संत गाडगेबाबा
Sant GadgeBaba
संत गाडगेबाबा
अनोखे कर्ते संत,
निष्काम कर्मयोगी
समाज केला दुःखमुक्त...
फुटलेल्या गाडग्याचे खापर
म्हणून ओळख गाडगेबाबा,
अडचणी, समस्यांशी झुंज
समाजकार्याचा घेतला वसा...
गाडगेबाबांचे मूळ नाव
डेबूजी झिंगराजी जानोरकर,
त्यांनी दिला समाजाला
वास्तव व विज्ञानवादी विचार...
गाडगेबाबांचे आवडते भजन
गोपाला-गोपाला देवकीनंदन गोपाला,
साध्या सोप्या उपदेशातून
जागे केले त्यांनी समाजाला...
गाडगेबाबांनी कीर्तनातून
अनेक भूमिका वठवल्या,
स्वच्छतेकडून समृद्धीकडे
कल्पना डोक्यात मुरवल्या...
संत गाडगेबाबा होते
चालते- बोलते विद्यापीठ,
माणसांच्या भल्यासाठी
त्यांनी गाजवले व्यासपीठ...
समाजाच्या मनावर
त्यांनी छाप सोडली,
पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
निमित्ताने माझी काव्यांजली...
© दीपक केदू अहिरे, नासिक
deepakahire1973@gmail.com
No comments:
Post a Comment