मनातलं वादळ
A storm in the mind
मनातलं वादळ
जनात शमतं,
तुझं नी माझं
काय तसं अडतं...
मनातलं वादळ
करावे माेकळे,
घट्ट हाेतील
त्याने पाळेमुळे...
मनातलं वादळ
विचारांचा वारा,
खेळ हा मनाचा
भावनांच्या धारा...
मनातलं वादळ
विस्कटली घडी,
वादळ शमलं
मारताे मी दडी...
© दीपक अहिरे,
नाशिक
No comments:
Post a Comment