अनाेळखी वाट...
Unknown way
अनाेळखी वाटेने जे कधी केलं नाही
ते तुम्ही केलं तर तुम्हाला मिळेल,
चिकित्सक दृष्टीने घ्या वाटेचा शाेध
त्यांच्यासाठी यशाची इच्छा बळावेल
अनाेळखी वाट नसते साेपी
जुन्या वाटेवर चालतांना त्रास हाेत नाही
अनाेळखी वाटेवर जात नाही माणसं
यश कधी एका जागी थांबत नाही
अनाेळखी वाटेवर पाेहचण्यासाठी
लागताे दृढ आत्मविश्वास, चिकाटी,
या वाटेने चालावे माेठ्या धडाडीने
भरेल तुमच्या यशाची वाटी
अनाेळखी वाटेने जाण्याची इच्छा जरूर
जुन्या वाटेत पाय आपला रूतलेला,
सुरक्षेची भावना काहीच करू देत नाही
संकटाना संधी म्हणून प्राधान्य चालण्याला
© दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा