name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): डाळिंब परिसंवादातील महत्वाच्या शिफारसी (Important recommendations from the Pomegranate Symposium)

डाळिंब परिसंवादातील महत्वाच्या शिफारसी (Important recommendations from the Pomegranate Symposium)

डाळिंब परिसंवादातील महत्वाच्या शिफारसी
Important recommendations from the Pomegranate Symposium

Dalimb parisanvadatil mahatvachya shifarasi

      

  डाळिंब हे फळपीक अत्यंत कमी पाऊस आणि हलक्या ते मध्यम जमिनीत येते. तसेच डाळिंबापासून भरघोस, निर्यातक्षम उत्पादन मिळत असल्याने आपल्या राज्यातील कोरडवाहू प्रदेशातील अहिल्यानगर, सोलापूर, पुणे, नाशिक, बीड, उस्मानाबाद मधील शेतकऱ्यांसाठी हे फळपीक वरदान ठरले आहे. 

     आपल्या राज्यातील क्षेत्र आणि उत्पादनाचा विचार करता महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने गणेश, मृदुला, आरक्ता आणि भगवा या डाळिंब जातीची लागवड केली जाते. 

      डाळिंब या फळ पिकामध्ये तीन बहार येत असल्यामुळे शेतकरी आपल्याकडे असलेल्या उपलब्ध निविष्ठा आणि बाजारपेठेचा विचार करून बहार धरतो. मंडळी कमी पाणी, हलक्या जमिनीत चांगले उत्पादन आणि निर्यातक्षम फळांचे उत्पादन यामुळे डाळिंब लागवडीखालील क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली. मात्र मागील दोन ते तीन वर्षापासून या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असून त्यामुळे डाळिंब दर्जा आणि उत्पादन खालावत चालले आहे. 

डाळिंब उत्पादकाला सतावत असलेल्या समस्या

१) मर रोग

२) तेलकट डाग रोग

३) सुत्रकृमींचा प्रादुर्भाव आणि

४) फुलगळ 

    या समस्येच्या निवारणासाठी सविस्तर चर्चा आणि त्याचा फायदा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना व्हावा म्हणून नाशिक जिल्ह्यातील विठेवाडी येथे अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघ आणि वसंतदादा साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने डाळिंब परिसंवाद आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याचे उद्घाटन तत्कालीन केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार यांनी केले. मार्गदर्शन करण्यासाठी डाळिंब तज्ज्ञ तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. 

  या परिसंवादामध्ये डाळिंब उत्पादकासमोरील चार समस्यांच्या निवारणाविषयी ज्या शिफारशी करण्यात आल्या त्या अशा 

१) मर रोग

  • लागवडीचा खड्डा २५ टक्के शेणखत आणि २५ टक्के वाळूनी भरावा. 
  • रोप दर्जेदार खात्रीशीर रोपवाटिकेतून निवडावीत
  • रोपे रोगग्रस्त नसावीत 
  • फ्युजसियम बुरशी व्यवस्थापनाकरीता ०.१ टक्के कार्बेनडेझिमचे द्रावण खोडाजवळ आळ्यात ओतावे. 
  • ट्रायकोडर्मा २५ ग्रॅम प्रति झाड ५ किलो शेणखतात मिसळून द्यावे. 
  • ट्रायकोडर्मा बुरशी वाढीसाठी २ किलो शेणखत प्रति झाड खोडाजवळ मातीत मिसळून द्यावे. 

२) तेलकट डाग रोग

  • शिफारशीत योग्य अंतरावर (४.५ X ३.० मी) डाळिंब लागवड करावी.
  • निरोगी गुटी कलमाचा वापर करावा
  • वाढीच्या अवस्थेत ३ ते ४ खोड ठेवून धूमारे वरचेवर काढावेत.
  • झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल. बागेत सतत हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
  • रोगग्रस्त पाने, फुले, खोड गोळा करून ते नष्ट करावेत. 
  • १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी छाटणीनंतर करावी. 
  • बोर्डों मिश्रणाच्या फवारणीनंतर १० दिवसाच्या अंतराने स्ट्रेप्टोसायक्लीनची फवारणी करावी. 

३) सुत्रकृमी

  • बहार धरताना हेक्टरी १.५ ते २ टन निंबोळी पेंड मिसळावी 
  • अथवा कार्बोफ्युरॉन ३ टक्के हेक्टरी १३५ किलो मिसळावे. 
  • किंवा फोरेट १० टक्के ४० कि. हेक्टरी मुळाजवळ मातीत मिसळून द्यावे. 
  • पँसिलोमायसिस आणि ट्रायकोडर्मा पावडर ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात झाडाच्या बुंध्यापाशी जमिनीत ओतून द्यावी. 
  • डाळिंब बागेत हिरवळीच्या खतासाठी ताग, धेंचाचा वापर करावा. 
  • प्रादुर्भावग्रस्त भागात झेंडूची लागवड करावी

४) फुलगळ

  • डाळिंबाचा वर्षातून एकच बहार घ्यावा.
  • बहार धरताना नेहमी हलकी छाटणी करावी.
  • बहार संपल्यानंतर झाडाला खत आणि पाणी नियमित घ्यावे. 
  • बाग नेहमी स्वच्छ ठेवावी.
  • जास्त पाणी किंवा ताण देवू नये. 
  • महत्वाच्या किड रोगाचे वेळीच व्यवस्थापन करावे. 

  या महत्वाच्या समस्यांशिवाय या परिसंवादामध्ये डाळींबासाठी ठिबकचा वापर, निर्यातक्षम डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान याविषयी सविस्तर चर्चा झाली. याचा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घेतला. 


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...