स्मरण वडिलांचे
Father's memory
आज आहे 'फादर्स डे',
म्हणून नाही आठवण,
तर तुमच्या प्रेमाची,
माझ्या मनात साठवण...
माझे तुम्ही "पप्पा",
"बापू"तुम्ही शिक्षकांचे,
तुमच्यासारखे भाषण
मला नाही जमायचे...
कुठल्याही विषयाची
तुम्हाला हाेती जाण,
बाेलायला लागले तर
वेळेचं नव्हतं भान...
आदर्श शिक्षक
म्हणून तुम्ही मिरवली शान,
साधेपणात तुम्ही जगले
पप्पा आमचे महान...
कमाई तुमच्या माणूसकिची
हीच आमची शिदाेरी किती,
"सर"सदैव स्मरणात राहतील,
हीच तुमच्या कार्याची पावती...
© दीपक केदू अहिरे,
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com