आयुष्य हे एक पत्र...
Life is a Letter
आयुष्य हे एक पत्र,
चालवा हे जीवनी सत्र...
पत्राेत्तर करा वरचेवर,
माया करा आयुष्यावर...
मायना हा पत्राचा
स्वनिर्मित असावा,
ह्दयाला बाेचतील शब्द
असा ताे नसावा...
पत्र मिळताच अपेक्षित
बदलते आपली भावना,
माेबाईलवर आता हे
काही कळतच नाहीना...
व्यतीत करा पत्रासारखे
आपले आयुष्य,
तरच हाेणार नाही
भयभीत हा मनुष्य...
© दीपक अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment