डिजीटल क्षेत्रातील वैविध्यपूर्ण सेवा पुरवणारी "ब्रँडस् झेड ऑन वेब कंपनी"
"Brands Z on Web Company" providing diversified services in digital sector
उपक्रमशील उद्योजक : श्री. वैभव महाले
नाशिकच्या कॉलेजरोड स्थित येवलेकर मळ्यातील ब्रँडस् झेड ऑन वेब ही कंपनी वेबसाईट डिझाईन, डेव्हलपमेन्ट आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहे. ही कंपनी उच्चशिक्षित श्री.वैभव महाले यांनी २०१९ मध्ये स्थापन केली असून अल्पावधीत त्यांनी या क्षेत्रात भरारी घेतली आहे.
श्री. वैभव महाले यांचे शिक्षण कॉम्पुटर सायन्समध्ये एम.एस्सी झाले असून त्यांनी प्रथम एका नामांकित आय. टी. कंपनीत काम केले. डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदावर कामाची सुरुवात केली. तिथे आपल्या कौशल्याच्या जोरावर मॅनेजर या पदापर्यंत जाऊन पोहचले. त्यात खूप शिकायला मिळाले. नंतर स्वतः चा व्यवसाय करावा या इर्षेने ब्रँडस् झेड ऑन वेब या कंपनीची स्थापना केली. श्री. महाले साहेबांना डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात पहिल्यापासून आवड होती. काहीतरी नवीन करण्याची जिद्द होती म्हणून त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला आणि आज तो ईश्वर कृपेने माझ्या सर्व सहकाऱ्यांमुळे यशस्वीरीत्या चालवला जात असल्याचे श्री.महाले यांनी सांगितले. डिजिटल मार्केटिंग क्षेत्र आव्हानात्मक असून येथे दररोज काहीतरी नवीन शिकण्याची संधी प्राप्त होते. या क्षेत्रात रोज नित्यनवीन बदल घडत असतात.काम करण्याची पद्धत व त्यामागील कल्पकता दाखवावी लागते.म्हणून त्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारीही कुशल,कल्पक आणि हुशार असल्याचे मला जाणवले. त्यांच्या या कामात त्यांच्या सुविद्य पत्नीचीही साथ लाभत आहे.
सध्या डिजिटल मार्केटिंगच्या युगात ग्राफिक्स डिझाईनचे बेसिक ज्ञान प्रत्येक उद्योजकाने घेणे फार आवश्यक आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाचे विविध प्लॅटफॉर्मबाबत सुद्धा माहिती असणे गरजेचे आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब व इतर अनेक गरचेची प्लॅटफॉर्मचा व्यावसायिक उपयोग करणे आवश्यक असल्याचे श्री.महाले यांनी सांगितले. हे प्लॅटफॉर्म काय कार्य करतात? आपला बिझनेस वाढवण्यासाठी त्यांचा कसा उपयोग केला पाहिजे. त्यांच्या मदतीने आपण आपला बिझनेस वाढवू शकत असल्याचे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. जसे कि ग्राफिक्स डिझाईनने आपण आपल्या व्यवसायाचे लोगो डिझाईन, पॅम्पलेट, ब्रोशर, इ.आपण करू शकतो. परिणामकारकरीत्या आपण आपल्या प्रॉडक्टचे फोटो, माहिती देऊ शकतो. वेबसाइट डिझाईनमुळे आपण आपल्या व्यवसायाची संपूर्ण माहिती लोकांना डिजिटल स्वरूपात देऊ शकतो.
आपण तयार केलेल्या वेबसाइटचे मार्केटिंग आपण "एस.इ.ओ" ( सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन) या सेवेने करू शकतो. तसेच आजच्या युगात सोशल मीडियाला खूप महत्व प्राप्त झाले आहे, त्याच सोशल मीडियाच्या मदतीने आपण आपल्या व्यवसायाचा संपुर्ण जगात प्रचार आणि प्रसार करू शकतो. आपण आपल्या व्यवसायाची लेखी, व्हिडिओ तसेच चित्र स्वरूपातील जाहिरात इतर वेबसाइट किंवा आप्लिकेशन वर दाखवू शकतो. त्याद्वारे आपले प्रोमोशन करू शकतो. याला एस.इ.एम. (SEM) असे म्हटले जाते. आपण वेब अँप्लिकेशनद्वारे आपल्या व्यवसायास डिजिटल करू शकतो. आपला व्यवसाय विविध प्रकारच्या वस्तू विकण्यावर आधारीत असेल तर आपल्या वस्तू ऑनलाईन विकण्याकरता काही वेबसाईटस् आहेत. तिथे आपण आपल्या वस्तू संपूर्ण जगात विकू शकतो. त्याकरिता प्रॉडक्ट सबमिशन (Products submission) ही सेवा दिली जात असल्याचे श्री. वैभव महाले यांनी सांगितले.
आजच्या घडीला लोकांपर्यंत आपल्या व्यवसायाची वास्तू किंवा जागा कशी आहे. त्यात कशा सोयी सुविधा आहेत. हे दाखवण्याकरिता एक उपयुक्त व प्रभावशाली साधन म्हणजे ३६० डिग्री व्हरच्यूअल टूर (३६० degree virtual tour) हे आहे. सोशल मीडियावर याचे उत्तम सादरीकरण केल्यास या द्वारे आपण आपला व्यवसाय वाढवू शकत असल्याचे श्री. महाले यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियाला आजच्या डिजिटल युगात कमालीचे महत्व प्राप्त झाले आहे. त्याद्वारे लोकांना जोडण्याचे साधन म्हणजे व्हिडीओ हे आहे. यातही खूप आमूलाग्र बदल झाले आहेत. आज लोकांना सर्व काही वेगाने हवे आहे. जसे की एखादी सेवा देण्यासाठी आपण व्हिडीओग्राफीचा वापर करू शकतो. जे ग्राहकांना खूप कमी शब्दात आणि कमी वेळेत व्यवसायाची माहिती सोशल मीडियावर पुरवत असल्याचे श्री.महाले यांनी सांगितले. अशा असंख्य डिजिटल सेवा आहेत.ज्याद्वारे ते प्रत्येक व्यावसायिकाला त्याचा व्यवसाय वाढवण्याकरिता मदत करतात. तसेच त्यांच्या ग्राहकांना हवे ते मिळवून देण्याकरिता मदत करत असतात.
श्री. वैभव महाले हे ब्रँडस् झेड ऑन वेब या कंपनीव्दारे विविध क्षेत्रातल्या ग्राहकांना गरजेनुसार सेवा पुरवतात.वेबसाईट डिझाईन,डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक्स डिझाईन ह्या सेवेत तर त्यांचा हातखंडा आहे. अनेक वस्तू विक्री करणारे व्यावसायिक आहेत. त्यांना वेगवेगळ्या नामांकित इ.कॉमर्स वेबसाइटवर प्रॉडक्ट्स सबमिशन करून देतात. शोरूम असेल त्या व्यावसायिकाला त्यांची नवीन सेवा ३६० डिग्री व्हरच्यूअल टूर ही सेवा उपलब्ध करून देतात. ग्राहकाला मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये संपूर्ण शोरूम दिसते. सणासुदीच्या दिवसात किंवा काही विशेष प्रसंगी व्यावसायिकांना त्यांच्या ग्राहकांना शुभेच्छा द्यायच्या असतात. व त्यांच्या व्यवसायाच्या विशेष सुवर्णसंधी सांगायच्या असतात त्यासाठी ग्राफिक्स डिझाईन ही सेवा पुरवतात. यात आकर्षक बॅनर्स डिझाईन करून दिले जातात. जे सोशल मीडियाचे विविध प्लॅटफॉर्म जसे कि फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब व इतर प्लॅटफॉर्मवर सादर केले जाते. जेणेकरून ग्राहकांना याबद्दल माहिती होते. विविध हॉस्पिटलला त्यांच्या वेबसाइटची डिजिटल मार्केटिंग करून देतात. त्यांनी दिलेल्या सेवेत सातत्य, कल्पकता असल्याचे त्यांच्या क्लायंटनी सांगितले आहे.
आजच्या एकविसाव्या शतकात सर्वाना आपला व्यवसाय हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचे आव्हान आहे. आजच्या या गतिशील युगात सर्वांनाच पुढे जायची व आपला व्यवसाय वाढवण्याची एक चढाओढ लागली आहे. याकरिता पारंपारिक मार्केटिंग पद्धती अपुऱ्या व मर्यादित आहे. आपल्या ग्राहकापर्यंत पोहाचण्याकरिता या पद्धती पुरेश्या नाहीत. त्यामुळे आजच्या युगात डिजिटल मार्केटिंग किंवा ब्रॅण्डिंग ही ग्राहकांपर्यंत पोहोचणारी एक अतिशय उपयुक्त व लाभदायक पद्धत आहे जिचा वापर असंख्य लोक त्यांच्या व्यवसायवाढीसाठी व ग्राहकांना त्याचा फायदा व्हावा यासाठी सर्रास वापर करतांना दिसून येतात. ग्राफिक डिझाईन ही गरज प्रत्येक व्यावसायिकाला असते. लोगो,सिम्बॉल, प्रॉडक्ट माहितीसाठी नवनवीन रंगात डिझाईनमध्ये क्रिएटिव्हीटी प्रदान करण्याची गरज व्यावसायिकाला असते. वेबसाईटची गरज ही आपल्या व्यवसायाची इत्यंभूत माहिती ग्राहकापर्यंत पोहचवण्यासाठी असते आणि डिजिटल मार्केटिंग हे आपल्या व्यवसायाचा प्रचार व प्रसार करण्याकरिता एक उत्तम साधन आहे. याचा प्रत्येक उद्योजकाने यथायोग्य लाभ उठविणे गरजेचे असल्याचे श्री. महाले यांनी स्पष्ट केले.
श्री. वैभव महाले सरांना या डिजिटल सेवा देण्याबरोबरच शिकवण्याचीही आवड आहे. त्यासाठी ते क्लासेससुद्धा घेतात. त्यांच्याकडे डिझाईन आणि डेव्हलपमेन्ट, डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक्स डिझाईन, डेटा प्रोसेसिंग, वेब अँप्लिकेशन, डेटा सायन्स, नेटवर्किंग या विषयाचे क्लास घेतले जातात. सध्या या सर्वच क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध आहे. या क्षेत्रात कंपनीत काम करण्यापासून ते उद्योजक होण्याची देखील संधी आहे. श्री. वैभव महाले सर्व तरुणांना आवाहन वजा विनंती करतात की डिजिटल माध्यमात काम करण्याच्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा. या क्षेत्रात जास्तीत जास्त तरुण तरुणींनी यावे. स्वयंरोजगाराची संधीही या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या व्यवसायाच्या अधिक माहितीसाठी www.brandzweb.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
© दीपक केदू अहिरे, नाशिक
deepakahire1973@gmail.com
digitalkrushiyog@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा