आराध्या निकमची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदAaradhya Nikam enters the London Book of World Records
आराध्या निकमची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
नाशिक : शहरातील केवळ ८ वर्षांची आराध्या रोहिणी भूषण निकम (इ.४थी) हिने आपल्या कमी वयात 'Becoming a Smart Student' हे पुस्तक मराठी व इंग्रजी भाषेत लिहून जगात सर्वात लहान लेखिका म्हणून आपले नाव लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (London Book of World Records) नोंदवले आहे.
या विशेष यशाबद्दल तिला पुणे येथील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स सभागृहात आयोजित कार्यक्रमात सन्मानचिन्ह, मेडल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय सहकार राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री दर्जाचे श्री. रघुनाथ कुचित, लोकसभा सदस्य राजेंद्र मोडक, एमआयटीचे संचालक महेश थोरवे, इंटरनॅशनल प्रेसिडेंट अविनाश सुकुंडे, लायन रवी अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
आराध्याच्या या पुस्तकात विद्यार्थ्यांचा मानसिक, शारीरिक व बौद्धिक विकास, तसेच आहार, वर्तन, एकाग्रता, दिनचर्या या विषयांचा समावेश आहे. हे पुस्तक फक्त विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर पालक व शिक्षकांसाठीही मार्गदर्शक ठरणारे आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन शिक्षणमंत्री दादाजी भुसे व अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले होते. आराध्याला तिच्या या यशासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, आमदार सुहास कांदे, रावसाहेब शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा व सन्मान प्राप्त झाला आहे.
आराध्याचे हे यश संपूर्ण राज्यासाठी, विशेषतः नाशिक जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असून तिच्या आई-वडिलांचे विशेष योगदान तिच्या या विक्रमी प्रवासात महत्त्वाचे ठरले आहे.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com


No comments:
Post a Comment