name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): मोठेपणा (magnitude)

मोठेपणा (magnitude)

मोठेपणा 
magnitude


Magnitude

स्वतःला कमी समजणं,

तुम्ही सोडून द्या,

अपयशाला नगण्य समजून,

स्वतःच्या मर्यादा झुगारून द्या...


या सृष्टीमध्ये आपण,

भव्य दिव्य करण्यासाठी आलो आहोत,

ही धारणा अंगी भिनवा, 

आपण कुणीतरी मोठे आहोत...


लोकांनी तुमच्याशी कसं वागावं, 

हे कृतीतून ठरवलं पाहिजे,

लोकांनी  राजा समजावं, 

आधी राजासारखं वागलं पाहिजे...


स्वतःवर विश्वास ठेवून, 

नेहमी धाडसी करा मागणी,

किरकोळ स्वप्न पाहू नका

पातळी अत्युच्च ठेवा अंगणी...


© दीपक केदू अहिरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...