name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): खूप जड हाेतं...(Very heavy)

खूप जड हाेतं...(Very heavy)

खूप जड हाेतं...
Very heavy 

Very heavy


खूप जड हाेतं
तुम्हांला निराेप द्यायला, 
सेवानिवृत्त झाले तुम्ही
जड जातंय आम्हाला पचवायला... 

खूप जड हाेतं  
कसं तुमचं निरपेक्ष शिकवणं, 
प्रत्येक विद्यार्थ्यांला कसं
प्रेमळपणे वागवणं.... 

खूप जड हाेतं
तुमचा सहवास नाही लाभणार, 
तुम्ही दिलेले गुरू संस्कार
नाही कधी विसरणार.... 

खूप जड हाेतं
आठवते तुमची प्रेमळ शिक्षा, 
जीवनाच्या प्रत्येक वेळी
आठवत राहिल तुमची परीक्षा.... 

© दीपक अहिरे,नाशिक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उद्योगस्वामिनी (Udyog swamini)

उद्योगस्वामिनी   Udyog swamini  १. सौ. श्रद्धा चैतन्य ढोरमले  sou.  Shraddha Chaitanya Dhormale     सौ. श्रद्धा चैतन्य ढोरमले यांनी दुग्ध व्...