name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): September 2023

संरक्षणात्मक शेतीतंत्र ( Conservation Agriculture)

संरक्षणात्मक शेतीतंत्र        (Conservation Agriculture)

   
    हवामानाचा लहरीपणा व सोयीने नियंत्रित करता येणारे पॉलीहाऊसमधील सूक्ष्म हवामान या प्रमुख कारणांमुळे शेतकरी वाढत्या प्रमाणात पॉलीहाऊस, शेड-नेट, लो-टनेल, वॉक-इन टनेल, फ्रुट / बंच प्रोटेक्शन बॅग यासारख्या संरक्षणात्मक शेतीतंत्रांचा (Conservation Agriculture) अवलंब करून आपले पीक मोकळ्या आभाळाखाली शाबुत राहील याची खात्री करीत असतो.
Conservation Agriculture
प्रो-बॅग (pro-bag)

झुलूक प्रो-बॅग”

        आमच्या झुलूक कॉर्पोरेशनने तंत्रज्ञानाचा वापर करून संरक्षणात्मक शेती पर्यायावर सतत संशोधन केले आहे. अशाच नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या मालिकेतील एक तंत्रज्ञान म्हणजेच द्राक्ष, आंबा, डाळिंब, पेरू, सीताफळ, केळी, टरबूज, खरबूज, पपई, स्ट्रॉबेरी इ. फळझाडांना झाडावरच संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलेली “ झुलूक प्रो-बॅग” हे नाविन्यपूर्ण उत्पादन सादर करण्यात आले आहे.

“झुलूक प्रो-बॅग”च्या वापरामुळे होणारे फायदे :

१. ऊन, पाऊस, वादळ, वारा, धुकं, गारपीट, यांसारख्या नैसर्गिक बाबींपासून सरंक्षण मिळते.
२. फळांचा ब्लूम (टवटवीतपणा / जोमदारपणा), साईज (आकार), कलर, शुगर, वजन, तसेच टिकण्याची क्षमता
(शेल्फ लाईफ)इ. मध्ये आमूलाग्र सुधारणा होते.
३. विविध प्रकारच्या रोगराई, कीटक, ककडे, सनबन (उकड्या), थ्रीप्स, डाग इ. पासून पिकांचे सरंक्षण होते.
४. सीझन  नसतांना (नॉन सिजनल) पीक घेणे सोयीस्कर होते.
५. एक्सपोर्ट व मानवजातीसाठी लाभदायक "रेसीड्युफ्री" शेती करता येते.

झुलूक प्रो-बॅगची वैशिष्ट्ये :

१. फळांना सहजरित्या लावता व काढता येते.
२. मोठ्या फळाच्या  प्रो-बॅग लहान फळाला सुद्धा चालतात
उदा. द्राक्ष,आंब्यासाठीच्या प्रो-बॅग डाळिंब,पेरू,सीताफळाला तर टरबूजासाठीच्या प्रो-बॅग खरबूज, पपईला तसेच पपईसाठीच्या प्रो-बॅग केळी, टरबूज, खरबूज, स्ट्रॉबेरी व इतर कोणत्याही झुडूप वर्गीय फळभाजीला वापरता येते. फळ पीकाला प्रो-लो टनेल म्हणून वापर करता येतो.
३. झुलूक प्रो-बॅग अनेक वर्षापर्यंत वारंवार वापरता येतात. नियोजन केल्यास एका वर्षात एक एकराच्या खर्चात चार एकराचे काम करूनसुध्दा आपण ह्या प्रो-बॅग पुढील ५ ते१२ वर्षापर्यंत वापरु शकतो. किंवा एक एकराच्या प्रो-बॅग्समध्ये ४८ एकरापर्यंतचे काम शक्य होते. त्यामळु प्रती एकराची प्रभावी किंमत कागदापेक्षादेखील   स्वस्त पडते.
४. प्रो बॅगची उपलब्धतता (मापे) :- १८ सेमी.(रुं) X १८ सेमी.(उं) / २२ सेमी.(रुं) X २२ सेमी.(उं) २२ सेमी.(रुं) X २८ सेमी.(उं) / २८ सेमी(उं) X ३५ सेमी.(उं) ७० सेमी.(रुं) X १२५ सेमी.(उं) / --
५. प्रो बॅगचे प्रकार :- AAI / BAAI / BAC हे तीन प्रकार आहेत.
Conservation Agriculture
प्रो-पॅनल (pro-Panel)

झुलूक प्रो-पॅनल

      द्राक्षबागेच्या आच्छादनासाठी अत्यंत कमी खर्चात प्रभावी उपक्रम डिझाईन केलेले आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने व राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र (NRCC मांजरी, पुणे) यांनी या संशोधनाच्या वापरांना दुजोरा दिला आहे

झुलूक प्रो पॅनलची ठळक वैशिष्ट्ये :

१) वातावरणातील बदल व पिकाच्या गरजेनुसार सोयीने गोळा करता तसेच पसरवता येते.
२) पॉलिहाऊस फिल्मच्या तुलनेत पाच पटीने मजबूत व दोन पट अधिक टिकावू आहे म्हणजेच ताशी १५० कि. मी वेगाचा वारा सहज सहन करते व किमान ८ वर्षे चालते. 
झुलूक प्रो पॅनल (टाईप एएए) : 
   हे सुधारित वाय (Y) स्ट्रक्चरसाठी असून दोन गल्लीतील अंतर व दोन वाय मधील अंतर यांच्या मापानुसार हे पॅनल बनवले जातात व सुधारित वाय स्ट्रक्चरमधील तीन तारांवर सहजरीत्या सरकवता येतात
झुलूक प्रो पॅनल (टाईप एएए) : 
     पारंपारिक मांडव पद्धतीसाठी असून प्लॉटच्या माप व आकारानुसार मांडवाच्या बाहेर आधारस्तंभ उभे करून संपूर्ण प्लॉटवर आच्छादन केले जाते. आच्छादनाचा संपूर्ण किंवा काही भाग हवा तेवढा खोलता किंवा बंद करता येतो
झुलूक प्रो पॅनलच्या वापरामुळे होणारे फायदे :
१) बेमोसमी पाऊस, वादळ-वारा, गारपीट व दव यापासून द्राक्ष बागेच्या पोगा,फुलोरा, पाने इत्यादींना संरक्षण मिळते.
२) अर्ली (नॉन सीझनल) पीक घेता येते. 
३) एक्सपोर्ट व मानवासाठी अधिक लाभदायक "रेसिड्यू फ्री" द्राक्षशेती करता येते. 
४) शेंडे, पाने व मणी झपाट्याने व अधिक प्रमाणात वाढतात. त्यामुळे पिकाला अधिक बळकटी मिळते व उत्पादनाचा टनेज वाढतो. 
५) फळाला अधिक व्हिगरनेस, ब्लुम (जोमदारपणा व टवटवीतपणा) येतो. 
६) डाऊनी व इतर कीटकनाशकांच्या फवारणीच्या खर्चात बचत होते. 
७) खरड छाटणीनंतर वापरल्यास एकसमान डोळे फुटतात व ओलांडे डेड होत नाहीत. 
८) फळावर सनबर्न (उकड्या) होत नाही. 
९) पाण्याची बचत होते.
    झुलूक प्रो पॅनलचा उपयोग द्राक्षबागेसाठी तसेच डाळिंब, पेरू, केळी व पॉलीहाऊस इ.च्या आच्छादनासाठी देखील करता येतो. प्रो-पॅनलच्या वापरासोबत रूटझोनमधील जादा पाणी बाहेर काढण्याचा सल्लादेखील देण्यात येतो.
Conservation Agriculture
प्रो-स्टोर (pro-store)

झुलूक प्रो-स्टोर

     झुलूक कॉर्पोरेशनच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या मालिकेतील एक म्हणजेच कांदा साठवण्यासाठी तयार केलेले “ झुलूक प्रो-स्टोर ” हे आहे.
झुलूक प्रो-स्टोरची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :
१)  हवा खेळती राहण्यासाठी सातही बाजूंनी व्यवस्था केलेली आहे.
२) ऊन व पावसापासून सरंक्षण करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण झुलूक प्रो-पॅनलने केलेले आच्छादन होय.
Conservation Agriculture
प्रो-स्टोर (pro-store)


३) कमीतकमी जागेत सहजरीत्या कांदा ठेवता व काढता येण्यासाठी असलेले दरवाजे आहेत.
४) हाताळण्यास सुलभ व वापर नसताना विभक्त करण्याची सुविधा आहे.
५) १.७५ ते २.२५ टन म्हणजेच साधारणपणे १ ट्रॅक्टर कांदा साठवण्याची क्षमता आहे.
६) मापे :- २ मि. (लांबी) X २ मि. (रुंदी) X २.५ मि.(उंची).
        झुलूक प्रो-स्टोर हवे असल्यास ज्यादा क्षमतेचे ऑर्डरप्रमाणे बनवुन दिले जाते. अशा प्रकारच्या संरक्षणात्मक शेतीतंत्राने  ( Conservation Agriculture) शेती केल्यास नुकसान होणार नाही. अधिक माहितीसाठी info.Zuluc@gmail.com यावर संपर्क करावा.  

© दीपक केदू अहिरे, नाशिक


deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com
www.digitalkrushiyog.com
digitalkrushiyog@gmail.com 

डिजीटल क्षेत्रातील वैविध्यपूर्ण सेवा पुरवणारी "ब्रँडस् झेड ऑन वेब कंपनी""Brands Z on Web Company" providing diversified services in digital sector

डिजीटल क्षेत्रातील वैविध्यपूर्ण सेवा पुरवणारी "ब्रँडस् झेड ऑन वेब कंपनी" 

"Brands Z on Web Company" providing diversified services in digital sector

उपक्रमशील उद्योजक : श्री. वैभव महाले

        नाशिकच्या कॉलेजरोड स्थित येवलेकर मळ्यातील ब्रँडस् झेड ऑन वेब ही कंपनी वेबसाईट डिझाईन, डेव्हलपमेन्ट आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहे. ही कंपनी उच्चशिक्षित श्री.वैभव महाले यांनी २०१९ मध्ये स्थापन केली असून अल्पावधीत त्यांनी या क्षेत्रात भरारी घेतली आहे. 


   ब्रँडस् झेड ऑन वेब कंपनी काय सेवा पुरवते या माझ्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले की, ब्रँडस् झेड ऑन वेब  ही कंपनी वेबसाईट डिझाईन, डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक्स डिझाईन, डेटा प्रोसेसिंग,डोमेन रजिस्ट्रेशन, वेब होस्टिंग,वेब अँप्लिकेशन, प्रॉडक्ट्स सबमिशन, ३६० डिग्री व्हरच्यूअल टूर, डिजिटल व्हिडिओग्राफी, प्रॉडक्ट्स फोटोग्राफी इ.अनेक सेवा पुरवते. आमच्या व्यवसायाच्या नावातच सर्व काही आहे. आम्ही इतरांच्या व्यवसायाची ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग करून देतो. ज्याने त्यांच्या व्यवसायाची माहिती संपूर्ण जगात पोहचू शकते. त्याद्वारे प्रत्येक व्यक्ती त्या सेवेचा किंवा प्रॉडक्ट्सचा उपयोग करू शकत असल्याचे श्री. वैभव महाले यांनी स्पष्ट केले. 

           श्री. वैभव महाले यांचे शिक्षण कॉम्पुटर सायन्समध्ये एम.एस्सी झाले असून त्यांनी प्रथम एका नामांकित आय. टी. कंपनीत काम केले. डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदावर कामाची सुरुवात केली. तिथे आपल्या कौशल्याच्या जोरावर मॅनेजर या पदापर्यंत जाऊन पोहचले. त्यात खूप शिकायला मिळाले. नंतर स्वतः चा व्यवसाय करावा या इर्षेने  ब्रँडस् झेड ऑन वेब या कंपनीची स्थापना केली. श्री. महाले साहेबांना डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात पहिल्यापासून आवड होती. काहीतरी नवीन करण्याची जिद्द होती म्हणून त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला आणि आज तो ईश्वर कृपेने माझ्या सर्व सहकाऱ्यांमुळे यशस्वीरीत्या चालवला जात असल्याचे श्री.महाले यांनी सांगितले. डिजिटल मार्केटिंग क्षेत्र आव्हानात्मक असून येथे दररोज काहीतरी नवीन शिकण्याची संधी प्राप्त होते. या क्षेत्रात रोज नित्यनवीन बदल घडत असतात.काम करण्याची पद्धत व त्यामागील कल्पकता दाखवावी लागते.म्हणून त्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारीही कुशल,कल्पक आणि हुशार असल्याचे मला जाणवले. त्यांच्या या कामात त्यांच्या सुविद्य पत्नीचीही साथ लाभत आहे.


           सध्या डिजिटल मार्केटिंगच्या युगात ग्राफिक्स डिझाईनचे बेसिक ज्ञान प्रत्येक उद्योजकाने घेणे फार आवश्यक आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाचे विविध प्लॅटफॉर्मबाबत सुद्धा माहिती असणे गरजेचे आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब व  इतर अनेक गरचेची प्लॅटफॉर्मचा व्यावसायिक उपयोग करणे आवश्यक असल्याचे श्री.महाले यांनी सांगितले. हे प्लॅटफॉर्म काय कार्य करतात? आपला बिझनेस वाढवण्यासाठी त्यांचा कसा उपयोग केला पाहिजे. त्यांच्या मदतीने आपण आपला बिझनेस वाढवू शकत असल्याचे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. जसे कि ग्राफिक्स डिझाईनने आपण आपल्या व्यवसायाचे लोगो डिझाईन, पॅम्पलेट, ब्रोशर, इ.आपण करू शकतो. परिणामकारकरीत्या  आपण आपल्या प्रॉडक्टचे फोटो, माहिती देऊ शकतो. वेबसाइट डिझाईनमुळे आपण आपल्या व्यवसायाची संपूर्ण माहिती लोकांना डिजिटल स्वरूपात देऊ शकतो. 

          आपण तयार केलेल्या वेबसाइटचे मार्केटिंग आपण "एस.इ.ओ" ( सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन) या सेवेने करू शकतो. तसेच आजच्या युगात सोशल मीडियाला खूप महत्व प्राप्त झाले आहे, त्याच सोशल मीडियाच्या मदतीने आपण आपल्या व्यवसायाचा संपुर्ण जगात प्रचार आणि प्रसार करू शकतो. आपण आपल्या व्यवसायाची लेखी, व्हिडिओ तसेच चित्र स्वरूपातील जाहिरात इतर वेबसाइट किंवा आप्लिकेशन वर दाखवू शकतो. त्याद्वारे आपले प्रोमोशन करू शकतो. याला एस.इ.एम. (SEM) असे म्हटले जाते. आपण वेब अँप्लिकेशनद्वारे आपल्या व्यवसायास डिजिटल करू शकतो. आपला व्यवसाय विविध प्रकारच्या वस्तू विकण्यावर आधारीत असेल तर आपल्या वस्तू ऑनलाईन विकण्याकरता काही वेबसाईटस् आहेत. तिथे आपण आपल्या वस्तू संपूर्ण जगात विकू शकतो. त्याकरिता प्रॉडक्ट सबमिशन (Products submission) ही सेवा दिली जात असल्याचे श्री. वैभव महाले यांनी सांगितले. 

      आजच्या घडीला लोकांपर्यंत आपल्या व्यवसायाची वास्तू किंवा जागा कशी आहे. त्यात कशा सोयी सुविधा आहेत. हे दाखवण्याकरिता एक उपयुक्त व प्रभावशाली साधन म्हणजे ३६० डिग्री व्हरच्यूअल  टूर (३६० degree virtual tour) हे आहे. सोशल मीडियावर याचे उत्तम सादरीकरण केल्यास या द्वारे आपण आपला व्यवसाय वाढवू शकत असल्याचे श्री. महाले यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियाला आजच्या डिजिटल युगात कमालीचे महत्व प्राप्त झाले आहे. त्याद्वारे लोकांना जोडण्याचे साधन म्हणजे व्हिडीओ हे आहे. यातही खूप आमूलाग्र बदल झाले आहेत. आज लोकांना सर्व काही वेगाने हवे आहे. जसे की एखादी सेवा देण्यासाठी आपण व्हिडीओग्राफीचा वापर करू शकतो. जे ग्राहकांना खूप कमी शब्दात आणि कमी वेळेत व्यवसायाची माहिती सोशल मीडियावर पुरवत असल्याचे श्री.महाले यांनी सांगितले. अशा असंख्य डिजिटल सेवा आहेत.ज्याद्वारे ते प्रत्येक व्यावसायिकाला त्याचा व्यवसाय वाढवण्याकरिता मदत करतात. तसेच त्यांच्या ग्राहकांना हवे ते मिळवून देण्याकरिता मदत करत असतात. 

       श्री. वैभव महाले हे ब्रँडस् झेड ऑन वेब या कंपनीव्दारे विविध क्षेत्रातल्या ग्राहकांना गरजेनुसार सेवा पुरवतात.वेबसाईट डिझाईन,डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक्स डिझाईन ह्या सेवेत तर त्यांचा हातखंडा आहे. अनेक वस्तू विक्री करणारे व्यावसायिक आहेत. त्यांना वेगवेगळ्या नामांकित इ.कॉमर्स वेबसाइटवर प्रॉडक्ट्स सबमिशन करून देतात.  शोरूम असेल त्या व्यावसायिकाला त्यांची नवीन सेवा ३६० डिग्री व्हरच्यूअल  टूर ही सेवा उपलब्ध करून देतात. ग्राहकाला मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये संपूर्ण शोरूम दिसते. सणासुदीच्या दिवसात किंवा काही विशेष प्रसंगी व्यावसायिकांना त्यांच्या ग्राहकांना शुभेच्छा द्यायच्या असतात. व त्यांच्या व्यवसायाच्या विशेष सुवर्णसंधी सांगायच्या असतात त्यासाठी  ग्राफिक्स डिझाईन ही सेवा पुरवतात. यात आकर्षक बॅनर्स डिझाईन करून दिले जातात. जे सोशल मीडियाचे विविध प्लॅटफॉर्म जसे कि फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब व  इतर प्लॅटफॉर्मवर सादर केले जाते. जेणेकरून ग्राहकांना याबद्दल माहिती होते. विविध हॉस्पिटलला त्यांच्या वेबसाइटची डिजिटल मार्केटिंग करून देतात. त्यांनी दिलेल्या सेवेत सातत्य, कल्पकता असल्याचे त्यांच्या क्लायंटनी सांगितले आहे. 

          आजच्या एकविसाव्या शतकात सर्वाना आपला व्यवसाय हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचे आव्हान आहे. आजच्या या गतिशील युगात सर्वांनाच पुढे जायची व आपला व्यवसाय वाढवण्याची एक चढाओढ लागली आहे. याकरिता पारंपारिक मार्केटिंग पद्धती अपुऱ्या व मर्यादित आहे. आपल्या ग्राहकापर्यंत पोहाचण्याकरिता या पद्धती पुरेश्या नाहीत. त्यामुळे आजच्या युगात डिजिटल मार्केटिंग किंवा ब्रॅण्डिंग ही ग्राहकांपर्यंत पोहोचणारी एक अतिशय उपयुक्त व लाभदायक पद्धत आहे जिचा वापर असंख्य लोक त्यांच्या व्यवसायवाढीसाठी व ग्राहकांना त्याचा फायदा व्हावा यासाठी सर्रास वापर करतांना दिसून येतात. ग्राफिक डिझाईन ही गरज प्रत्येक व्यावसायिकाला असते. लोगो,सिम्बॉल, प्रॉडक्ट माहितीसाठी नवनवीन रंगात डिझाईनमध्ये क्रिएटिव्हीटी प्रदान करण्याची गरज व्यावसायिकाला असते. वेबसाईटची गरज ही  आपल्या व्यवसायाची इत्यंभूत माहिती ग्राहकापर्यंत पोहचवण्यासाठी असते आणि  डिजिटल मार्केटिंग हे आपल्या व्यवसायाचा प्रचार व प्रसार करण्याकरिता एक उत्तम साधन आहे. याचा प्रत्येक उद्योजकाने यथायोग्य लाभ उठविणे गरजेचे असल्याचे श्री. महाले यांनी स्पष्ट केले. 

     श्री. वैभव महाले सरांना या डिजिटल सेवा देण्याबरोबरच शिकवण्याचीही आवड आहे. त्यासाठी ते क्लासेससुद्धा घेतात. त्यांच्याकडे डिझाईन आणि डेव्हलपमेन्ट, डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक्स डिझाईन, डेटा प्रोसेसिंग, वेब अँप्लिकेशन, डेटा सायन्स, नेटवर्किंग या विषयाचे क्लास घेतले जातात.  सध्या या सर्वच क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध आहे. या क्षेत्रात कंपनीत काम करण्यापासून ते उद्योजक होण्याची देखील संधी आहे. श्री. वैभव महाले सर्व तरुणांना आवाहन वजा विनंती करतात की डिजिटल माध्यमात काम करण्याच्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा. या क्षेत्रात जास्तीत जास्त तरुण तरुणींनी यावे. स्वयंरोजगाराची संधीही या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या व्यवसायाच्या अधिक माहितीसाठी www.brandzweb.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. 

 © दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com
www.digitalkrushiyog.com
digitalkrushiyog@gmail.com 

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...