कृषी पणन मंडळाचा 'मिलेट महोत्सव' सुरू३१ जाने. ते २ फेब्रू. दरम्यान आयोजनAgriculture Marketing Board's 'Millet Festival' begins31 Jan To 2 February Organized between
Nashik Millet Mahotsav 2025 : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत दरवर्षी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेअंतर्गत विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येते.
पणन मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयामार्फत 'मिलेट महोत्सव - २०२५'चे आयोजन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय, के. बी. टी. इंजिनीअरिंग कॉलेजजवळ, गंगापूर रोड, नाशिक येथे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यात 'महाराष्ट्र श्री अन्न अभियान' सुरू करण्यात आले असून त्याअनुषंगाने पणन मंडळामार्फत पुण्यात ८ ते १२ जानेवारी दरम्यान झालेल्या मिलेट्स महोत्सवावेळी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी कृषी पणन मंडळाच्या सर्व विभागीय कार्यालयामार्फत कार्यकारी संचालक आणि सरव्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय स्तरावर मिलेट्स महोत्सवाचे आयोजन करण्याचे सुचविले होते. त्यानुसार हा महोत्सव नाशिकमध्ये होत आहे.
नाशिक येथील मिलेट महोत्सवात राज्याच्या विविध भागांतून तृणधान्य उत्पादक, प्रक्रियामध्ये कार्यरत असणारे बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्या सहभागी झाल्या आहेत. उत्पादकांना सुमारे ३५ स्टॉल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
या महोत्सवात मिलेट उत्पादन, मूल्यवर्धित प्रक्रिया उत्पादने, आरोग्यविषयक महत्त्व या विषयावर नामांकित तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, खरेदीदार-विक्रेते चर्चासत्र असे कार्यक्रम आयोजित केले आहे असे पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक एस. वाय. पुरी यांनी सांगितले.
दीपक अहिरे, नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
www.digitalkrushiyog.com
digitalkrushiyog@gmail.com
******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram :
******************************************
YouTube :
******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :
******************************************
No comments:
Post a Comment