दिस सरता सरले
The sight moved
दिस सरता सरले
काय दिस आले,
गवताला फुटले भाले
भरले अश्रूंचे नाले...
दिस सरता सरले
संध्या ती पाहिले,
अश्रू कसे ओघळले
दिनक्रम ते तरळले...
दिस सरता सरले
उजाडता ते निमाले,
कसे सरण पेटले
आप्तगण ते जमले...
दिस सरता सरले
कशी जाग काेंबाले,
कसे व्हावे ते भले
मिळतात ते सल्ले...
© दीपक अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment