name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): February 2022

धावणे (Running)

धावणे
Running 

Dhavane

माणसं सध्या धावतात खूप,
कुठेच नाही पोहचत,
पळत जाणं हे बनलंय साध्य,
विचारांची दिशा नाही मिळत...

वेगाच्या नादात नियंत्रण सुटतं,
ताबा हरवून प्रवास सैरभैर होतो,
आपलं जीवन शांतपणे अनुभवा,
क्रिया तशी प्रतिक्रिया घडवत राहतो

शॉर्टकटने मिळवलेले यश मोठेपणा,
नाही टिकत चिरकाल,
नुसतंच उंचीवर जाणं नको,
उंची टिकवता आली पाहिजे सर्वकाल...

तुम्ही किती धावता,
यापेक्षा कुठे थांबता,
यश तिथेच थांबलेलं
हे कळलं पाहिजे आता..

© दीपक केदू अहिरे, 

नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

श्रद्धा (credence)

श्रद्धा
credence

Credence

स्वप्नपूर्तीसाठी धडपड,

करा समृद्ध भावप्रवृत्ती,

ही देते प्रेरणा व बळ,

हीच सामर्थ्यशाली श्रध्देची वृत्ती...

श्रद्धा असते पुराव्याशिवाय विश्वास,

जी गोष्ट अस्तिवात येईल,

श्रद्धा देते लढण्याची इच्छाशक्ती, 

पुढे जाण्याचं धैर्य श्रद्धा देईल...

धाडस आणि साहस करायला, 

प्रेरणा विचारातून मिळते,

नाविन्याचा शोध घेण्यास, 

स्फूर्ती श्रध्देतून जन्मते..

श्रद्धा केवळ प्रवृत्ती नव्हे, 

तर ती असते प्रत्यक्ष कृती,

तुमच्या कृतीवर किती श्रद्धा, 

यावर यशाची होते गणती...

© दीपक केदू अहिरे, नाशिक

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी काव्यरूपी निवेदन (A poetic statement for the Marathi language to get classical status)

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी काव्यरूपी निवेदन
A poetic statement for the Marathi language to get classical status

मराठी राजभाषा दिन

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  

मिळावा अभिजात भाषेचा दर्जा,मराठी भाषेला,

जाणून घ्या माझ्या या काव्यरूपी निवेदनाला...

मराठी भाषेची अस्मिता जागृत ही पूर्वापार,

समजून घ्या हो आमच्या मराठी भाषेची धार...

ग्रंथ मराठीचे पुरावे बाराव्या-तेराव्या शतकापासून,

लीळाचरित्र,विवेकसिंधु ज्ञानेश्वरी या ग्रंथापासून... 

भाषेच्या आरंभकालापासून, आहेत प्रगत रचना,

म्हणून आम्ही मागतो अभिजात दर्जा हा मिळेलना..

प्राचीन,मौखिक परंपरेतून तुम्ही घ्या मराठीचा शोध,

भाषेच्या प्राचीनतेबाबत आमचा हा शोध आणि बोध

मराठी भाषा हा मराठी संस्कृतीचा अस्सल आधार,

अभिजात दर्जा मिळावा म्हणून लढतोय आरपार... 

मराठी भाषेची मौलिकता प्राचीन काळापासून,

मराठी भाषेची सलगता ही आहे माैखीक ग्रंथापासून

अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी कसोट्या केल्या,

कसोट्यांच्या दाव्यावर त्या पूर्णपणे आहेत उतरल्या

आजवर केंद्र सरकारने दर्जा दिला सहा भाषांना,

मराठी भाषेविषयी हा दुजाभाव दिसतो होतांना

भाषा विकासासाठी सरकारकडून भरीव अनुदान

आम्ही करताे मराठी भाषेच्या दर्जाविषयी प्रमाण...

अभिजात दर्जा मिळाल्यावर वाढेल भाषेची प्रतिष्ठा,

अभिजात दर्जासाठी पाळल्या तंतोतंत कसोट्या... 

भाषेच्या श्रेष्ठतेवर उठते राजमान्यतेची मोहर,

भाषेच्या विकासासाठी आमची चालना बिनघोर...

भाषिक, वाड्ःमयीन परंपरा आमचे स्वयंभूषण,

अभिजात दर्जा मिळावा यासाठी हे विनम्र निवेदन...

अभिजात दर्जासाठी प्रा.पठारे समिती केली स्थापन,

या समितीने दिले पुरावे प्राचीन भाषेविषयी ज्ञापन...

मराठी भाषेचे वैविध्य हेच आहे आमचे बलस्थान,

या भाषेत दिसतील बोलीभाषेचे विविध वाण... 

प्राचीन भाषा व तिचे रूप याची बसवली सांगड,

दर्जाच्या कसाेटीवर उतरली भाषा नाही भाकड...

मराठीचे प्राचीनत्व पुरावे अभ्यासून दिला अहवाल,

अभिजात दर्जा म्हणून वाट पाहतो सालोसाल...

अहवालात मांडले आम्ही मराठी भाषेचे प्राचीनत्व,

भाषेची प्राचीन परंपरा सूचित करून मांडले हे तत्व

बाराव्या-तेराव्या शतकापासूनआढळलेभाषेचे पुरावे,

प्रगत रचना व दर्जासाठी प्राचीनतेकडे झुकावे...

आजची मराठी व मूळ व्यापक पदावर केला विचार

एकाअर्थी मराठी बदलाचा इतिहासाचा हा आचार...

प्राचीन शोधामध्ये सातवाहनांच्या कालखंडाचा,

हा वाड्ःमयीन आधार शोधला त्यातील संदर्भाचा...

महत्त्वपूर्ण ग्रंथ "गाथासप्रशती संदर्भ गंगाथडीचे,

ग्रंथात उल्लेख गोदाकाठच्या तत्कालीन प्रदेशाचे...

कला,विद्या क्षेत्र सातवाहनांच्या काळात भरभराट,

गाथासप्रशती बृहत् कथा ग्रंथ राजवटीची आहे वाट

सातवाहनांची राजवट आहे चारशे वर्षापूर्वीची,

या कालखंडात रोवली मुहूर्तमेढ मराठी ग्रंथाची...

नंतर वाकाटक,राष्ट्रकुट,चालुक्ययादव राजघराणी,

चालुक्यकाळात लिहिली मानसाेल्लास ग्रंथ लेखणी

महानुभाव,वारकरी संप्रदाय केली विपुल रचना,

भाषेची मौलिकता,सलगता यादृष्टीने हा कणा...

या राजवटीचे कालखंड आहेत वैशिष्टयाने वेगवेगळे,

प्रत्येक टप्प्यात विकास करत होते भाषाप्रेमी सगळे

सरकारने ध्यानात घ्यावे प्राचीन कालखंडाची भाषा,

आज तर पूर्णपणे विकसित आधुनिक भाषेची दिशा

दीर्घ भाषेचा इतिहास समजण्यासाठी अभिलेख,

राजकीय व सामाजिक परिस्थिती वर्णनाचे लेख.

शिलालेख,कोरीवलेख ही अस्सल संशोधन साधने,

लेण्याद्री शिलालेखही भाषेसंदर्भातले व्यक्त हाेणे.

दाेन हजार वर्ष जुनी मराठी भाषेची परंपरा,

याचे सबळ पुरावे आतातरी अभिजात दर्जा करा..

अभिदर्जा मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवली,

असंख्य पत्राद्वारे ही मोहीम निवेदनाने साध्य केली...

पहातो वाट मायबोली मराठीच्या अभिजात दर्जाची,

भाषा प्रेमीसाठी ही गोष्ट असेल अभिमानाची...

अभिजात दर्जाविषयी करू नका राजकारण,

मराठी भाषेला द्यावा अभिजात दर्जा

यासाठी पेटून उठेल प्रत्येक मराठी मन...

©दीपक केदू अहिरे,नाशिक

ई मेल- deepakahire1973@gmail.com

Web- ahiredeepak.Blogspot.com

अनुभव (Experience)

अनुभव
Experience

Experience

पूर्वग्रहांची जळमटं, 

जिवंत असतात अनेकांच्या मनात,

जोपर्यंत येत नाही अनुभव, 

ते जगत नाही वर्तमानात...

अनुभवाच्या बळावरच, 

माणसं जबाबदारी घेतात,

अनुभवशून्य माणसं मात्र, 

परिस्थितीलाच दोष देतात...

अनुभवासारखा दुसरा मार्गदर्शक, 

नाही कोणी गुरू,

अनुभव ज्ञानाने करतं शहाणं,

त्याच्या मदतीने आपण तरू...

अनुभवाला सज्ज असणारी माणसं,

राहत नाही अवलंबून,

संकटाना तोंड देण्याची सवय,

होते अनुभव घेण्याच्या वृत्तीतून...

© दीपक केदू अहिरे, नाशिक

संगत (Accompaniment)

संगत
Accompaniment

Accompaniment

संगत फार महत्वाची गोष्ट,

तुम्ही कोणाच्या सानिध्यात,

यावर भविष्य अवलंबून,

संगतीवर यशापयश जोखतात...

योग्य संगत माणसाला घडवते,

संगतीचा प्रभाव पडतो,

चुकीच्या कृतीचा प्रभाव,

अयोग्य संगतीने माणूस बिघडतो..

संगत असते सामर्थ्यवान, 

सकारात्मक माणसं सोबतीला,

सर्वोत्तम माणसाच्या सहवासाने,

झळाळी येते व्यक्तित्वाला...

तुम्ही कुणाची निवड करता,

यावर तुमचं ठरतं यश-अपयश,

चुका होऊ नये म्हणून रहा दक्ष,

याच मार्गाने मिळते सुयश...

© दीपक केदू अहिरे, नाशिक

महत्वाकांक्षा (Ambition)

महत्वाकांक्षा
Ambition

Ambition

या जगी ज्यांनी केले विशेष,

ती माणसं महत्वाकांक्षी,

सामान्य माणसं गुंततात, 

छोट्या गोष्टीत आकांक्षी...

शिवरायांची महत्वाकांक्षा,

होती स्वराज्य मिळवण्याची,

अशीच माणसं ठरतात, 

केंद्रीभूत विश्वाच्या सामर्थ्याची...

महत्वकांक्षेच्या पूर्तेतेसाठी, 

अंगी येते खूप झपाटलेपण,

आंकाक्षेचा करावा लागतो त्याग, 

वळवाव लागतं मन...

अज्ञान दूर होण्यासाठी,

कर्मवीर अनवाणी पायाने फिरले,

पूर्ती केली महत्वकांक्षेची,

सर्व अडचणींना दूर सारले...

© दीपक केदू अहिरे, नाशिक

आशा (Hope)

आशा
Hope

Hope

आजचा कसाही दिवस, 

उद्या असेल चांगला,

आशा माणसाला नेते पुढे, 

सामोरे जातो समस्येला...

आपण जिंकणार ही आशाच,

संकटावर मात करते,

प्रत्येक प्रयत्नामागे उभी आशा,

साथ सोडत नसते...

ज्याच्यात असते योग्यता,

त्याच्यात निर्माण होते आशा,

आशापूर्तीसाठी गरज प्रयत्नांची,

नाही होणार निराशा..

आशेचे किरण ठेवतात, 

माणसाला कायम चिंतामुक्त,

ते घेऊन जातात माणसाला, 

यशाच्या सूर्योदयापर्यंत...

© दीपक केदू अहिरे, नाशिक

उत्कटता (Passion)

उत्कटता
Passion

Utkatata

कोणत्याही गोष्टीत जीव ओतणं,

म्हणजेच उत्कटता,

तीव्र उत्कटताच असते, 

यशाची मर्मग्राही मानता...

उत्कटतेतून निर्माण होते,

जिद्द आणि समर्पणवृत्ती,

उत्कटतेमुळे मिळते यशाला,

आवश्यक ती गती...

उत्कटतेची असीम ऊर्जा, 

नेते अपेक्षित यशाकडे,

आपण फक्त लक्ष द्यायचं, 

ध्येयपूर्वक लढण्याकडे...

यश मिळवायलाच हवे, 

हे उत्कटतेचे झपाटलेपण,

विसरावी लागते तहानभूक, 

हेच उत्कटतेचे लक्षण...

© दीपक केदू अहिरे 

नाशिक

Utkatata

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

कृती (Action)

कृती
Action 

Kruti

तुमच्या विचारण्यानेच, 
होते इच्छाशक्ती प्रदर्शित,
पाऊल पुढे टाकण्याची,
बदलते इच्छा कृतीत

आपली स्वप्नं व्हावीत पूर्ण,
गरज सहकार्याची,
अशा व्यक्तीही जवळपास,
आपली गरज विचारण्याची

सांगा म्हणजे कळते, 
मागा म्हणजे मिळेल,
शोधा म्हणजे सापडते, 
ठोठवा म्हणजे उघडेल

यशाच्या दरवाज्यातून आत जायचं,
कृतीवर अवलंबून असते,
कृती करण्याची तयारी दाखवा,
यश मिळणारच असते

© दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

स्वाभिमान (Self Respect)

स्वाभिमान
Self Respect 

Self respect

शिवरायांनी भूमिपुत्रांचा केला, 
स्वाभिमान मनातला जागा,
उफाळला तेव्हा पराक्रम, 
स्वराज्य मिळालं जगा...

स्वतःला स्वतःबद्दलचा अभिमान, 
स्वत्त्वाची जाणिव असते,
स्वाभिमानी माणसं संवेदनाक्षम, 
प्रेरणा देण्याचं काम करते...

स्वाभिमानाने मिळतो विचार,
महत्वाकांक्षा वाढवतो स्वाभिमान, 
स्वाभिमानी माणसं आव्हान देतात,
अपमानाचा बदला अपमान... 

स्वाभिमानशून्य असणारी माणसं,
कमकुवत व संकुचित मनाची,
स्वाभिमानीचा कणा ताठ,
शपथ कधीही कुणापुढे न झुकण्याची...

© दीपक केदू अहिरे, नाशिक

शिवराय (shivraya)

शिवराय
Shivraya 

Shivaji raje

शिवनेरीवर जन्मला सूर्य
सवंगड्यासोबत फिरायचे राजे,
घेतली स्वराज्य स्थापनेची शपथ
साऱ्या जगतात नावं ते गाजे...

सर्व विद्या,कला,गनिमी कावा
यात शिवाजीराजे पारंगत झाले,
स्वराज्यासाठी जे आलेत आडवे
शिवरायांनी यमसदनास धाडले...

नेतृत्व कसे असावे
हे  राजेंकडून शिकावे,
चौकटीबाहेरचा विचार,आत्मविश्वास
हे गुण शिवरायांकडून घ्यावे...

मुल्याशी तडजोड नाही
मी जिंकणारच हा केला विचार,
म्हणूनच पूर्णत्वास आला
स्वराज्याचा हा पोलादी निर्धार...

©श्री. दीपक केदू अहिरे 

नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

दूरदृष्टी (Foresight)

दूरदृष्टी
Foresight

Foresight

आज केलेली काटकसर,

उद्याची श्रीमंती बहाल करते,

जी आजसाठीच खर्चतात,

ती अयशस्वी म्हणूनच वावरते..

उद्याच्या उदात्त्त कार्यासाठी, 

ज्यांनी पूर्वी झाडे लावली,

झाडं लावणाऱ्यामुळेच, 

आजच्या पिढीला फळं मिळाली...

नुसती दृष्टी उपयोगाची नाही, 

यशासाठी दुरदृष्टी हवी,

नुसती पाहणारी नाही तर, 

भविष्य पारखणारी दृष्टी नवी...

आजच्या दुखण्याकडे दुर्लक्ष,

उद्याच्या आजाराला निमंत्रण,

दूरच्या संकटाकडे लक्ष द्यावे,

त्यावर असावे तुमचे नियंत्रण...

© दीपक केदू अहिरे, नाशिक

शिस्त (Discipline)

शिस्त
Discipline

Discipline

हवं ते मिळवण्यासाठी,

करावी नियोजनबध्द वाटचाल,

संस्कार व आचाराने करावी, 

ही शिस्तबद्धतेची चाल...

यशस्वी माणसांची असते, 

आपल्या इच्छेवर सत्ता,

ओढाळ मन अनिच्छेने चालतं,

घालवते कृतीचा मत्ता...

स्वतःला शिस्त लावून, 

मेहनतीची दाखवा तयारी,

अशी माणसं योग्य वाटेवर,

तीच गाठतात यशाची वारी...

टंगळमंगळ करणारी,

यशापर्यंत पोहचत नसतात,

यश नसते ताकदीवर, 

ते शिस्तीच्या बळावर मिळवतात...

© दीपक केदू अहिरे, नाशिक

निंदा (slander)

निंदा
slander

Ninda

आपला प्रभाव वाढल्याची, 

खूण असते निंदा घडणं,

टीका,निंदा असते विकृती, 

करा अश्या निंदेला टाळणं...

ज्याच्या वाटेला नाही निंदा,

असा माणूस नाही सापडणार,

कौतूक करणं जितकं स्वाभाविक,

तितकीच निंदाही होणार...

निंदेला देऊ नये उत्तर,

ना कशाची करू नये शहानिशा,

कार्यविश्वात राहा कार्यरत, 

स्थिरचित्ताची धरावी आशा...

ध्येयवाटेवर येणार निंदेचे खड्डे, 

त्याच्याजवळ नका रेंगाळू,

उडी मारून पुढे चालतच राहा, 

यशाकडेच आपण वळू...

© दीपक केदू अहिरे, 

नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

ताण आणि तणाव (Stress and Tension)

ताण आणि तणाव
Stress and Tension

Tan aani Tanaav

मोठेपणाचा ध्यास आणि हव्यास

शेवटपर्यंत सुरू असतो,

तणाव करतो माणसाला उद्धवस्त

एकटेपणात असह्य होतो...

ताणतणाव निर्माण होणारी कारणं

शोधून ती टाळावीत,

छंद,संगीत,आवडी निवडी,लेखन

आनंदाने जपावित...

धावण्याच्या बेभान शर्यतीत 

माणसं दूर फेकली जातात,

संकट,अपयशात मिळतो ताण

पहावा आनंद निसर्गात...

जे नाही आपलं, जे गेलं

त्यावर शोक का करावा,

शुल्लक गोष्टीसाठी ताण

मनात का व्यापून उरावा...

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...