फुलांच्या विश्वात
In the world of flowers
रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात
मन माझे खूपच रमते,
निसर्गाच्या कुशीत मला
राहायला मला आवडते...
रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात
वाऱ्यावर डाेलताे झेंडू,
लग्नसराईत,दसरा,दिवाळीत
त्याला आता कसा काढू...
रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात
राहताे फुलांचा राजा गुलाब,
याेग्य मशागत करून
ठेवा त्याचा मानमतराब...
रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात
माेगरा,ऑर्किड,साेनतुरा,
अबाेली,शेवंती, लिलिला
कसे तुम्ही विसराल...
रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात
जरबेरा,कार्नेशन,ॲस्टर,
सतत मागणी असते
पाहिजे तसे कटफ्लाॅवर...
रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात
फुलं घालतात सौंदर्यात भर,
गुलछडी,रजनीगंधा,स्वर्गफुल
असू द्यावा जीवनी वावर...
© दीपक अहिरे,
नाशिक
No comments:
Post a Comment