सौर ऊर्जा : महत्त्व आणि वापर l Solar Energy : Importance and Applications
Solar Energy : Importance and Applications सूर्यापासून आपल्याला सौर ऊर्जा मिळते. सूर्यापासून उष्णता आणि प्रकाश या रूपाने येणाऱ्या ऊर्जेला सौर ऊर्जा (Solar Energy) असे म्हणतात. सौर ऊर्जा हा अक्षय ऊर्जेचा मोलाचा स्रोत आहे. महाराष्ट्रात सौर ऊर्जेचा वाढता वापर असून सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी भरपूर वाव आहे. विजेचा तुटवडा दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. येणाऱ्या काळात सौर ऊर्जा हाच एकमेव पर्याय असेल.
औद्योगीक वापरासाठी सौरऊर्जा (industrial solar) |
सौर उपकरणे पर्यावरणासाठी हानिकारक नाहीत. यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. बऱ्याच सौर ऊर्जा संयंत्राना अनुदानही (सबसिडी) उपलब्ध आहे. आपण सौरऊर्जेचा वापर औद्योगीक वापरासाठी,घरासाठी तसेच ग्रामीण भागासाठी, शेतीसाठी कृषीपंप, गरम पाणी करण्यासाठी, रस्त्यांवरील पथ दिव्यांसाठी सौरऊर्जा वापरू शकतो.
१. औद्योगीक वापरासाठी सौरऊर्जा (Solar energy for industrial use)
- औद्योगिक वसाहतीत किंवा शहरी भाग, ग्रामीण भागात फॅक्टरी, शाळा, कॉलेजेस, वसतीगृह, दवाखाना, सरकारी कार्यालये, हॉटेल येथे आपण सोलर सिस्टीम बसवू शकतो.
- याचबरोबर मंगल कार्यालय, फार्म हाऊस, कोल्ड स्टोरेज, प्ले ग्राउंड, गार्डन, धर्मशाळा, मंदिरे, गोशाळा, डेअरी फार्म, पोल्ट्री फार्म, शेत तलाव, पॉलीहाऊस, ग्लास हाऊस, रोपवाटिका इ. कुठेही आपण औद्योगीक वापरासाठी सौरऊर्जा वापरू शकतो.
२. घरासाठी सौरऊर्जा (Solar energy for the home)
घरासाठी सौर ऊर्जा (solar for Home) |
- सौर पॅनलवर पडणाऱ्या सूर्यकिरणांच्या माध्यमातून विज निर्माण होते.
- तुमच्या घरावर सोलर बसवून कायमस्वरूपी दर महिन्याच्या वीज बिलापासून सुटका मिळवता येते.
- गुंतवणूक 'वनटाईम' होते. परंतु फायदा 'लाईफटाईम' मिळतो. अशी ही फायदेशीर गुंतवणूक आहे.
३. ग्रामीण भागासाठी सौरऊर्जा (Solar Energy for Rural Areas)
- ग्रामीण भागातील विजेचे लोडशेडींग आपल्याला माहीतच आहे.
- वेळोवेळी खंडित होणारी विज त्यामुळे बॅकअपसाठी असणाऱ्या जनरेटवर होणारा भरमसाठ खर्च व येणारे मोठ्या प्रमाणावरील लाईट बिल यावर एकच उपाय म्हणजे सूर्याच्या किरणांपासून निर्माण होणाऱ्या विजेचा वापर करणे.
४. शेतीसाठी कृषी पंप सौर ऊर्जा (Agricultural Pump Solar Energy for Farming)
कृषि पंप सौर ऊर्जा ( solar agricultural pump) |
- शेतात लाईट असो वा नसो. कधीही शेतातील पिकांना पाणी देणे सहज शक्य होते.
- सोलर कृषी पंपामुळे रात्री,बेरात्री शेतात पिकांना पाणी भरण्यापासून तुमची सुटका होऊ शकते.
५. गरम पाणी करण्यासाठी सौर ऊर्जा (Solar energy for hot water)
- सोलर वॉटर हिटरच्या सहाय्याने चोवीस तास गरम पाण्याचा पुरवठा होतो.
- नैसर्गिक पद्धतीने सूर्य किरणांपासून पाणी गरम होते. पूर्णपणे सुरक्षित आहे व अत्यल्प खर्चात देखभाल होते.
- महत्त्वाचे म्हणजे विजेची गरज नाही. प्रदुषणमुक्त, दीर्घायुषी अशी ही सिस्टिम आहे.
६. पथदिव्यांसाठी सौरऊर्जा (Solar energy for street lights)
- सोलर स्ट्रीट लाईट बसविल्यास वीज असो किंवा नसो,
- तुमच्या घरासमोर, गार्डनमध्ये, रस्त्यावर, फार्महाऊस, फॅक्टरी कायम प्रकाशमान असेल.
- कमी खर्चात, विना मेंटेनन्स, दीर्घकाळ प्रकाश मिळतो.
© दीपक केदू अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा