पक्ष्यांची शाळा
A school of birds
पक्ष्यांची शाळा
भरली बागेमध्ये,
पाेपटाची भूमिका
मुख्याध्यापकामध्ये...
पक्ष्यांची शाळा
विद्यार्थी विविध पक्षी,
शाळा भरली झाडावर
आभाळ झाले साक्षी...
पक्ष्यांची शाळा
चिमणीचा चिवचिवाट,
किती सांगू मी
मैना मास्तरचा असा थाट...
पक्ष्यांची शाळा
गाणे रंगले सुरस,
काेकिळाने दिला आवाज
बाकी पक्ष्यांनी काेरस...
© दीपक अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment