name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): December 2021

वर्षा अखेरीस (End of the year)

वर्षा अखेरीस...  
End of the year

End of the year
 

वर्षा अखेरीस                     
लेखाजोखा मांडावा,           
केलेल्या संकल्पाचा            
घ्यावा तुम्ही आढावा          
वर्षा अखेरीस
नवीन संकल्प मांडावा, 
जीव तोडून प्रयत्न
नववर्षात करावा
वर्षा अखेरीस                    
किती संपदा कमवली,         
मानसिक, आर्थिक             
किती आपणास लाभली
वर्षा अखेरीस
नुसतं पळतच सुटलाे, 
थांबायचं नाव नाही
भानावर केव्हा आलाे

© दीपक अहिरे, नाशिक

अविभाज्य अंग (Integral part)

अविभाज्य अंग...
Integral part

Integral part

प्रिय दिनदर्शिका 
प्रत्येक पान महत्त्वाचे, 
आयुष्यात असते 
अविभाज्य अंग जीवनाचे... 

प्रिय दिनदर्शिका 
काळानुरूप बदलत असते, 
निवडणुका आल्या की 
फारच जाेर धरते... 

प्रिय दिनदर्शिका 
प्रत्येक दिवसावर तुझा ठसा, 
तुझ्यामुळेच आम्हां समजले, 
पंचांगाच्या या नसा... 

प्रिय दिनदर्शिका 
आरसा तू आमच्या मनाचा, 
वाचनीय मजकूर देऊन 
ठाव घेते प्रत्येक हृदयाचा... 

© दीपक अहिरे, नाशिक

लाेकसंग्रह (people's collection)

लाेकसंग्रह...
People's collection


Peoples collection

माणूस जाेडला तर,

जग आपोआप जाेडलं जाईल,

माणसं आली जिंकता तर,

सारं जग जिंकता येईल

अफाट लाेकसंग्रह, 

अनेकांच्या यशाचे हेच सुत्र,

लाेकप्रियतेतून लाेकसंग्रह, 

तेच खरे यशाचे तंत्र

लाेकसंग्रही व्यक्तीमत्वासाठी,

अंगी ठेवा सावधपणा,

उद्देशपूर्तीसाठी शिकावा, 

माणसं जाेडण्याचा बाणा

जाेडत राहा तुम्ही सगळीकडे, 

सहकार्याचे हात उदंड,

ध्येय गाठण्याचे कार्य, 

उभे राहिल प्रचंड आणि अखंड

© दीपक अहिरे, नाशिक

जगण्याचा खरा आनंद (True joy of living)

जगण्याचा खरा आनंद... 
True joy of living


True Joy of living


स्वतःचा शाेध घेणाऱ्यांनीच,

घेतला जगण्याचा आनंद,

आनंदाच्या शाश्वत लागवडीनेच,

उगवताे यशाचा कंद


आनंद यशाचा स्त्राेत,

न मिळणाऱ्या गाेष्टीही मिळतात,

आनंदालाच मिळते यश, 

कार्यशील आनंदी असतात


आनंदाचं उगमस्थान, 

आपल्या अंतरंगात वसताे,

हास्य भावनेने आनंदी, 

आनंद मनाची स्वच्छता करताे


तुम्ही हसलात तर जग हसतं, 

रडलात तर रडतं,

आनंदी माणसाकडे यशच नाही,

पण जगही धाव घेतं

© दीपक अहिरे, नाशिक 


 

पुसल्या जरी लाटांनी (Washed away by the waves)

पुसल्या जरी लाटांनी...
Washed away by the waves


Washed away by the waves

पुसल्या जरी लाटांनी,
माझ्या वाटेच्या रेषा, 
करेल मी निर्मिती, 
जागवेल मी नवी दिशा... 

पुसल्या जरी लाटांनी, 
कार्य माझे भुतकाळाचे, 
करेल मी पुन्हा सुरूवात,
चित्र रंगवेल भविष्याचे... 

पुसल्या जरी लाटांनी,
माझ्या पाऊलखुणा, 
मी येईन पुन्हा पुन्हा, 
हा माझा स्वाभिमानी बाणा... 

पुसल्या जरी लाटांनी,
माझे नामाेनिशान, 
गगनात स्वप्नांच्या,
मी उडवेल कल्पनांचे विमान 

© दीपक अहिरे, नाशिक



मैत्रीचा आरसा (Mirror of friendship)

मैत्रीचा आरसा....
Mirror of friendship

Mirror of friendship

आपल्याबद्दल सर्व जाणून,
जाे मित्र प्रेम करताे, 
चुकीची कानउघाडणी,
संकटकाळी मदत जाणताे

मैत्रीच्या आरसाने, 
आपले गुणदाेष दाखवावे, 
स्तुतीप्रिय पावलाेपावली, 
आसवं पुसणारे हात मिळावे

विश्वास,भरवसा,बांधिलकी, 
या ठिकाणी मैत्री वसते, 
चांगुलपणाची देवाणघेवाण,
अशा मित्रांवर मैत्री बसते

व्यक्तीचा स्वतःचा प्रभाव,
पैसा येत नाही कामी, 
आपला स्वभाव आणि मित्रच,
उपयोगी येतात नामी

© दीपक अहिरे, नाशिक

उत्साह (Enlivenment)

उत्साह... 
Enlivenment


Utsaha

नवकल्पनांचा पाया,
उत्साह हाच असताे,
कार्यशक्ति प्रज्वलित
उत्साह हाच करताे

उत्साह संसर्गजन्य, 
सान्निध्यातील उत्साही हाेतात, 
उत्साहासाठी लाेक 
आवडीच्या क्षेत्रात काम करतात

प्रेरणा हा आरंभबिंदू 
असताे उत्साहाचा, 
यश मिळवण्याचा उद्देश 
कार्य करताे उत्तेजनाचा

उत्साहातून  निर्मित 
उर्जॆला हवी याेग्य दिशा, 
उत्साहाअभावी गमवाल संधी, 
निर्माण हाेते आशा

© दीपक अहिरे, 
नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

अंधार भेदेल ( Darkness will break)

अंधार भेदेल ...
Darkness will break

Darkness will break

एक कवडसा, 

        अंधार भेदेल,       

ज्ञानाचा वसा, 

         उजळून टाकेल...            

एक कवडसा, 

     समजू नका लहान,         

ताेच भागवणार, 

प्रकाशाची तहान...         

एक कवडसा,

कल्पनांचे महाव्दार,

दुःख दारिद्रयावर,

करेल ताे वार...

एक कवडसा,

भेदेल ताे आरपार,

चक्षुत दिव्यदृष्टी,

आहे ताे तारणहार...


© दीपक अहिरे, नाशिक

निशब्द मी (silent me)

निःशब्द मी...
silent me


Silent me


निःशब्द मी, 

शब्द फुटेना, 

थिजलाे जागी,

          अश्रू आटेना...             


निःशब्द मी,

दुःख कल्लोळ,

जनसागराचे, 

उठले लाेळ...


निःशब्द मी, 

  भावना अनावर,            

डाेक्यात माजले, 

अनाहूत काहूर...          


निःशब्द मी, 

नेत्रीचे कटाक्ष,

पाहतील जन, 

हीच तुझी साक्ष...


© दीपक अहिरे,नाशिक


झाले गेले विसरून जावे (Forget what happened)

झाले गेले विसरून जावे...
 Forget what happened

Forget what happened

झालेले विसरावे,
पुढे पुढे चालावे, 
न रूचलेले,पचलेले,
विसरून जावे… 

आयुष्यात ज्यांच्यामुळे 
मिळालं यश, 
कृतज्ञ राहा त्यांच्याप्रती,
चिंतावे सुयश...

विसरण्याचा आहे,
मानवी स्वभावगुण,
साेडून द्या 
तिथल्या तेथे अवगुण...

माफ करून मनात,
हृदयी ते ठेवावे,
याेग्यवेळी ते,
अंतरंगातून निस्तरावे...

© दीपक अहिरे, नाशिक




भीती आहे मनात (fear in mind)

भीती आहे मनात...
Fear in mind


Fear in mind
 

भीती बनवते माणसाला दुबळं
धाडस यशस्वी बनवते माणसाला, 
भयाने ग्रासलेले लावत नाही शाेध
शहानिशा प्रदान करते निर्भयतेला... 

पूर्वी घडून गेलेली घटना मनात
भीतीच्या रूपाने घर करून बसते, 
अशा अनेक गोष्टींच्या भयगंडामुळे
सातत्याने अपयश स्वीकारावे लागते... 

सर्व प्रकारच्या भीतीला सामाेरं जाणं
हा उत्तम मार्ग भीती दूर करण्याचा, 
थाेडीफार भीती असते हिताची
निर्भयतेच्या जाेडीला सावधानतेचा... 

अकारण असलेली भीती आहे मनात
ती सातत्याने देते त्रास विनाकारण, 
हाेऊ नका सर्वकालीन भयभीत
हे एक स्वाभाविक भयाचं कारण... 

© दीपक अहिरे, नाशिक

मनाचा उंबरठा (Threshold of the mind)

मनाचा उंबरठा....
Threshold of the mind

Threshold of mind

सुदृढ शरीर बळासाठी,
करताे आपण व्यायाम, 
मनशक्तीसाठी करताे का, 
अपेक्षित असे काम... 

कुरुक्षेत्रावर युद्धाच्या वेळी, 
अर्जुन कसा खचला, 
मनाचा उंबरठा ओलांडून, 
कृष्णाने त्यास तारला... 

मनात उमटते, 
पहिल्यांदा काेणतेही चित्र, 
मनातलं प्रत्यक्षात, 
उभं राहतं ते सचित्र... 

मन जिंकले ज्याने, 
त्याने रणसुध्दा जिंकले, 
काेणतीच लढाई न लढता, 
वर्धमान 'महावीर'झाले... 

© दीपक अहिरे, नाशिक

थंडीच्या दिवसात (In cold days)

थंडीच्या दिवसात
In cold days 

In cold days        
थंडीच्या दिवसात             
वाटते पडावे ऊन,             
हुडहुडी लागते                 
ऊन लागावे म्हणून...        

थंडीच्या दिवसात
हातपाय गारठले, 
उघडयावरचा विचार
मन आता गाेठले... 

थंडीच्या दिवसात            
खावा खारीक लाडू,          
हाेईल निर्माण ऊर्जा         
गाेदडीखाली दडू...         

थंडीच्या दिवसात
उन्हाची प्रतिक्षा, 
सहनशीलतेची आता
वाढवावी कक्षा... 

© दीपक अहिरे, नाशिक

अनाेळखी वाट ( Unknown way)

अनाेळखी वाट...
Unknown way

Unknown way

अनाेळखी वाटेने जे कधी केलं नाही
ते तुम्ही केलं तर तुम्हाला मिळेल, 

चिकित्सक दृष्टीने घ्या वाटेचा शाेध
त्यांच्यासाठी यशाची इच्छा बळावेल

अनाेळखी वाट नसते साेपी
जुन्या वाटेवर चालतांना त्रास हाेत नाही

अनाेळखी वाटेवर जात नाही माणसं
यश कधी एका जागी थांबत नाही

अनाेळखी वाटेवर पाेहचण्यासाठी
लागताे दृढ आत्मविश्वास, चिकाटी, 

या वाटेने चालावे माेठ्या धडाडीने
भरेल तुमच्या यशाची वाटी

अनाेळखी वाटेने जाण्याची इच्छा जरूर
जुन्या वाटेत पाय आपला रूतलेला,

सुरक्षेची भावना काहीच करू देत नाही
संकटाना संधी म्हणून प्राधान्य चालण्याला

© दीपक अहिरे, नाशिक

एक एक दिवस जाताेय (one one day's goes)

एक एक दिवस जाताेय...
One one day's goes

One one day's goes

एक एक दिवस जाताेय,
जवळ मृत्यूच्या दाढेत
किती काटे पेरावे,
आपणच आपल्या वाटेत

एक एक दिवस जाताेय,
ध्येयाविना जगण्याचा
मिळावे सर्व आपणास, 
हव्यास काय कामाचा

एक एक दिवस जाताेय,
वय वाढत जाते
वयानुसार व्हावा बदल,
भूतकाळाकडे नजर असते

एक एक दिवस जाताेय,
हाेत नाही काही प्रगती
चाकही बसतं अडून, 
मिळत नाही अपेक्षित गती

© दीपक अहिरे, नाशिक

अबाेल हाेते शब्द (Taciturn my words)

अबाेल हाेते शब्द...
Taciturn my words


Taciturn my words
  

अबाेल हाेते शब्द               
बाेलके ते झाले,                 
तुझ्यामुळेच शब्दाला         
अर्थ ते गवसले                 

अबाेल हाेते शब्द
सुप्त हृदयात साठवून, 
अचानकच प्रकटले
मेंदूच्या कुपीतून आठवून

अबाेल हाेते शब्द              
झंकारली तू विणा,           
निघाले सूर शब्दाचे           
स्फुरले ते मना              

अबाेल हाेते शब्द 
परिसस्पर्श तुझा लाभला, 
शब्द माझ्या जगाचा
तुझ्या काळजीचा झाला

© दीपक अहिरे, नाशिक

श्री गुरूदत्ता...(Shri Gurudatta)

श्री गुरूदत्ता...
Shri Gurudatta


Shri Gurudatta


रूप तुझे
सात्त्विक निर्विकार, 
श्री गुरूदत्ता 
तू भक्तांचा आधार... 

रूप तुझे
देते बळ मानसिक, 
कसे वागावे 
हे जाणतो भाविक... 

रूप तुझे
श्री विष्णूपासून जन्मले, 
तेजाेमयी त्रिमुख
वैराग्यसूचक झाले... 

रूप तुझे 
धावणारे चटकन हाकेला, 
दत्तस्मरणाने
बल येते उपासनेला... 

© दीपक केदू अहिरे, 

नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

रूप तुझे...(Your form)

रूप तुझे 
Your form


Your form

रूप तुझे  निर्विकार, 
रूपाने तुझ्या दिला आकार

रूप तुझे साधे भाेळे, 
त्याने दिले मला डोळे

रूप तुझे साचेबद्ध, 
मी झालाे वचनबद्ध

रूप तुझे संयमित, 
मी रमलाे तुझ्या भक्तीत

© दीपक अहिरे, नाशिक

ती पहाट (That dawn)

ती पहाट   
(That dawn)


The dawn

ती पहाट,
रम्य अशी उगवते, 
झाेपेतून उठण्यासाठी,
मला नेहमी खुणावते

ती पहाट,
चिमणींची चिवचिवाट, 
आकाशात ढगांची,
पळण्याची ती लाट

ती पहाट, 
देते सूर्याचे दर्शन, 
काहीतरी नाविन्याचे,
व्हावे जीवनी आगमन

ती पहाट,
मनाेहारी भासते, 
आयुष्यात प्रत्येकाच्या,
नित्याने येत असते. 

© दीपक अहिरे,नाशिक

शांतता (peace)

शांतता
Peace 


Shantata


काेणत्याही क्षेत्रात 
शांतता बाळगणे माेलाची,
थोडी शांतता पाळली तर 
भाग हाेते सुविचाराची...

समजूतदारपणा हेच 
शांततेचे दुसरं नाव, 
शांतता महत्त्वाचे अस्त्र 
बदलते आयुष्याचं गाव...

शांतता न पाळणारी 
वळणा वळणावर अपघातग्रस्त, 
सर्व काही लगेच हवे 
घाईघाईमुळे हाेतात ते त्रस्त...

प्रवास आयुष्याचा
शांततेने माणसं हाेतात यशस्वी, 
प्रगतीसाठी दाेन पावले मागे 
घेणारी माणसं तपस्वी...


Shantata

© दीपक केदू अहिरे

नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...