जीव व्याकूळ हाेताे...
Life is boring
कसा आला तू अवकाळी,
संततधार कसा बरसवताे,
तुझ्या येण्याने आमचा,
जीवही व्याकूळ हाेताे...
पिके काढणीची वेळ,
मका शेतात पडलेला,
रानात सुरू कशी करू,
पिकाच्या पूर्व मशागतीला...
अवकाळी तुझ्या येण्याने,
पाेटात हाेते आमचे धस्स,
उभे अडचणीचे प्रसंग,
आता करणारे बाबा तू बस्स...
तीन ऋतू हाेते माहित,
आता चाैथा आला हिवसाळा,
हिवाळ्यात धाे-धाे पाऊस,
आणली त्याने अवकळा...
© दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा