आयुष्य असं असायला पाहिजे
This is how life should be
आनंदाने जगता आलं पाहिजे,
कुणाचा दबाव नसला पाहिजे,
कुणाचा प्रभाव नसला पाहिजे,
आयुष्य असं असायला पाहिजे....
खेळीमेळीचे वातावरण पाहिजे,
राजकारण तर नसायला पाहिजे,
एकमेकाविषयी आदर असला पाहिजे,
आयुष्य असं असायला पाहिजे...
सोहाद्र स्नेहभाव जपला पाहिजे,
सहकार्याची वीण असली पाहिजे,
माणुसकीची जाण असली पाहिजे,
आयुष्य असं असायला पाहिजे...
जगण्यापुरताच पैसा असायला पाहिजे,
ध्येयाचा बाण सुटलाच पाहिजे,
जास्त हव्यास नसायला पाहिजे,
आयुष्य असं असायला पाहिजे...
आयुष्य असं असायला पाहिजे...
© दीपक केदू अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment