name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): November 2022

भरड धान्य प्रक्रिया उद्योगातून घडलेले यश : समृद्धी अॅग्रो ग्रुपच्या सौ. सरोजिनी फडतरे यांची प्रेरणादायी कथा I Multigrain Processing Success Story – Sau. Sarojini Fadtare


भरड धान्य प्रक्रिया उद्योगातून घडलेले यश : समृद्धी अॅग्रो ग्रुपच्या सौ. सरोजिनी फडतरे यांची प्रेरणादायी कथा  

Multigrain Processing Success Story – Sau. Sarojini Fadtare


           "कृषिमू्ल ही जीवनम्" या उक्तीनुसार भारतीय संस्कृती विकसित झाली आहे. म्हणूनच शेती ही भारतातील शेतकऱ्याची जीवनशैली म्हणून ओळखली जाते. भारताला वैविध्यपूर्ण हवामानाच्या देणगीमुळे भारत नेहमी कृषीप्रधान देश राहिला आहे. भरड धान्याचा विचार करता भारतामध्ये ८०पेक्षा जास्त जाती आपल्या आहाराचा भाग आहेत.  हरितक्रांतीच्या काळामध्ये भरड धान्याची लागवड मागे पडली. त्यावेळी आव्हान होते ते म्हणजे जनतेची भूक भागविणे. याच काळात तांदूळ आणि गहु आयात करण्यात येवून त्याला सरकारचे धोरणात्मक सहकार्य मिळाले. यामुळे भरड धान्य आहारातून हळु हळू मागे पडले. गहु आणि तांदूळ याच्यावरील संशोधन, जागरूकता, खप, उत्पादन विकास जसा झाला तसा इतर भरड धान्याचा झाला नाही. सार्वजनिक वितरण व्यवस्था ही गहु आणि तांदूळ यांच्यासाठी पूरक झाली. त्यामुळे भरड धान्य ही गरिबांचा सामाजिक सामना करीत राहिली. हळू हळू भरडधान्याची लागवडही मंदावत गेली.


पोषक धान्ये

       आज समाजामध्ये व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन ई, तंतुमय पदार्थ, पौष्टिक मूल्य यांसारख्या अनेक कारणांनी आहारात कमतरता आली, त्यामुळेच जीवनशैलीचे अनेक आजार जसे की मधुमेह, रक्तदाब, संधिवात, पित्त, हार्ट समस्या दिसून येतात. या समस्येवर मात करण्यासाठी व भारताचे आरोग्य सुधारण्यासाठी भरड धान्याला, त्याचे पैष्टिकतेचे महत्व ओळखून भारत सरकारने पोषक धान्ये म्हणून राजपत्रात प्रसिद्ध केले आहे.
          
महाराष्ट्राचा विचार करता, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम भागात ज्वारी, बाजरी मोठ्या प्रमाणात घेतली जाते. कोकण, सह्याद्री पर्वताच्या रांगा यामध्ये प्रामुख्याने नाचणी, वरी यासारखी पिके घेतली जातात. बदलती जीवनशैली, खाण्याच्या सवयी यामुळे मागील तीन दशकांपासून ज्वारी, बाजरी, नाचणी हे मुख्य अन्न म्हणून खाण्यात कमी येत आहे. याला कारण वाढतं शहरीकरण, औद्योगिकरण, मॉडर्न संस्कृतीचे अनुकरण, आणि यात भर म्हणून की काय शासन स्तरावरून फक्त गहु आणि तांदूळ यांच्यासाठी प्रोत्साहन देणे. अशा प्रकारे भरड धान्य आहारातून हळु हळु कमी झाले आहे.      
       
पुढील येणारे २०२३ हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक भरड धान्य वर्ष म्हणून साजरे होत आहे. त्या अनुषंगाने महाराष्टातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात संधी चालून आल्या आहेत. शेजारील राज्यांमध्ये भरड धान्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार झाला तसा तो महाराष्ट्रात झाला नाही. आज आपल्या येथे बोटावर मोजण्याइतके भरड धान्य प्रक्रिया प्रकल्प आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संधी आहेत. जागतिक बाजापेठेतील वाढत्या ग्लूटेन फ्री पदार्थांमुळे भरड धान्यात प्रचंड मोठी संधी आहे.कोरोनानंतरच्या काळात आरोग्याविषयी भरपूर जागरूकता निर्माण झाली आहे. भरड धान्यात असलेल्या पोषक तत्वामुळेच प्रक्रियायुक्त उत्पादनांना मागणी वाढली आहे. म्हणूनच या संधीचा फायदा घेत तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे.


भरड धान्याचे फायदे

       भरड धान्याचे खूप मोठे फायदे आहेत. फायबरचे प्रमाण अधिक असल्याने मधुमेह,रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. प्रथिनाचे प्रमाण अधिक आहे.  भरड धान्य कमी कालावधीत तयार होत असल्याने दुष्काळ सहन करण्याची ताकद त्याच्यात असते त्यामुळं ती शेतकरी बांधवासाठी फायदेशिर आहेत. 

    हीच संधी लक्षात घेऊन महाराष्ट्रात कृषी विभागाने भरड धान्य विकास कार्यक्रमाची योजना २०१२ साली सुरू झाली. ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखे भरडधान्यावर प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार व्हावीत. यासाठी भरड धान्य विकास योजना सुरू करण्यात आली. या योजनेविषयी अधिक माहिती घेता भरड धान्यापासून काही प्रक्रियायुक्त उत्पादने बनवण्याची कल्पना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सौ. सरोजिनी तात्यासाहेब फडतरे यांनी सुचली. या क्षेत्रात नावीन्य असले तरी त्यात व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतील असा विश्वास सौ. फडतरे यांनी व्यक्त केला आणि व्यवसायाची मुहर्तमेढ रोवली.पूर्ण वेळ मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.


समृध्दी अॅग्रोची भरड धान्य प्रक्रिया
       
समृद्धी अॅग्रो समूहाने २०१० पासून भरड धान्यप्रक्रिया सुरू केली. उत्पादनाच्या चवीशी कोणतीही तडजोड न करता भारताला निरोगी आणि तंदुरुस्त बनवण्याच्या प्रयत्नात समृद्धी अॅग्रो ग्रुपने नेहमी अस्सल आणि शुद्ध सेंद्रिय उत्पादने आणण्याचे मिशन ठेवले त्यादृष्टीने आम्ही झपाटल्यागत कामाला लागलो असल्याचे सौ. फडतरे यांनी स्पष्ट केले. संघर्षातून समृद्धीकडे वाटचाल सुरू केली. ही वाटचाल करत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. 

संसाराचा व्याप वाढल्याने पतीच्या महाविद्यालयाच्या नोकरीच्या पगारात पुरेनासे झाले. म्हणून सरळगाव सोडले आणि थेट हैद्राबाद येथे ई टीव्हीच्या अन्नदाता या नियतकालिकात ते उपसंपादक म्हणून रूजू झाले. २००६ ते २००८ ह्या दोन वर्षात हैद्राबादमधली भाषा आणि खाद्य संस्कृती यांचा मेळ काही बसेना. खूप दूर आल्यासारखी भावना सतत व्हायची म्हणून तिथेही राजीनामा देऊन पुण्यात एक कृषीविषयक नियतकालिकात पतीनी उपसंपादक म्हणून काम सुरू केले. शेती प्रक्रिया उद्योग चालू करावा असे मला वाटायचे. आयुष्यात काहीतरी नविन करण्याचं पक्क केलं.
         
उद्योजक होण्याचं पहिलं पाऊल उचलल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले. मी २०१० साली घरूनच ज्वारी, बाजरी, नाचणी आणि गहू पिठांची विक्री सुरु केली. पिठाची डिलिव्हरी पती कामावर जाताना देत असत असे रूटीन चालू केले. पतीचे  बचत गटांना प्रॉडक्ट बनवण्याचे आणि मार्केटिंगचे प्रशिक्षण देण्याचे काम होते. ह्या कामात त्यांच्या खूप ओळखी झाल्या. त्यांनी सात राज्यांचा जवळून अभ्यास केला.सन २०१२ मध्ये संधी चालून आली. 

कृषी विभागाने भरडधान्य विकास कार्यक्रमाची योजना सुरू केली. ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या धान्यांवर भरड प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार करण्याची कल्पना अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेतून पुढे आली आणि हे क्षेत्र नाविन्यपूर्ण असून यात व्यावसायिक संधी भरपूर निर्माण करता येतील अशी आशा पल्लवित झाली. विचारांती मी पूर्णपणे आणि पूर्णवेळ या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले. वडापुरी ता. इंदापूर जि. पुणे येथे दहा जणांचा बचतगट केला.

 
विक्रीचे व्यासपीठ
           
आमचे मार्गदर्शक दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मगर साहेब यांचे मदतीने बचत गट स्थापन केला आणि माझ्या उद्योगाचा श्रीगणेशा झाला. आमच्या कष्टाची पराकाष्ठा सुरू झाली. मी होम सायन्स पदवीधर असल्याने सर्व उत्पादनाचा प्रयोग आधी  घरात होत असे. त्यात यश आल्यानंतर मोठ्या प्रमाणात ते करत असू. २०१२ मध्ये पुण्यात भरलेल्या कृषी प्रदर्शनात आमच्या उत्पादनांना विक्रीसाठी पहिले व्यासपीठ  मिळाले. ज्वारीच्या चकल्या, शंकरपाळ्या, इडली हे पदार्थ केले. आणि स्टॉलवर उपलब्ध केले. पण आम्हा दोघांना नोकरीचाच अनुभव गाठीशी असल्याने ग्राहकांपर्यंत पोहोचताच येईना. 

ग्राहक स्टॉलजवळ आले की संकोचून मान खाली घालून आम्ही दोघेही उभे असायचो. ही बाब कृषी अधिकारी अर्जुन फुले यांच्या लक्षात आली. त्यांनी तेथेच पहिला धडा शिकवला. ग्राहकांनी काही घेवो किंवा न घेवो, त्यांना आपले प्रॉडक्ट देऊन धीटपणे संवाद साधायचा. आपली उत्पादने समजून सांगायची. त्याप्रमाणे आम्ही मार्केटिंग करायला लागलो. आणि काय आश्चर्य...पहिल्याच दिवशी नऊशे रुपयांची तर चार दिवसात साडे चार हजार रुपयांची  विक्री झाली असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले.

 
होम डिलिव्हरीचा प्रारंभ
              
या प्रसंगाने आमचा आत्मविश्वास दुणावला आणि ग्राहकांचे जाळे आम्ही प्रदर्शनाच्या माध्यमातून खूपच वाढवले. त्यातूनच पुण्यातील एका महिलेने पन्नास जणांसाठी ज्वारीच्या इडलीची ऑर्डर दिली. ती सर्व इडली आम्ही घरी बनवून पोहोच केली आणि होम डिलिव्हरीचा टप्पा सुरु केला. त्याच दरम्यान कोकणातील एक इडलीची ऑर्डर आली आणि आता कोकणात कशी द्यावी हा प्रश्न पडला. मग मी त्यांना म्हणालो की मी पीठ तयार करून देते , तुम्ही ते भिजवून इडली तयार करा. अशा तऱ्हेने इडली मिक्सचा जन्म झाला. 

ग्राहकांची नाडी ओळखून प्रक्रियेचे पुढचे दालन खुले केले असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले. आमच्या उद्योगाचे स्वरूप २०१३ मध्ये विस्तारले. देवळाली प्रवरा येथे 'समृद्धी ऍग्रो ग्रुप' या नावाने धान्य ग्रेडिंगचे युनिट सुरू केले. खरंतर ज्वारी, बाजरीच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळणे सोपे नव्हते. पण उत्पादनांच्या विक्रीबरोबरच ही उत्पादने कधी आरोग्यदायक आहेत ते आम्ही ग्राहकांना समजून देत होतो.  नाचणीतील लोहामुळे मुलींमधील रक्तक्षय कमी होण्यास मदत होते. ज्वारी आणि बाजरीतील कर्करोग, मधुमेह प्रतिबंधात्मक गुणधर्म मी ग्राहकांना पटवून देत होते. आरोग्यदायी अन्नाची संकल्पना लोकांमध्ये रुजवण्यास सुरुवात केली. आमच्या या कामाची वाखाणणीही समाजात व्हायला लागली असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले. 

नाविन्यपूर्ण उत्पादने
        
आमची उत्पादने जसे ज्वारीचा रवा, पोहे, इडली मिक्स, ज्वारी चिवडा, बाजरी पोहे, नाचणी रवा, इडली व डोसा मिक्स, ज्वारी बाजरी नाचणीची पिठं यांची गुणवत्ता सर्व निकषांच्या कसोटीवर उतरली आणि त्यांना भारताबाहेरही जसं की अमेरिका, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण आफ्रिका या ठिकाणीही बाजारपेठ मिळाली आहे. आता मिश्रधान्यांचे कुरकुरेही सुरु केले आहेत. 

या सर्व उत्पादनांना ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.तो पुढेही मिळणार असा विश्वास सौ. फडतरे यांनी व्यक्त केला. ही उत्पादने जे केवळ इष्टतम पोषणच नाही तर तुमच्या खाद्यपदार्थांच्या प्रोफाइलला अनुकूल चवदेखील देतात. . समृद्धी अॅग्रो ग्रुप वर्षानुवर्षे नाविन्यपूर्ण उत्पादने आणण्यासाठी काम करत आहे, भरड धान्याच्या उत्पादनांपासून ते मल्टीग्रेन ब्रेकफास्टचे पर्याय, सेंद्रिय आणि आरोग्यदायी फ्लेक्स ते फायबर समृद्ध अन्न, विविध प्रकारचे पीठ ते मल्टीग्रेन मिक्स, पफ, स्नॅक्स जे केवळ निरोगी आणि चविष्ट खाद्यपदार्थांमधील रेषा अस्पष्ट करत नाहीत तर भारतीयांसाठी एक विश्वासार्ह जीवनशैली तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही समाजातील प्रत्येक घटकाला सेवा देण्यास सक्षम आहोत याची खात्री करण्यासाठी आम्ही आमच्या उत्पादनांचे सतत निरीक्षण करतो. कनिष्ठ वर्ग, मध्यमवर्ग किंवा उच्च वर्ग या प्रत्येकालाच आमची उत्पादने मनापासून आवडत असल्याचे सौ.फडतरे यांनी सांगितले.समृद्धी अॅग्रो ग्रुपचा सर्वात चांगला भाग हा आहे की ते देशभरात आणि परदेशातही मापदंडांच्या अधीन राहून  वितरण करतात.
      
समृध्दी एग्रो ग्रुप सध्या ज्वारी चिवडा, ज्वारी पोहे, ज्वारीचे इडली मिक्स, नाचणीचे इडली मिक्स, डोसा मिक्स, ज्वारीचा रवा, नाचणीचा रवा,  भरड धान्याचे पीठ, असे अनेक पदार्थ तयार  करते. त्यांनी कुटुंबानुसार पदार्थाचे पॅकिंग आकर्षक बनविले आहे. आज त्यांना भारताबाहेर यूएसए, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण आफ्रिका या देशातही बाजारपेठ मिळाली आहे. लवकरच आम्ही इतर देशांतही आपली उत्पादने पाठविणार असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले.

 
दर्जेदार उत्पादने
       
जेव्हा आपण राज्याबाहेर आणि परदेशातही पदार्थ पाठवताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे, जसे की, त्या देशातील प्रमाणित मानके काय आहेत. प्रायमरी पॅकिंग आकर्षक आणि योग्य, माहितीपूर्ण पाहिजे. आवश्यकतेनुसार प्रमाणपत्र पडताळणी करणे आवश्यक आहे. 

आपल्या मालाचे भाव हे शक्यतो भारतीय रुपयात घेणे सोयीस्कर आहे. आम्ही आमचे सर्व धान्य आणि आवश्यक असलेला कच्चा माल शेतकर्‍यांकडून त्यांना बाजारपेठेत मिळणाऱ्या दरापेक्षा जास्त दराने घेत असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले. आमचा लाल बहादूर शास्त्रींच्या "जय जवान, जय किसान" या उक्तीवर विश्वास आहे. आमचे शेतकरी आणि त्यांच्या नैसर्गिकरित्या पेरलेल्या आणि सेंद्रिय कच्च्या मालाच्या मदतीने आम्ही जगभरातील आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्कृष्ट दर्जाची सेंद्रिय उत्पादने तयार करत असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले.
        
    मूल्यवर्धित कच्च्या धान्याच्या सोयीस्कर आणि त्रासमुक्त खरेदीसाठी एकूण ३० पेक्षा जास्त शेतकरी उचित किंमतीच्या कराराच्या आधारावर भरड धान्य उत्पादन पुरवित आहेत. बाजारातील उपलब्ध दराच्या तुलनेत उच्च दर्जाच्या भरड धान्याच्या बदल्यात आमच्याकडून अधिक किमती ऑफर केल्या जात आहेत.

 
विविध आव्हाने
     
या क्षेत्रात अनेक आव्हाने असल्याचेही त्यांच्याशी बोलताना लक्षात आले. आज समाजामध्ये आरोग्याविषयी जागृती अभियान राबविणे आवश्यक आहे, भरडधान्याविषयी अनेक कारणांनी उदासीनता दिसून येत आहे. शासकीय व खाजगी स्तरावर सतत याबद्दल अधिक प्रसिद्धी मिळाली पाहिजे. छोट्या उद्योजकाला कमी वेळेमध्ये सुलभतेने कर्ज पुरवठा होत नाही. एका छोट्या गावात तयार करण्यात आलेल्या मालाची विक्री शहराच्या ठिकाणी करण्यासाठीं सोईचा अभाव आहे. 

आज बदलत्या परिस्थितीत विक्री कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे, म्हणून क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेंतर्गत जागरूकता निर्माण करून मोठ्या प्रमाणात भरड धान्याची जाहिरात होणे गरजेचे आहे.  हे काम छोट्या उद्योजकाला परवडणारे नाही. म्हणून पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक भरड धान्य वर्षां तरुणांनी पुढाकार घेऊन या आरोग्यदायी अन्न व्यवसायात यशस्वी भरारी घेण्यासाठी आताच पाऊले उचलली पाहिजेत.


शून्यातून उभा केला प्रकल्प
          
 आपल्या दिनक्रमाविषयी बोलताना सौ.फडतरे म्हणाल्या की, आमचा दिवस भल्या पहाटे सुरू होऊन रात्री उशिरा मावळतो. सर्वांचे कष्टच मला खरंतर समृद्धीकडे घेऊन आले. आमच्या वेलीवर आलेली दोन फुलं,माझ्या दोन्ही कन्या ह्यांनी ही त्यांचं बालपण आमच्या फरफटीत घालवले. 

चिकाटी आणि जोखीम पत्करण्याची तयारी, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि मित्रांच्या शुभेच्छा असल्याने मानहानी, संयमाची परीक्षा पाहणाऱ्या कटू प्रसंगातही एकमेकांना सांभाळत आमच्या बरोबरच ज्वारीलाही समृद्धीचे दिवस आणण्यात आम्ही यशस्वी झालो असल्याचे सौ. फडतरे यांनी सांगितले.
       
    शून्यातून उभा केलेला हा प्रकल्प आता दिमाखाने आपली ध्वज पताका परदेशातही मिरवत आहे. सौ. फडतरे यांच्या कामात श्री. फडतरे यांनीही सर्वस्व झोकून दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली. २०१३ मध्येच त्यांना सहयाद्री वाहिनीचा नवउद्योजकांचा पुरस्कार मिळाला आणि प्रथमच दूरचित्रवाणी वर झळकले. पैशांपेक्षा प्रसिद्धी खूप लवकर मिळाली. २०१५ मध्ये आमच्या उत्पादनांचा संपूर्ण भारतातून  दुसरा क्रमांक आला. २०१९ मध्ये ऍग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले. असे अनेक पुरस्कार मिळाले.


भरडधान्यातील उत्कृष्ठ महिला उद्योजिका पुरस्कार   नुकताच ऑक्टोबर २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य पातळीवर स्टार्टअप यात्रा शेतीमध्ये काम करणाऱ्या प्रथम पारितोषिक महिला  म्हणुन एक लाख रु.व सन्मानचिन्ह असा पुरस्कार राज्याचे महामहीम राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते देण्यात आला. राज्यात १५ ऑगस्ट २०२२ ते १७ सप्टेंबर २०२२ दरम्यान महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेचा उद्देश महाराष्ट्रातील तळागाळातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे.नवसंकल्पनांना तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरवणे. राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे असा उद्देश होता.
          
या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील तळागाळातील अनेक उद्योजकांनी आपल्या कल्पना मांडल्या. यातून राज्य स्तरावर वेगवेगळ्या विभागातून २१ जणांची विजेते म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सरोजिनी तात्यासाहेब फडतरे यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांची भरडधान्यातील उत्कृष्ठ महिला उद्योजिका म्हणून राज्य पातळीवर निवड करण्यात आली आहे. यामुळे मिलेटच्या कामाला राजमान्यता मिळाली आहे. भरडधान्यातून प्रक्रिया उत्पादने करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णही केले. अजून त्यांना खूप मोठी झेप घ्यायची आहे. त्यांची उत्पादने गुड २ इट या ब्रँडखाली ऑनलाईन तसेच ऑफलाईन विक्रीसाठी आहेत.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

 

औद्योगिक प्रदूषणाचा प्रश्न बिकट: विकास हवा की भकास (Industrial Pollution)

औद्योगिक प्रदूषणाचा प्रश्न बिकट: विकास हवा की भकास   (Industrial Pollution)

कोणत्याही देशाच्या विकासामध्ये औद्योगिकरण महत्त्वाची भूमिका बजावते. खरं तर औद्योगिकरण करताना पर्यावरणाचा समतोल सांभाळणे गरजेचे आहे. मात्र, आजही अनेक उद्योगातून उघड्यावर किंवा नदी नाल्यात सांडपाणी सोडले जाते. कंपन्यांतून निघणारा धूर जगणे अवघड करून टाकतो. उद्योग, पायाभूत सुविधांसाठी नैसर्गिक संपदेचा विनाश केला जातोय. अशा वेळी विकास हवा की भकास, हा प्रश्न पडणे साहजिक आहे. विकास करताना तो समतोल, शाश्वत असायला हवा. उद्योग जगत याकडे निश्चितच लक्ष देईल अशी अपेक्षा आहे...

Indusrial pollution

पर्यावरणाचा सहसंबंध
     उद्योजकतेशिवाय औद्योगिक विकास होणे शक्य नाही. औद्योगिक विकास करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी प्रत्येक कारखानदाराने घेणे गरजेचे आहे. सतत धूर ओकणाऱ्या व दूषित पाण्याचे लोंढे बाहेर टाकणाऱ्या कारखान्यांमुळे पृथ्वीवर प्रदूषण होत असते. याला जबाबदार आपल्या कारखान्यात प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवून न घेणारे कारखान्याचे संचालक या गोष्टीस जबाबदार आहेत. औद्योगिक विकास करताना आपल्या देशासाठी अशा प्रकारचा विकास योग्य आहे का? या प्रश्नाकडे आज गांभीर्याने बघावे. कामगारांना विस्थापित करणे आणि पर्यावरणाचा विनाश करणे या दोन गोष्टी औद्योगिक विकासात टाळणे महत्त्वाचे आहे. 
       पर्यावरणाचा सहसंबंध औद्योगिक विकास आणि उद्योजकतेशी जेव्हा लावला जातो तेव्हा प्रथम उद्योजकता म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. उद्योजकता ही व्यक्तीच्या ठिकाणी असलेल्या अनेक गुणांची गोळाबेरीज होय. की जी व्यवसाय किंवा उद्योगक्षेत्रात येणाऱ्या व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. त्यातून त्यांचे कर्तुत्व फुलते आणि व्यवसायात यश प्राप्त होते. उद्योजकता हा उद्योग आणि व्यवसायाचा व्यवहारीक बाबींशी संबंधित असा भाग आहे की, ज्यात उद्योगाच्या उभारणीसाठी प्रकल्प आखणी, परवाना मिळवणे, भांडवल उभारणी, प्रकल्पाची रचना, उत्पादन घटकाचे संघटन, वस्तू व सेवांचे यशस्वीपणे विपणन करण्याचा समावेश होतो. 
पर्यावरणपूरक जीवनशैली 
      आज आपण मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास केला आहे परंतु आज समाजाने पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार केला पाहिजे. भारतातील एकंदर शेतजमिनीपैकी ६० टक्के भागात जमिनीची धूप होणे, पाणथळ साचणे व जमीन क्षारयुक्त बनली आहे. सध्या शेतीखाली ३०० लाख हेक्टर संवेदनशील जमिनीचे पोत वेगाने नित्कृष्ट होत आहे. प्रतिवर्षी वेगाने अवर्षण वाढत असून मातीची धूप होते त्यामुळे शेतीही धोक्यात आली आहे. अशा वेळी नैसर्गिक, सेंद्रिय, जैविक शेतीचा मोठ्या प्रमाणात अंगीकार करावा.
   औद्योगिक क्षेत्रात पुढारलेल्या देशात आता झपाट्याने औद्योगीकरण वाढल्यामुळे ऊर्जेचा दरडोई वापर वाढला आहे. भविष्यकाळातील ऊर्जेबाबतची परिस्थिती सुधारण्यासाठी एकीकडे ऊर्जेचा पुरवठा चिरंतन स्वरूपात वाढवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. कार्यक्षम उपयोग करून ऊर्जेची मागणी कमी करायला हवी. जीवाश्म इंधनापेक्षा पर्यावरणास कमी हानिकारक असणारे आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या अधिक न्याय्य वाटप करू शकता येणाऱ्या पुनर्नवीकरणक्षम ऊर्जा स्रोतांचा आपण विचार केला पाहिजे.
समस्या आणि दुष्परिणाम 
     पृथ्वीवरील तापमान वृद्धीचे दुष्परिणाम भारतीय उपखंडालाही जाणवत आहेत. कारखाने व वाहनांचे प्रदूषण वाढत असून जंगले नष्ट होत चालल्यामुळे वातावरणातील तापमान सातत्याने वाढत आहे. आपल्या देशातील अनेक भागातील पावसाचे प्रमाण दरवर्षी बदलत आहे. पर्जन्यवृष्टीच्या पद्धतीत बदल होत आहे. ढगफुटी होत आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. आज तर मोठया प्रमाणात शहरीकरण झाले आहे. शहरात एमआयडीसी असल्यामुळे रोजगार वाढला आहे. खेड्यातून अनेक लोक शहरात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे परिस्थितीजन्य अनेक समस्या आज शहरात उद्भभवल्या आहेत.
    कारखान्यात कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते. त्यातून उत्पादन निर्मिती केली जाते. तसेच सहउत्पादन म्हणजेच प्रदूषणासारखे निर्मिती प्रक्रियेतील अपरिहार्य परंतु अनिष्ट परिणाम काढले जातात. निर्मिती प्रक्रियेत उत्पादनास आवश्यक असलेल्या कच्च्या मालाबरोबरच ऊर्जा, पाणी इ.चा उपयोग केला जातो. तयार माल नंतर बाजारपेठेत पाठवला जातो. तेथून आपण तो विकत घेतो. कारखान्यातून बाहेर पडणारे प्रदूषण हा सर्वप्रथम आणि उघड दिसणारा परिणाम आहे. पाणी व वायूप्रदूषण व काही बाबतीत घनकचऱ्याचे प्रदूषण हे सहजपणे कोणालाही दृष्टीस पडते. संबंध जगात अशा प्रदूषण समस्येने अतिशय गंभीर स्वरूप धारण केले आहे. 
  

      वीस वर्षांपूर्वी भोपाळ येथील युनियन कार्बाईड कारखान्यात गंभीर स्वरूपाचा औद्योगिक अपघात घडल्यामुळे औद्योगिक दुर्घटनांकडे सर्व जगाचे लक्ष वेधले गेले. या अपघातात ४००० व्यक्तींचा मृत्यू ओढवला. तेथील लोकांच्या आरोग्यावर झालेले दुष्परिणाम आजही जाणवत आहेत. औद्योगिक अपघातांमुळे माणसे मृत्यू पावतात, जखमी होतात. पर्यावरणावर त्याचा परिणाम होतो व नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश होतो. 
    व्यवसायाशी निगडित आरोग्य समस्या जाणवू लागल्या आहेत. माणूस चरितार्थासाठी काम करतो परंतु काहीवेळा कामाची जागा किंवा कामाचे स्वरूपच आरोग्यास धोकादायक ठरते. उदा. कोळसा खाणीतील कामगार कोळशाची पूड नाकातोंडावाटे आत घेतो. आण्विक वीज केंद्रातील कामगारास आण्विक उत्सर्जनापासून सतत धोका असतो. गालिचे,काडेपेटी,फटाके अशा धोकादायक कारखान्यातील बालमजुरांची समस्या अतिशय गंभीर व काळजी करण्याजोगी आहे. 


कायद्यामार्फत अंमलबजावणी
      कार्यान्वित झालेल्या कारखान्याकडून पर्यावरणास हानी पोहोचू नये यासाठी भारतामध्ये अनेक नियम अस्तित्वात आहेत. या नियमानुसार सांडपाण्याचे प्रमाण, त्याची प्रत इ. गोष्टी ठरविल्या जातात. व कायद्यामार्फत त्याची अंमलबजावणी होते. त्यात जलप्रदूषण नियंत्रण कायदा, वायू प्रदूषण नियंत्रण कायदा, पर्यावरण संरक्षण व संवर्धन कायदा अशा महत्त्वाच्या कायद्यांचा समावेश आहे. या संदर्भात असलेले कायदे व नियम पाळले जातात. याविषयी खातरजमा करणे यासाठी सरकारकडून कायद्याची अतिशय कडक व नि:पक्षपाती अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे. कायद्याचा बडगा वापरण्यापेक्षा कारखाने स्वतःहून पुढाकार घेऊन पर्यावरणाची काळजी घेतील या दिशेने प्रयत्न करावे. पर्यावरणाबद्दलची जागरूकता शेवटी आर्थिकदृष्ट्या फायद्याची असते ही जाणीव करून देणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे.  काही कारखानदार अशा पर्यावरणाच्या बाबतीत अधिक दक्षता घेताना आढळून येतात. ही निश्चितच गौरवाची बाब आहे. 
    कारखान्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम फार मोठ्या स्वरूपाचे व गुंतागुंतीचेही असतात. शासन, उद्योजक व आपल्यासारख्या सामान्य जनतेने एकत्र येऊन आस्थापूर्वक योजनाबद्ध प्रयत्न केल्यास मार्ग निघेल. बऱ्याच ठिकाणी सामान्य लोकांनी याविरुद्ध आवाज उठवला आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. विकास हा मानव आणि पर्यावरण या दोन्हीशी संबंधित आहे हे आपल्या लक्षात येईल.
पर्यावरणपूरक औद्योगिक विकास 
      औद्योगिक विकासाद्वारे पर्यावरणाचा समतोल राखावा.  प्रचंड कारखाने, मोठ-मोठी धरणे, उत्तुंग इमारती भव्य पूल बांधून आणि वेगवान गाड्या किंवा संगणक निर्माण करून आपण विकास साधू शकतो का? आर्थिक प्रगती हा विकासाचा एक घटक आहे. त्यासाठी वरील सर्व गोष्टी आवश्यक ठरू शकतात. पण त्त्यावरच सारे प्रयत्न केंद्रित केल्यामुळे आणि तितक्याच महत्त्वाच्या दुसऱ्या घटकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा उलट परिणाम होऊ शकतो.
        जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व मूलभूत संसाधनाचे उगमस्थान पर्यावरण आहे. पर्यावरणातूनच उद्योगधंद्यांना कच्चा माल, लोकांसाठी अन्न, वाहतुकीसाठी इंधन या गोष्टी मिळतात. विकास कामातून निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ पुन्हा पर्यावरणातच सामावले जातात. म्हणजेच पर्यावरण हे विकासकामांचे उगमस्थान आणि अंतिम स्थानही आहे म्हणून उद्योजकतेतून औद्योगीक विकास साधताना पर्यावरण जोपासावे.


औद्योगिक प्रदूषण

औद्योगिक प्रदूषणाचा प्रश्न
दिवसेंदिवस होतो बिकट, 
गांभीर्याने घ्या आता
विचार प्राध्यान्याने सरसकट...

पर्यावरणाची हानी न होता 
घ्यावी काळजी उद्योजकाने, 
उर्जेचा दरडोई वापर 
झाला आता औद्योगीकरणाने...

परिस्थितीजन्य अनेक दुष्परिणाम
उद्योग व्यवसायात घडल्या
उत्पादन निर्मिती अत्यावश्यक 
प्रदूषण समस्या वाढल्या 

पर्यावरणाचा राखावा समतोल 
मुलभूत संसाधनेचे उगमस्थान 
उद्योजकतेतून औद्योगिक विकास 
पर्यावरण वाचवा, हेच अंतिम स्थान 

© दीपक केदू अहिरे, नाशिक

 deepakahire1973@gmail.com

www.DigitalKrushiyog.com

#औद्योगीकप्रदूषण #Industrialpollution

#पर्यावरणपूरकऔद्योगिकविकास 

#पर्यावरणविकासकामांचेउगमस्थान #उद्योजकता

#प्रदूषण #पर्यावरणाचा सहसंबंध






शेतीत क्रांती घडवण्यासाठी ड्रोनचा वापर | Smart Farming Drone Technology | Krishi Drone Yojana 2024–25

🌾 शेतीत क्रांती घडवण्यासाठी ड्रोनचा वापर | Drone For Smart Farming 

shetit kranti ghadvinyasthi dronecha vapar


    तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात शेती मागे राहिली नाही. आज कृषी क्षेत्रात “डिजिटल क्रांती” घडवणारा सर्वात प्रभावी बदल म्हणजे कृषी ड्रोनचा वापर.

आजचा शेतकरी हवामान, कीडरोग, अनिश्चितता आणि वाढते उत्पादन खर्च या सर्वांशी सामना करत असताना, ड्रोन त्याच्या हाताला नवी उंची देत आहेत.

शेतीतील फवारणी, सर्वेक्षण, पिकनियोजन, सिंचन व्यवस्थापन, रोग-निदान, उत्पादन अंदाज यांसाठी ड्रोन हे आधुनिक, सुरक्षित आणि अत्यंत उपयुक्त साधन बनले आहे.


🌤️ आधुनिक शेतीतील नवी क्रांती: Drone Enabled Smart Farming

shetit kranti ghadvinyasthi droncha vapar

पूर्वीच्या काळात शेतातील कामे पूर्णपणे मेहनतीवर अवलंबून होती. पण आज शेतकरी डिजिटल शेतीकडे वाटचाल करत आहेत.
ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेतकरी काही मिनिटांत:

  • शेताचा संपूर्ण हवेतून आढावा

  • पिकांच्या वाढीचे विश्लेषण

  • कीडग्रस्त भाग ओळख

  • खत/औषधांची समान फवारणी

  • पाण्याच्या गरजांची मोजणी

सहजपणे करू शकतात.


🌱 ड्रोन म्हणजे काय? आणि शेतीत त्याचा वापर कसा होतो?

shetit kranti ghadvinyasthi droncha vapar

ड्रोन हे मानवरहित हवाई यंत्र (UAV) आहे जे कॅमेरे, सेन्सर आणि फवारणीची टाकी घेऊन हवेत उडते.

हे पूर्णपणे मोबाईल अॅप, रिमोट किंवा AI ऑटोपायलटवर चालते.

ड्रोनची शेतीत प्रमुख कामे:

  • स्मार्ट फवारणी (Spraying)

  • Livestream सर्वेक्षण

  • NDVI Vegetation Analysis

  • पिकांच्या रोगांची ओळख

  • कीडराईत ग्रस्त क्षेत्र शोधणे

  • जलव्यवस्थापन विश्लेषण

  • जमिनीचे नकाशे तयार करणे

यामुळे उत्पादन वाढते, खर्च कमी होतो आणि वेळेची मोठी बचत होते.


🌾 ड्रोनमुळे पिकनियोजन आणि डेटा विश्लेषण सुलभ

shetit kranti ghadvinyasthi droncha vapar

    कृषी क्षेत्रात हवामान बदल मोठे आव्हान आहे. पावसाची अनिश्चितता, उष्णता वाढ, गारपीट आणि दुष्काळामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते.

ड्रोनद्वारे मिळालेला डेटा शेतकऱ्याला दाखवतो:

  • पिकाची वाढ

  • पानांचा पिवळेपणा

  • पाण्याची कमी/जास्ती

  • कीडराईत

  • खताचा अभाव

यावर आधारित शेतकरी अचूक वेळेत योग्य निर्णय घेऊ शकतो.

✈️ ड्रोनने फवारणी: उत्पादन वाढीसाठी मोठा गेम-चेंजर

shetit kranti ghadvinyasthi droncha vapar

पारंपारिक फवारणीत औषधे शरीरावर येणे, असमान फवारणी आणि जास्त रसायन वापर ही मोठी समस्या होती.

ड्रोन फवारणीचे फायदे:

  • 4–6 एकर/तास फवारणी क्षमता

  • सुरक्षित आणि एकसमान फवारणी

  • रसायनांचा मानवी संपर्क नाही

  • 30–40% औषधांची बचत

  • उत्पादन आणि गुणवत्ता वाढ

  • वेळेची बचत

अनेक देशांनी असमान फवारणीमुळे भारताचे कृषी उत्पादन परत केले आहे. ड्रोन फवारणीने हे टळते.


💧 ड्रोनद्वारे सिंचन व्यवस्थापन

shetit kranti ghadvinyasthi droncha vapar

ड्रोनमधील प्रगत सेन्सर:

  • सिंचनातील गळती शोधतात

  • पाण्याचे तलाव/ओले-कोरडे भाग दाखवतात

  • पिकांना किती पाणी हवे ते सांगतात

यामुळे पाण्याची बचत व पिकाचे नुकसान टाळता येते.


📡 डिजिटल शेतीचे भविष्य: डेटा + ड्रोन + AI

ड्रोनने मिळालेला डेटा AI (Artificial Intelligence) आणि GIS सॉफ्टवेअरमध्ये दिल्यास:

  • मातीचे विश्लेषण

  • खतांचा योग्य डोस

  • हवामान आधारित अंदाज

  • रोगराई आधीच ओळखणे

  • उत्पादनाचा अंदाज

हे सर्व शेतकऱ्याला 24/7 मोबाईलवर मिळते.


🛰️ डिजिटल बॉक्स एरोस्पेस – नाशिकचे खास औषध फवारणी ड्रोन

Shetit kranti ghadvinyasathi dronecha vapar

डिजिटल बॉक्स एरोस्पेस (Nashik) यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष Spraying Drone विकसित केला आहे.

✔ उपलब्ध टाकी क्षमता:

  • 5 लिटर

  • 10 लिटर

  • 16 लिटर

✔ किंमत (बेस मॉडेल):

₹ 3 लाख – ₹ 25 लाख

✔ सुविधा:

  • कस्टमायझेबल EMI

  • 1 वर्ष फ्री सर्विस

  • ड्रोन विमा उपलब्ध

  • FPO / संस्थांसाठी विशेष अनुदान

  • FTO डेमो उपलब्ध

  • डीलरशिप व फ्रेंचायझी उपलब्ध

संपर्क:


🏛️ नवीनतम Krishi Drone Yojana 2024–25 (Latest Updated)

shetit kranti ghadvinyasthi droncha vapar

    सरकार ड्रोन वापरणाऱ्या शेतकऱ्यांना मोठे अनुदान पुरवत आहे.

📌 1) कृषी ड्रोन सब्सिडी – केंद्र शासन (100% Subsidy)

  • कृषी संस्था, FPO, ICAR संस्थांना

  • ₹10 लाख–₹15 लाख पर्यंत 100% अनुदान


📌 2) वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी ड्रोन अनुदान (50% Subsidy)

  • लहान व मध्यम शेतकऱ्यांना

  • ड्रोन किमतीच्या 50% किंवा ₹5 लाख (यापैकी जे कमी)


📌 3) SC/ST/महिला शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान

  • 70–80% सब्सिडी

  • 4–6 लाखांपर्यंत मदत


📌 4) FPO ला ड्रोन वापरासाठी 75% सब्सिडी

FPO ने 1 ड्रोन घेतल्यास

  • 75% पर्यंत घटक अनुदान

  • प्रशिक्षण मोफत


📌 5) PM Kisan Scheme + Drone Yojana (Combined Initiative)

shetit kranti ghadvanyasthi droncha vapar

  • ड्रोन प्रशिक्षण

  • ड्रोन ऑपरेटर कोर्स

  • फवारणीसाठी प्रति एकर मदत

  • कृषी स्टार्टअपसाठीही अनुदान


🚁 शेतीतील ड्रोन वापराचे 5 सर्वात महत्त्वाचे फायदे

  1. समान फवारणी = पिके तंदुरुस्त

  2. डेटा अॅनालिटिक्स = स्मार्ट निर्णय

  3. उत्पादन वाढ 20–30%

  4. रासायनिक संपर्क टाळतो

  5. श्रम बचत + खर्च कमी


🎯 निष्कर्ष (Conclusion)

शेतीत ड्रोनचा वापर म्हणजे फक्त तंत्रज्ञान नव्हे, तर एक नवी डिजिटल शेती क्रांती आहे.
ड्रोनने फवारणी, सिंचन, निरीक्षण, रोग विश्लेषण या सर्व गोष्टींमध्ये एकाचवेळी वेग, अचूकता आणि सुरक्षितता मिळते.

shetit kranti ghadvinyasthi droncha vapar

सरकारचे Drone Subsidy Yojana शेतकऱ्यांसाठी मोठी संधी आहे.
    ड्रोन शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवू शकतो, वेळ वाचवू शकतो आणि उत्पादनाची गुणवत्ता उंचावू शकतो.

✍️ काव्यरूप ओळी 

स्मार्ट शेतीसाठी ड्रोन

शेतीच्या डिजिटल परिवर्तनासाठी

ड्रोन घटक महत्त्वाचा,

शेतीसाठी ड्रोन वापरणे

हा मार्ग स्मार्ट शेतीचा...

पिकांवर लक्ष, फवारणीसाठी

ड्रोन सर्वदूर वापरावा,

सिंचन व्यवस्था, उत्पादनाचा अंदाज

याचा घेता येतो मागोवा...

शेतीत क्रांती घडवण्यासाठी

करा ड्रोनचा वापर,

याला मिळते अनुदान

अनेक फायदे याचे सुपर...

आज विविध उद्योगात

वापर महत्वाचा ड्रोनचा,

डिजिटल बॉक्स एरोस्पेसचा

ड्रोन घ्यावा औषध फवारणीचा...

Shetit kranti ghadvinyasathi dronecha vapar

 © दीपक केदू अहिरे 

नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

कृषीप्रदर्शनाची गरज | Importance of Agricultural Exhibitions

कृषीप्रदर्शनाची गरज | 

Importance of Agricultural Exhibitions

Krushi pradarshanachi garaj

🌾 कृषीप्रधान भारतात कृषीप्रदर्शनाची गरज का?

   कृषीप्रधान देश म्हणून भारताची ओळख अगदी जुनी आहे. आजही 60–70% लोक शेती किंवा शेतीसंबंधित व्यवसायात गुंतलेले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती, नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान, बाजारपेठेची माहिती, उत्पादन-विपणन तंत्र आणि पूरक व्यवसायाची माहिती एका ठिकाणी मिळवून देणारे कृषीप्रदर्शन हे अत्यंत उपयुक्त व्यासपीठ ठरते.


    आज महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात भव्य कृषीप्रदर्शने आयोजित केली जात आहेत. शेतकऱ्यांच्या वाढत्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही प्रदर्शने कृषीविकासाचा अविभाज्य घटक बनली आहेत.


🌱 कृषीप्रदर्शनांचा इतिहास आणि प्रसार

   महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कृषीप्रदर्शने सुरू होऊन साधारण दोन दशके लोटली आहेत. सुरुवातीला कार्यशाळा, परिसंवाद आणि चर्चासत्रे एवढ्यापुरतेच कार्यक्रम होते; परंतु नंतर खाजगी आयोजक आणि शासन यांच्या मदतीने जिल्हास्तरीय प्रदर्शन मोठ्या प्रमाणात होऊ लागले.

krushi pradarshanachi garaj

कारणे:

  • ग्रामीण भागातील क्रियाशील प्रचार

  • शेतकऱ्यांचा वाढता सहभाग

  • व्यापारी पद्धती व स्टॉल नोंदणी

  • विविध क्षेत्रातील कंपन्यांचा वाढता सहभाग

     आज ५०-५५ पेक्षा जास्त कृषीप्रदर्शने महाराष्ट्रात दरवर्षी आयोजित होतात. यावरून कृषीप्रदर्शनांची गरज किती व्यापक आहे हे स्पष्ट होते.


🌿 ज्ञानाचे आणि तंत्रज्ञानाचे केंद्र—कृषीप्रदर्शन

    कृषीप्रदर्शन हे केवळ वस्तूंचे प्रदर्शन नसून ज्ञान, तंत्रज्ञान आणि अनुभवाची देवाणघेवाण करण्याचे केंद्र आहे.

येथे शेतकऱ्यांना मिळते:

  • पिकांचे नवीन तंत्रज्ञान

  • आधुनिक यंत्रसामग्रीचे प्रात्यक्षिक

  • गुणवत्तापूर्ण बियाणे व रोपे

  • स्मार्ट शेती तंत्रज्ञान

  • कीड व रोग व्यवस्थापन

  • प्रशिक्षण व मार्गदर्शन

  डोळ्यांनी पाहिलेले ज्ञान अधिक परिणामकारक असल्यामुळे शेतकरी येथे पाहिलेल्या गोष्टी आपल्या शेतीत तत्काळ अवलंबू शकतात.


📢 माहिती प्रसारणाचे प्रभावी साधन

krushipradarshanchi garaj

कृषीप्रदर्शन हे कृषी विस्तार शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

येथे मिळणारी माहिती:

  • वस्तूंचे प्रत्यक्ष निरीक्षण

  • तांत्रिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन

  • प्रात्यक्षिकाचे ज्ञान

  • निर्णय क्षमतेत वाढ

  • उत्पादनाची विश्वासार्हता

   ग्राहक (शेतकरी) पाहिलेले, हाताळलेले उत्पादन अधिक विश्वासाने खरेदी करतात. त्यामुळे प्रदर्शनातील माहिती प्रसारण अतिशय प्रभावी ठरते.


🌾 उत्पादन व सेवांची यथायोग्य माहिती

krushi pradarshanachi garaj

  कृषीप्रदर्शनात शेतकऱ्यांना प्रत्यक्ष वस्तू व सेवा हाताळण्याची संधी मिळते. उदाहरणार्थ:

  • खतांचे प्रकार

  • बियाणे व त्यांची जनुकीय गुणवत्ता

  • सिंचन तंत्रज्ञान

  • ड्रोन तंत्रज्ञान

  • सुरक्षित शेती साधने

  • यंत्रसामग्री

यामुळे शेतकरी नव्या तंत्रज्ञानाबद्दल सजग होतात. तसेच कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधून शंका निरसन करता येते.


🧑‍🌾 सेवांचे प्रदर्शन आणि जनसंपर्क

कृषीप्रदर्शन हे जनसंपर्क वाढवण्याचे उत्तम माध्यम आहे.

उत्पादक आणि विक्रेत्यांना मिळते:

  • विद्यमान ग्राहकांशी नाते दृढ करण्याची संधी

  • नवीन ग्राहक मिळवण्याचे व्यासपीठ

  • ब्रँड ओळख वाढवण्याची संधी

  • उत्पादनाबद्दल फीडबॅक

शेतकऱ्यांना मिळते:

  • विश्वसनीय कंपन्यांची ओळख

  • उत्पादने व सेवांची तुलना

  • आपल्या गरजेनुसार निवड करण्याची संधी


📚 विस्तार कार्य—माहितीपत्रक, घडीपत्रिका, पुस्तिका वितरण

krushipradarshanchi garaj

    कृषीप्रदर्शनात माहितीपत्रके, घडीपत्रिका, पुस्तिका मोठ्या प्रमाणात वितरित केल्या जातात. त्यांचा फायदा असा:

  • एकाच विषयाची संपूर्ण माहिती

  • आकृत्या, चित्रांसह स्पष्टीकरण

  • तांत्रिक ज्ञानाचे सुलभीकरण

  • घर घेऊन जाऊ शकणारी माहिती

  • शिक्षणात वाढ

शेतकरी घरी जाऊन या माहितीचा अभ्यास करून योजना आखू शकतात.


🌾 वैशिष्ट्यपूर्ण व भव्य कृषीप्रदर्शने—नव्या संधींचा प्रवास

krushipradarshanchi garaj

कृषीप्रदर्शन हे केवळ वस्तू खरेदी-विक्रीचे ठिकाण नसून नव्या उद्योग, व्यवसाय आणि नोकरीच्या संधी निर्माण करणारा मंच आहे.

प्रमुख संधी:

  • कृषी सल्ला सेवा

  • प्रकल्प आखणी

  • आयात-निर्यात व्यवसाय

  • स्टॉल व्यवस्थापन

  • इव्हेंट मॅनेजमेंट

  • कृषी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रोजगार

अनेक तरुण या प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन यशस्वी उद्योजक झाले आहेत.


🌾 शेतीविषयक ज्ञानाची देवाणघेवाण

  कृषीप्रदर्शनात विविध जिल्ह्यांतील, राज्यांतील, कधी कधी देशांतील शेतकरी एकत्र येतात. यामुळे:

  • अनुभवांची देवाणघेवाण

  • पिकांच्या नवीन जातींची माहिती

  • यशोगाथांचे आदान–प्रदान

  • संशोधन संस्थांचे मार्गदर्शन

 एकाच छताखाली शेतीविषयक सर्व माहिती मिळणे हीच या प्रदर्शनाची सर्वात मोठी ताकद आहे.


🛠️ आधुनिक तंत्रज्ञानाचे स्टॉल—ड्रोन, स्मार्ट उपकरणे, स्वयंचलित प्रणाली

krushipradarshanchi garaj

आजच्या कृषीप्रदर्शनात दिसतात:

  • ड्रोन स्प्रेइंग

  • माती तपासणी यंत्रे

  • IoT आधारित सिंचन

  • स्मार्ट सेंसर्स

  • रोबोटिक्स

  • सोलार उपकरणे

यामुळे शेती अधिक वैज्ञानिक आणि खर्चबचत करणारी बनत आहे.


📗 कृषी ज्ञानाचा विस्तार—पुस्तकांची पर्वणी

कृषीप्रदर्शनात पुस्तके, मासिके, दैनिकांची विक्री मोठ्या प्रमाणात होते.

  • सेंद्रिय शेती

  • फळबाग

  • भाजीपाला

  • सहकार

  • कृषी कायदे

  • आधुनिक लागवड तंत्र

शेतकरी योग्य पुस्तके सवलतीत खरेदी करतात. यामुळे त्यांचे तांत्रिक ज्ञान वाढते.


शंका समाधान—थेट तज्ज्ञांशी संवाद

krushipradarshanchi garaj

कृषीप्रदर्शनात अनेक तज्ज्ञ उपस्थित असल्याने:

  • रोपवाटिका

  • कीड/रोग

  • प्राणिसंवर्धन

  • शेततळी

  • व्यवसाय योजना

या विषयांवरील शंका त्वरित दूर होतात. अनेक शेतकरी या प्रदर्शनामुळेच शेततळी योजना किंवा फलोत्पादनाशी जोडले गेले आहेत.


🌱 कृषीविकासातील कृषीप्रदर्शनाचा महत्त्वाचा वाटा

कृषीप्रदर्शनामुळे:

  • फलोत्पादन वाढ

  • जमीन सुपीकता सुधारणा

  • पावसामुळे माती धूप कमी

  • ग्रामीण रोजगार निर्मिती

  • तंत्रज्ञानाची अंमलबजावणी

 गरीबी निर्मूलनात कृषीप्रदर्शनाची भूमिका मोठी आहे.


🌍 कृषीमाल निर्यात वाढवण्यास मदत

  मुक्त अर्थव्यवस्थेमुळे निर्यात वाढ महत्त्वाची आहे. कृषीप्रदर्शनात:

  • आयातदार

  • निर्यातदार

  • FPOs

  • बाजारपेठ तज्ज्ञ

   या सर्वांसोबत शेतकऱ्यांना थेट संवाद साधता येतो. त्यामुळे निर्यातक्षम उत्पादनांची माहिती मिळते.


🧩 कृषीप्रदर्शन—शेतीचे चालते-बोलते विद्यापीठ

 आजच्या काळात कृषीप्रदर्शन हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे चलनवलनशील विद्यापीठ बनले आहे. येथे मिळणारे ज्ञान, तंत्रज्ञान आणि नेटवर्किंग कोणत्याही कृषी शिक्षणापेक्षा अधिक व्यवहार्य असते.


✍️ कविता : कृषी प्रदर्शन

कृषीप्रधान देशात
गरज कृषी प्रदर्शनाची,
परिसंवाद,कार्यशाळा, चर्चासत्र
भूमिका निभवावी सहभागाची...

कृषिविकास केंद्रीभूत मानून
व्हावे नियमित कृषिप्रदर्शन,
यानिमित्ताने मिळते ज्ञानाची पर्वणी
अनुभवाची होते देवाणघेवाण...

कृषीप्रदर्शनात स्टॉलमध्ये
भरते अनेक वस्तू, सेवांचे प्रदर्शन,
प्रत्यक्ष पाहिलेले तंत्रज्ञान
अनुभवाच्या वृध्दीने होते मूल्यवर्धन...

कृषी प्रदर्शन असते ज्ञानाचे
अभिनव असे व्यासपीठ,
कृषिप्रदर्शनातून मिळते ज्ञान
असे ते चालते बोलते विद्यापीठ...

© दीपक केदू अहिरे
 
नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

****************************************
****************************************
****************************************
****************************************

****************************************
****************************************
Koo :
****************************************
****************************************
****************************************
@DeepakA86854129
****************************************

****************************************

मायक्रोग्रीन शेती व्यवसाय | Microgreen Farming Business : कमी गुंतवणुकीत घरातून जास्त नफा

  🌱 मायक्रोग्रीन शेती व्यवसाय: कमी जागेत जास्त नफा देणारा आधुनिक उद्योग Microgreens Business in Marathi | कमी गुंतवणुकीत जास्त कमाई      ...