वेदनेची कविता...A poem of pain
वेदनेची कविता
आतून जन्मते,
अंतःकरणातून बाहेर
मनामनात प्रसवते...
वेदनेची कविता
कणवेची भूक,
असह्य वेदना
हाेते ती मूक...
वेदनेची कविता
समजेल हृदयाला,
आळवेल ताे
सहवेदनेच्या मनाला...
वेदनेची कविता
तिला अनेक पदर,
वेदनेचा निचरा
व्हावा ताे सादर...
© दीपक अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment