name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): कृषियोगचा माहितीपूर्ण फुलशेती विशेषांक (Krishiyoga's informative Flower Farming Special Issue)

कृषियोगचा माहितीपूर्ण फुलशेती विशेषांक (Krishiyoga's informative Flower Farming Special Issue)

कृषियोगचा माहितीपूर्ण 
फुलशेती विशेषांक 
Krishiyoga's informative 
Flower Farming Special Issue


Krushiyog fulsheti visheshank

   हॉलंडमध्ये फुले म्हणजे माणसे, माणसांजवळ जायचे असेल तर फुलांजवळ जा. फुलांपासून दूर राहिलात तर माणसांपासूनही लांब राहाल इतकं त्या देशात फुलाचं महत्व आहे. भारतातही फुलशेतीला खूप महत्व आले आहे. देशाने आतापर्यंत एक अब्ज फुलांचा व्यापार केला आहे. 

   

   देशात व्यावसायीक फुलशेती करण्याचा कल वाढत आहे. जागतिक बाजारपेठेत फुले पुरविण्याचा विश्वसनीय स्त्रोत म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. देशातील फुल उद्योगाला आधुनिक उद्योगाचे स्वरूप प्राप्त होत आहे. देशात फुलांना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. 

     

     फुलांशिवाय मानवी जीवन हे अपूर्ण आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये! देवपूजा, सजावट, उत्सव, मिरवणुका अशा अनेक ठिकाणी फुलांचा वापर मुक्त प्रमाणात होतो. या सर्व बाबींमध्ये गेल्या ३० वर्षात प्रचंड वाढ झालेली आहे. त्यामुळे फुलांची मागणी सतत वाढते आहे. त्यातून औद्योगीक आणि सेवा क्षेत्रात फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे आणि भारतातल्या विविध प्रकारच्या हवामानामुळे वेगवेगळ्या फुलांचे उत्पादन घेणे शक्य असल्याने फुलांच्या व्यवसायाकडे एक मोठा उद्योग म्हणून पाहण्यात येऊ लागले आहे.

    

    जागतिक स्तरावर फुलांची बाजारपेठ ११ अब्ज डॉलरची आहे आणि यात भारताचा हिस्सा केवळ ०.६५ टक्के आहे. देशात फुलांची बाजारपेठ वाढती आहे. २०२३-२४ मध्ये २९८.५७ कोटी रूपयाची फुलांची निर्यात केली आहे. यावरून फुलशेतीला खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. यात वाढ होण्यास मोठा वाव आहे. ही वाढ आपण फुलशेतीचे अद्ययावत प्रशिक्षण व प्रचार आणि प्रसार या कार्यातून करू शकतो. याचा एक भाग म्हणजे कृषियोगने फुलशेती विशेषांक प्रकाशित करण्याचे ठरवले. त्यात फुलशेतीच्या सर्व घटकाचा समावेश केला आहे. सर्व व्यापारी फुलाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान यात दिले आहे. 

  

  या विशेषांकात हरीतगृहाचे अद्ययावत तंत्रज्ञानावरचे लेखांचा समावेश आहे. इतकेच नसून जिगरबाज फुलशेती उत्पादकाच्या यशकथा या अंकात दिल्या आहेत त्यांचे या विषयातील ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य शेतकऱ्याला होईल व ते या क्षेत्रात सहजपणे येतील इतक्या सोप्या, सुटसुटीत व त्यांच्या ख-याखु-या अनुभवावर लिहिलेल्या आहेत. 

  

  कृषीयोगच्या व्यापारी फुलशेती विशेषांकात बाजारपेठ, परसबाग व नर्सरीसह विविध विषयांची समग्र माहिती देण्यात आली आहे. या अंकात गुलाब,जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड, सोनतुरा (डेझी), अबोली, झिनिया, शेवंती, बर्ड ऑफ पॅराडाईज, लिली, निशिगंधा, अॅन्थुरियम, गॅलार्डिया, झेंडू, ग्लॅडिओलस, अॅस्टर, डेलीया, मोगरावर्गीय फुलझाडांची लागवड ते काढणी, बाजारपेठांसह सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 

  

  याशिवाय या विशेषांकात पडिक जमिनीवर फुलशेती करणारे रमेश पाटील, हरीतगृहातील फुलशेती : फायदे आणि उभारणी, श्रीरोझची आफ्रिकेत हरीतगृहाची उभारणी, झेंडू फुलशेतीमधून भरघोस उत्पन्न (यशकथा), बोनसाय (वामनवृक्षकला), हिवाळी फुलझाडे,  मुंबईचा फुलबाजार, फुलांपासून सुगंधी द्रव्य निर्मिती, नाशिकमधील फुलबाजार, ग्लॅडिओलसची फुलशेती (यशकथा), मनपाचा पुष्पोत्सव, पुष्पगुच्छासाठी सायकसची शेती, जिगरबाज फुलशेती उत्पादक, कृषी प्रदर्शन (वृत्त विशेष),अपेडाची फुल लिलाव केंद्रे, स्वरुपचे इको-होम गार्डन शॉपी उत्पादने, जरबेऱ्याची फुलशेती करणाऱ्या यशकथांचा समावेश आहे. 

   

 अंकात यशस्वी फुलशेतीचा आदर्श मावळफ्लोरा, आयएसओ. श्रेणी मिळवणारे फुलशेती उत्पादक, फुलशेतीला चालना देणाऱ्या योजना, परसबागेसाठी फुलझाड-जास्वंद, हॉलंडमधील फुलांचा देखणा लिलाव, यशस्वी फुलउत्पादक सौ. केसरकर यांचे अनुभव, केंद्रीय कृषी मंत्रालयाची व्यावसायिक फुलशेती योजना, फुलांची शेती, देईल श्रीमंती, पुष्परचना कुठे व कशी करावी?, उच्च तंत्रज्ञानावर आधारीत फुलशेतीचा प्रकल्प, बहरले शेत फुलांचे! (यशकथा-सौ. मेघा बोरसे), फुलशेतीचे अद्ययावत प्रशिक्षण एच.टी.सी, अल्पभूधारक शेतकऱ्याने फुलविली अॅस्टरची फुलशेती, परसबागेसाठी फुलझाडे-अॅन्टीन्होनम, कर्दळ, महाराष्ट्र सहकारी पुष्प विकास संस्था, फुलशेती, फुलांची निर्यात व वाव आदी विषयावर इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे.       

 कृषियोगचा हा फुलशेती विशेषांक ७० पानांचा असून त्याची किंमत ५० रुपये आहे. या अंकाचे संपादक दीपक अहिरे हे आहेत. विशेषांक विक्रीसाठी उपलब्ध आहे. 


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...