टुकटुक वॅनमधून प्रवास असेल. शिवाय वेलकम ड्रिंक आणि ४ वा चहा असेल, हे सर्व ६०० रुपयांच्या पॅकेजमध्ये मिळणार आहे. तर ५ ते १२ वर्षापर्यंत मुलांना ४०० रुपये तिकीट असेल. दोन्ही तिकीटांना (६०० आणि ४००) १०० रुपये किमतीचे २ कूपण देण्यात येतील. या कूपनच्या माध्यमातून मधुबन फूड कोर्ट, बसवंत कैफ़े, सोव्हेनियर शॉप आणि सिटी सेंटर मॉल येथील बसवंत आउटलेट येथे खरेदी करता येते.  

Basavant garden Api-Agri Tourism centre

'बसवंत गार्डन अ‍ॅपी-अ‍ॅग्री टूरिझम सेंटर' या कृषिपूरक स्तुत्य उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. बसवंत मधमाशी उद्यानाला प्रतिष्ठित अशा इंटरनॅशनल सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल टूरिझम या संस्थेतर्फे दिला जाणारा ‘रिस्पॉन्सिबल टूरिझम अ‍ॅर्वार्ड’ हा पुरस्कार मिळाला.

भोपाळ येथे झालेल्या कार्यक्रमात वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केटचे अ‍ॅडव्हायजर  हॅरॉल्ड गुडवीन व मध्य प्रदेशचे पर्यटनमंत्री उषा ठाकूर यांच्या हस्ते ग्रीनझोन अ‍ॅगोकेमचे कार्यकारी संचालक संजय पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘नैसर्गिक वारसा आणि जैव विविधतेमध्ये पर्यटनाचे योगदान वाढवणे’ या श्रेणीमध्ये बसवंत हनी बी पार्कला रौप्यपदकाने सन्मानित करण्यात आले. ‘किर्लोस्कर वसुंधरा मित्र’ पुरस्कार  याखेरीज इतरही काही मानाचे पुरस्कार या प्रकल्पाला मिळाले आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क :  बसवंत कृषी पर्यटन, बसवंत गार्डन, मुखेड रोड, पिंपळगांव बसवंत, जि नाशिक मोबा.- ७७७४० ८९५१७, ७५०७७ ५७७००

© दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
www.digitalkrushiyog.com
digitalkrushiyog@gmail.com
Telegram : https://t.me/swakavyankur
Facebook :
Instagram :
YouTube
Koo :
कू ऐप पर@दीपक1N673के दिलचस्प विचार सुनें https://www.kooapp.com/profile/दीपक1N673
Share chat :
Twitter :
@DeepakA86854129
Website :

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...