कासव
Turtle 🐢
देवाच्या मंदिरापुढे
कासव असते,
जे जमिनीवर व
पाण्यातही राहते
भक्तानेही राहावे
परीस्थितीत प्रतिकूल,
हाेत राहते परीस्थिती
हळूहळू अनुकूल
कासवाला झाली
सत्वगुणामुळे ज्ञानप्राप्ती,
श्री विष्णूच्या पायाशी
घेतली शरणागती
कासव पाच अवयव
घेते कवचाच्या आत,
पंच इंद्रियावर मिळवा ताबा
हाेत नाही घात
कासवाच्या गुणांची करा
अंगी जाेपासना,
ईश्वराचे दर्शन घडावे
हीच त्याची उपासना
आकुंचन करून कासव
बसते मंदिरासमोर,
काम,क्राेध,लाेभ,माेह,मत्सर
हे दुर्गुण टाका बाहेर
कुर्मदृष्टीने कासव
पाहते देवाकडे,
आपणही पहावे
त्याच्या नजरेतून भगवंताकडे,
कासवाची पाठ कठीण,
झेलते संकटाचे वार,
कासव म्हणजे संयममुर्ती
उघडते देवत्वाचे व्दार
© दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा