मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी काव्यरूपी निवेदन
A poetic statement for the Marathi language to get classical status
मिळावा अभिजात भाषेचा दर्जा,मराठी भाषेला,
जाणून घ्या माझ्या या काव्यरूपी निवेदनाला...
मराठी भाषेची अस्मिता जागृत ही पूर्वापार,
समजून घ्या हो आमच्या मराठी भाषेची धार...
ग्रंथ मराठीचे पुरावे बाराव्या-तेराव्या शतकापासून,
लीळाचरित्र,विवेकसिंधु ज्ञानेश्वरी या ग्रंथापासून...
भाषेच्या आरंभकालापासून, आहेत प्रगत रचना,
म्हणून आम्ही मागतो अभिजात दर्जा हा मिळेलना..
प्राचीन,मौखिक परंपरेतून तुम्ही घ्या मराठीचा शोध,
भाषेच्या प्राचीनतेबाबत आमचा हा शोध आणि बोध
मराठी भाषा हा मराठी संस्कृतीचा अस्सल आधार,
अभिजात दर्जा मिळावा म्हणून लढतोय आरपार...
मराठी भाषेची मौलिकता प्राचीन काळापासून,
मराठी भाषेची सलगता ही आहे माैखीक ग्रंथापासून
अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी कसोट्या केल्या,
कसोट्यांच्या दाव्यावर त्या पूर्णपणे आहेत उतरल्या
आजवर केंद्र सरकारने दर्जा दिला सहा भाषांना,
मराठी भाषेविषयी हा दुजाभाव दिसतो होतांना
भाषा विकासासाठी सरकारकडून भरीव अनुदान
आम्ही करताे मराठी भाषेच्या दर्जाविषयी प्रमाण...
अभिजात दर्जा मिळाल्यावर वाढेल भाषेची प्रतिष्ठा,
अभिजात दर्जासाठी पाळल्या तंतोतंत कसोट्या...
भाषेच्या श्रेष्ठतेवर उठते राजमान्यतेची मोहर,
भाषेच्या विकासासाठी आमची चालना बिनघोर...
भाषिक, वाड्ःमयीन परंपरा आमचे स्वयंभूषण,
अभिजात दर्जा मिळावा यासाठी हे विनम्र निवेदन...
अभिजात दर्जासाठी प्रा.पठारे समिती केली स्थापन,
या समितीने दिले पुरावे प्राचीन भाषेविषयी ज्ञापन...
मराठी भाषेचे वैविध्य हेच आहे आमचे बलस्थान,
या भाषेत दिसतील बोलीभाषेचे विविध वाण...
प्राचीन भाषा व तिचे रूप याची बसवली सांगड,
दर्जाच्या कसाेटीवर उतरली भाषा नाही भाकड...
मराठीचे प्राचीनत्व पुरावे अभ्यासून दिला अहवाल,
अभिजात दर्जा म्हणून वाट पाहतो सालोसाल...
अहवालात मांडले आम्ही मराठी भाषेचे प्राचीनत्व,
भाषेची प्राचीन परंपरा सूचित करून मांडले हे तत्व
बाराव्या-तेराव्या शतकापासूनआढळलेभाषेचे पुरावे,
प्रगत रचना व दर्जासाठी प्राचीनतेकडे झुकावे...
आजची मराठी व मूळ व्यापक पदावर केला विचार
एकाअर्थी मराठी बदलाचा इतिहासाचा हा आचार...
प्राचीन शोधामध्ये सातवाहनांच्या कालखंडाचा,
हा वाड्ःमयीन आधार शोधला त्यातील संदर्भाचा...
महत्त्वपूर्ण ग्रंथ "गाथासप्रशती संदर्भ गंगाथडीचे,
ग्रंथात उल्लेख गोदाकाठच्या तत्कालीन प्रदेशाचे...
कला,विद्या क्षेत्र सातवाहनांच्या काळात भरभराट,
गाथासप्रशती बृहत् कथा ग्रंथ राजवटीची आहे वाट
सातवाहनांची राजवट आहे चारशे वर्षापूर्वीची,
या कालखंडात रोवली मुहूर्तमेढ मराठी ग्रंथाची...
नंतर वाकाटक,राष्ट्रकुट,चालुक्ययादव राजघराणी,
चालुक्यकाळात लिहिली मानसाेल्लास ग्रंथ लेखणी
महानुभाव,वारकरी संप्रदाय केली विपुल रचना,
भाषेची मौलिकता,सलगता यादृष्टीने हा कणा...
या राजवटीचे कालखंड आहेत वैशिष्टयाने वेगवेगळे,
प्रत्येक टप्प्यात विकास करत होते भाषाप्रेमी सगळे
सरकारने ध्यानात घ्यावे प्राचीन कालखंडाची भाषा,
आज तर पूर्णपणे विकसित आधुनिक भाषेची दिशा
दीर्घ भाषेचा इतिहास समजण्यासाठी अभिलेख,
राजकीय व सामाजिक परिस्थिती वर्णनाचे लेख.
शिलालेख,कोरीवलेख ही अस्सल संशोधन साधने,
लेण्याद्री शिलालेखही भाषेसंदर्भातले व्यक्त हाेणे.
दाेन हजार वर्ष जुनी मराठी भाषेची परंपरा,
याचे सबळ पुरावे आतातरी अभिजात दर्जा करा..
अभिदर्जा मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवली,
असंख्य पत्राद्वारे ही मोहीम निवेदनाने साध्य केली...
पहातो वाट मायबोली मराठीच्या अभिजात दर्जाची,
भाषा प्रेमीसाठी ही गोष्ट असेल अभिमानाची...
अभिजात दर्जाविषयी करू नका राजकारण,
मराठी भाषेला द्यावा अभिजात दर्जा
यासाठी पेटून उठेल प्रत्येक मराठी मन...
©दीपक केदू अहिरे,नाशिक
ई मेल- deepakahire1973@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा