name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): चौकोनी संप्रेरके (Quadrilateral hormones)

चौकोनी संप्रेरके (Quadrilateral hormones)

चौकोनी संप्रेरके
Quadrilateral hormones

Quadrilateral hormones

आपला आनंद वाढवण्यासाठी 
संप्रेरके असतात खूप महत्त्वाची, 
एन्डोरफिन्स,डोपामाईन,सेरोटोनीन
ऑक्सिटोसीन ही असतात गरजेची...

दररोजचा व्यायाम करून 
एन्डोरफिन्स मिळवा आपण, 
खेळ खेळण्याची सवय लावून 
करा दररोज विनोदी वाचन... 

छोट्या मोठ्या गोष्टींसाठी 
करावे कामाचे तोंडभरून कौतुक, 
शरीरात होते डोपामाईन तयार
पसरते सर्वत्र आनंदाची वाहतूक... 

इतरांचा आनंद व फायद्यासाठी 
करावी नियमित रचनात्मक कृती, 
तेव्हा तयार होते सेरोटोनीन
जेव्हा पुरवतात उपयुक्त माहिती... 

आपलेपणाने साधा जवळीक 
जवळच्या व्यक्तीला द्या आलिंगन, 
मैत्रभावनेने ठेवा खांद्यावर हात 
तेव्हा तयार होते ऑक्सिटोसीन...

अशाप्रकारे रहा तुम्ही आनंदी 
दूर होतील तुमच्या अडचणी, 
आत्मविश्वासाने सामोरे जाल 
संप्ररके तयार करा ही चौकोनी...

© दीपक केदू अहिरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...