सौर कृषिपंप योजनेतून मुबलक वीज उपलब्ध होणार : मंत्री भुजबळ Abundant electricity will be available through solar agricultural pump scheme: Minister Bhujbal
शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने राज्यशासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. विशेषतः शेतीसाठी वीज ही अतिशय महत्वाची असल्याने दिवसा मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होण्यासाठी सौर कृषिपंप योजना अतिशय यशस्वीपणे राबविण्यात येत असून, लवकरच शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
निफाड येथील माणुसकी फाऊंडेशन आणि ॲग्रो केअर कृषी मंच आयोजित कृषी प्रेरणा पुरस्कार सोहळा नुकताच निफाड येथे नक्षत्र हॉलमध्ये पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, शिवाजीराव ढेपले, राजाभाऊ शेलार, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडी, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, भाऊसाहेब बोचरे, विनोद जोशी, बाळासाहेब पुंड, दत्ताकाका रायते, सचिन होळकर,सुरेखा नागरे, सुवर्णा पगार, सुमनताई शेलार, पांडुरंग राऊत, राहुल डुंबरे, ॲग्रो केअर कृषी मंचचे अध्यक्ष भूषण निकम, माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर निकाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कृषी क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या स्मृतीस अभिवादन करत मंत्री भुजबळ म्हणाले की येवला, निफाड परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वांत मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. मात्र, अनेकदा कांद्याला भाव न मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येतात, त्यामुळे कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देऊन शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळण्यासाठी येवला तालुक्यातील चिचोंडी औद्योगिक वसाहतीत ५० एकर जागा कांदा उद्योगासाठी आरक्षित करण्यात आली आहे. लवकरच हा प्रकल्प सुरू होईल अशी माहिती त्यांनी दिली.
ॲग्रोकेअर कृषी मंचसारखी संस्था शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाते. संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीचं प्रशिक्षण, सेंद्रिय शेतीचं प्रोत्साहन, मार्गदर्शन, तालुका व जिल्हास्तरीय प्रेरणादायक शेतकऱ्यांचा सन्मान, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण, गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, महिलांसाठी प्रशिक्षण असे विविध कार्यक्षेत्र हाताळणं ही खरोखरच विलक्षण गोष्ट आहे. त्याचबरोबर पत्रकार सागर निकाळे यांच्या माणुसकी फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम नियमित राबविले जात असून या संस्थेचे काम देखील कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी मांडले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव ढेपले, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, ॲग्रो केअर कृषी मंचचे अध्यक्ष भूषण निकम, माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर निकाळे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment