माती परीक्षण Soil Testing
आपल्याला ताप आला. अंग दुखतंय की आपण डॉक्टरकडे जातो ना ? कारण आपल्याला ठाऊक असतं आजाराचं बरोबर निदान झालं तरच योग्य औषध मिळतं. तसंच आपल्या शेतीचंही आहे. पण येथे डॉक्टर कोण तर ती आहे मातीपरीक्षण...
माती परीक्षण म्हणजे शेतातील मातीचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करणे, ज्यातून मातीतील पोषकद्रव्यांची पातळी (नत्र, स्फुरद, पालाश – NPK) सूक्ष्म अन्नद्रव्ये (गंधक, जस्त, लोह, मॅंगनीज, बोरोन इ.), pH (अम्लता/क्षारता), सेंद्रिय कर्बाचे प्रमाण,मातीची प्रकारवार ओळख याची अचूक माहिती मिळते.

माती परीक्षण का करावे?
माती परीक्षण केल्याने खताचा योग्य वापर होतो. अंदाजाऐवजी अचूक गरजेनुसार खत टाकल्याने खर्च कमी होतो. पिकांची उत्पादन वाढ होते. योग्य पोषणामुळे पिकांची वाढ चांगली होते आणि रोग-कीड कमी लागते. मातीचे आरोग्य टिकते. म्हणजे जास्त खतांचा वापर टाळून जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकवता येते. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळते. कमी रासायनिक आणि अधिक सेंद्रिय द्रव्य वापर करता येतो. पर्यावरण संरक्षण होत असून खतांचे जास्त प्रमाण भूजलात जाणे थांबते.
माती परीक्षण कधी कराल.
प्रत्येक २-३ वर्षांनी मातीची तपासणी करणे योग्य असते. पिक लावण्यापूर्वी, विशेषत: खरीप किंवा रब्बी हंगाम सुरू होण्याआधी माती परीक्षण करावे. नवे शेत खरेदी केल्यावर किंवा जमिनीचा वापर बदलल्यानंतर माती परीक्षण करावे.
मातीचे नमुने कसे घ्याल
शेत २-३ एकसारख्या भागात विभागा. ०-१५ से.मी. खोलीपर्यंत मातीचा नमुना घ्या (पेरणीसाठी) आणि बागायतीसाठी ३० से.मी. पर्यंत मातीचा नमुना घ्यावा. झाडांच्या मुळाजवळून नमुना घेऊ नका तर अंतरावरून घ्यावा. वेगवेगळ्या ठिकाणचे नमुने एकत्र करून मिश्रित नमुना तयार करावा. मातीचा नमुना स्वच्छ पॉलिथिन पिशवीत भरून त्यावर नाव, गाव, गट नंबर, पिकाचा प्रकार लिहून प्रयोगशाळेत पाठवावा.
माती परीक्षण अहवालात काय मिळते?
माती परीक्षण अहवालात पुढील माहिती दिली जाते. त्यात मातीतील एन.पी.के.प्रमाण कमी, मध्यम, किंवा जास्त असू शकते. मातीचे पी.एच.मूल्य जे आम्लयुक्त, क्षारयुक्त की तटस्थ राहू शकते. सेंद्रिय कार्बन टक्केवारी कळते. सूक्ष्म पोषकद्रव्यांची पातळी कळत असून पिकासाठी शिफारस केलेला खतांचा डोस कळतो.
माती परीक्षणाचे फायदे
माती परीक्षणामुळे अनेक फायदे होत असून खतांचा खर्च २५ ते ३०% कमी होतो. उत्पन्न २०-२५% जास्त मिळते. माती परीक्षणामुळे माती व पाण्याचे संवर्धन होते. पिकांसाठी शास्त्रीय नियोजन शक्य होते.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment