कृषी विभागाच्या विविध योजना : शेतकऱ्यांसाठी सरकारी अनुदान व लाभांची संपूर्ण माहिती
Various Schemes of Agriculture Department: Government Subsidies & Benefits for Farmers
सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या विविध योजना आहेत. याची माहिती या ब्लॉगमधून देण्यात आली आहे.
१) कृषी यांत्रिकीकरण योजना:
यासाठी पात्र लाभार्थी हे सर्व खातेदार शेतकरी असून शेतकरी गट, एफ.पी.ओ. व सहकारी संस्था आहेत. यासाठी आवश्यक कागदपत्र सातबारा, आठ अ उतारा, आधार कार्डची प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकची प्रथम पानाची प्रत व संवर्ग प्रमाणपत्र ही आहेत. कृषी यंत्रिकीकरण या घटकात ट्रॅक्टर, पावर टिलर, स्वयंचलित यंत्र व अवजारे, ट्रॅक्टर व पावर टिलरचलित यंत्र व अवजारे, पिक संरक्षण साधने, मनुष्य व बैलचलित अवजारे, प्रक्रिया युनिट्स, भाडेतत्त्वावर कृषी यंत्र व अवजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी (अवजारे बँक) इ. या गोष्टी समाविष्ट असतात. अवजारे बँक या घटकातंर्गत ट्रॅक्टर व इतर पसंतीनुसार अवजारे या बाबी समाविष्ट असतात. कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अ.जाती, अ.जमाती, अल्प, अत्यल्प,भूधारक शेतकरी व महिला यांच्यासाठी ट्रॅक्टरचे १.२५ लाख अनुदान व इतरांसाठी ५०% अवजारे तसेच इतर लाभार्थ्यांसाठी ट्रॅक्टर १ लाख, इतर अवजारे ४०% मंजूर कमाल अनुदान मर्यादा आहे. अवजारे बँकसाठी रुपये १० लाखापर्यंत अनुदान आहे. यात ४ लाखापासून २५ लाखापर्यंत अनुदान ४० टक्के मिळते.



