शेतीतील अचूक निर्णयांसाठी स्मार्ट मार्गदर्शक!महाविस्तार-एआयSmart guide for accurate decisions in agriculture Mahavistar-AI
राज्याच्या कृषी विभागाने विकसित केलेले "महाविस्तार एआय" हे ॲप म्हणजे शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची भेट आहे. केंद्र शासनाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय विस्तार फ्रेमवर्क अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या ॲपद्वारे शेतकऱ्यांना हवामान, मृदा, बाजारभाव, कीड व रोग नियंत्रण तसेच विविध शासकीय योजनांची एकत्रित आणि शास्त्रशुद्ध माहिती रिअल टाइममध्ये मिळते.
या ॲपमार्फत मराठी व इंग्रजी भाषेत चॅटबोटमार्फत शेतकऱ्यांना स्थानिक आणि त्यांच्या गरजेनुसार सल्ला अत्यंत सहज मिळू शकणार असल्याने शेतीतील अचूक निर्णयासाठी महाविस्तार एआय ॲप स्मार्ट मार्गदर्शक म्हणून काम करणार
महाविस्तार ॲपची वैशिष्ट्ये
विद्यापीठांच्या मार्गदर्शनासह, हवामान, मृदा, मंडई, शेती उपकरणे, गोदाम आणि शासकीय योजनांची माहिती मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषामध्ये शेतक-यांना उपलब्ध आहे.
कसे कराल ॲप डाउनलोड?
महाविस्तार ॲप डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर MAHAVISTAAR-AI असे सर्च करावे, ॲप इन्स्टॉल केल्यावर शेतकयांना खालील विषयांवर माहिती बघता येईल.
पीक सल्ला :
तृणधान्य, कडधान्य, नगदी पिके भाजीपाला, फळे, मसाला पिकांसाठी पूर्वमशागत काढणीपर्यंत सल्ला
प्रमाणित कार्यपद्धती, प्रमाणित योग्य निवड, पेरणी, पाणी व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, कापणी व मोजणी, साठवणूक बाबत विविध पिकांच्या मशागतीच्या प्रमाणित कार्यपद्धती बघता येतील
मृदा आरोग्य पत्रिका:
आपल्या जमिनीच्या आरोग्याविषयी तपशीलवार माहिती
खत मात्रा गणकः
पीक, क्षेत्र आणि पोषक तत्वांच्या आधारे अचूक खत गणना
हवामान आधारित पेरणी, वाढीच्या अवस्था, कापणी इत्यादीसाठी तंत्र
मार्गदर्शन, सुरक्षित फवारणी, पिकाची काढणी, मळणी साठवणूक तंत्रज्ञानाविषयी माहिती
किड व रोग नियत्रंण:
पीकनिहाय रोगांची ओळख व उपाय
बाजारभाव
जिल्हानिहाय आणि पीकनिहाय बाजारभावांची रिअल टाइम माहिती
डिजिटल शेती शाळा:
झुम लिंक आणि व्हिडीओ, डिजिटल प्रशिक्षण
गोदाम उपलब्धता :
जिल्हानिहाय गोदामांची माहिती आणि संपर्क क्रमांक
जिल्ह्यातील शेतक-यांनी महाविस्तार-एआय ॲप डाऊनलोड करुन शेतीत डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून शास्त्र शुद्ध, अचूक आणि वेळेत सल्ला मिळवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment