name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): सद्गुण (Virtue)

सद्गुण (Virtue)

सद्गुण 
Virtue

Virtue

आपल्या गुणाकडे द्या
अधिकाधिक मात्रेने लक्ष,
जाणीवपूर्वक विकसित करा,
आपल्या दुर्गुणाकडे  दुर्लक्ष...

सद्गुणांचे प्रकटीकरण, 
करता आले पाहिजे,
त्यामुळे कळेल उत्तमता, 
प्रयत्न अंगी बाणवले पाहिजे...

सद्गुण अथवा अवगुण,
हा ठरतो आपल्या हेतुवर,
स्वार्थी असणे वाईट नाही,
तो प्रकट होतो भावनेवर...

आपलं व्यक्तिमत्त्व, 
घडवतात आपले विचार,
आपले गुण जेव्हा जवळ येतात,
आठवतात केलेले संस्कार...


© दीपक केदू अहिरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...