आल्या थंड पावसाळी लहरी...
cold monsoon wave has arrived
आल्या थंड पावसाळी लहरी,
लगबग सुरू झाली शेतावरी,
काेरडवाहू शेतकरी शेत नांगरी,
मशागतीने ताे आता वावर करी...
आल्या थंड पावसाळी लहरी,
प्रत्येकाचे लक्ष आता ढगावरी,
कधी बरसेल हा धारकरी,
वेळेवर आला तर बरं करी...
आल्या थंड पावसाळी लहरी,
काेराेनाने दिली उसंत बरी,
अनलॉक प्रक्रिया करा वरचेवरी,
काेसळतात आता तुटक सरी...
आल्या थंड पावसाळी लहरी,
मान्सूनपूर्व कामाची घाई सारी,
सर्व क्षेत्र पडले थंड गप्पगारी,
आता धान्य येऊ द्या शेतावरी...
© दीपक अहिरे,
नाशिक

No comments:
Post a Comment