तक्रार
complaint
तक्रार नाही माझी
यापुढे जीवनात,
थोडी तडजोड
साेसावी मनात....
तक्रार करण्यापेक्षा
साेडण्याकडे द्या लक्ष,
विचलित हाेवू देवू नका
कामाचा हा अक्ष....
तक्रार करता पुढे
गुंता हा वाढताे,
प्रश्न हा ऐरणीचा
तिथल्या तिथे सडताे...
तक्रारवजा सूचना
घ्याव्या तुम्ही लक्षात,
सारख्या नकारात्मक
वावरू नका जगात....
© दीपक अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment