name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): September 2021

हसावं कसं... (Hasava kasa)

हसावं कसं... Hasava kasa 
Hasava kasa



हसावं कसं,हसणं लाेप पावलं, 
जिकडे तिकडे, राजकारण तापलं... 

हसावं कसं, हास्यक्लबमघ्ये प्रशिक्षण, 
खूप झालाे गंभीर आता, द्यावे हास्य शिक्षण... 

हसावं कसं, हसू नका व्यंगावर, 
हास्य करा येथे, भाष्य करा गुणावर... 

हसावं कसं, हासू फुटतच नाही, 
जिकडे तिकडे चिखलफेक, हास्य पाझरतच नाही...

© दीपक अहिरे, नाशिक

छंद माझा (My hobby)

  छंद माझा...   
My hobby


My hobby

छंद माझा 
माणसं वाचण्याचा,
संग्रह करून 
जाेडून ठेवण्याचा...

छंद माझा 
शेती,बागकाम करण्याचा,
मनाच्या शेतीत
सुविचार पेरण्याचा...

छंद माझा
पुस्तकं वाचण्याचा,
वाचलेली पुस्तकं
उपयोगात आणण्याचा...

छंद माझा
दिसामाजी लिहिण्याचा,
मनातील निचरा
वेळोवेळी साफ करण्याचा... 

© दीपक अहिरे, नाशिक

लहान सहान तक्रार...( Small complaint )

लहान सहान तक्रार...
Small complaint


Small complaint


लहान सहान तक्रार 

करत नाही मी कधी,

ही माझी गाेष्ट अनाेखी 

इतरांपेक्षा अलग साधी...

लहान सहान तक्रार 

जीवनात खूप माेठी हाेते,

तक्रारींचा पाढा वाचण्याची 

सवय बनून राहते...

लहान सहान तक्रार 

करा जागेवरच निपटारा,

त्यानेच उघडेल जीवनात 

आनंदी जीवनाचा पेटारा...

लहान सहान तक्रार 

हिरावते स्थिर आयुष्य,

हेलकावे खात बसताे 

जीवनात हा मनुष्य...

© दीपक अहिरे, नाशिक

आजचा दिवस... (Today is the day)

आजचा दिवस...
Today is the day

Today is the day

आजचा दिवस आहे 

जागतिक पर्यटन दिन,

बांधू या आपण नेहमी 

विविध पर्यटनाची वीण...

आजचा दिवस 

पर्यटन दिन करावा साजरा,

लक्षात ठेवावे पर्यटनाने 

मनुष्य हाेताे सुजाण खरा...

आजचा दिवस 

पर्यटन दिनाची गावू महती,

पर्यटनामुळे मिळतात 

बहुसंख्य मित्र आणि साथी...

आजचा दिवस 

पर्यटनाचे जाणावे महत्त्व,

हेच आहे जीवनात 

सुखी समाधानी आयुष्याचे सत्व...

© दीपक अहिरे, नाशिक


प्रवास...(Travel)

प्रवास...
Travel 

Travel

प्रवास आयुष्याचा 
नसावा गुंतागुंतीचा, 
फसवलेल्या यशापेक्षा 
जरी मिळाला धडा अपयशाचा

प्रवास आयुष्याचा 
कितीही चाला झरझर, 
असतात सगळीकडे 
दाेन्ही पाय बराेबर

प्रवास परतीचा 
करावा सुखसमाधानकारक, 
सर्वांना घ्यावे साेबत 
असावा सर्वसमावेशक प्रेरक

© दीपक अहिरे, नाशिक

कर्माची फळं (Fruits of karma)

कर्माची फळं
Fruits of karma

Fruits of karma


कर्माची फळं लागतात 
चांगल्या झाडाला, 
जपावी चांगली कर्म 
पाेसावी या खाेडाला... 

कर्माची फळं असताे 
सत्कर्माचा गर, 
दावताे आम्ही सर्वांना 
भरून येताे ऊर... 

कर्माची फळं असावीत 
रसाळ गोमटी, 
चांगल्या कर्मानेच 
भरावी आपली वटी... 

कर्माची फळं 
आवर्तने व्हावी यशाची, 
अशाप्रसंगी साठवण 
व्हावी पूर्व पुण्याईची... 

© दीपक अहिरे, नाशिक


ताेल मनाचा (Spoil minded)

ताेल मनाचा...
   Spoil minded

Spoil minded

ताेल मनाचा

धीकधी ढासळताे,

इतकं का आपण 

ईमानदारीने वागताे...


ताेल मनाचा

का संयमाने राखावा,

इतके दिवस का

मनात राग पेरावा...


ताेल मनाचा

परीस्थितीने जाताे,

असत्यालाच सत्य

   टाेलवतच राहताे... 


ताेल मनाचा

ढासळत बघा जाणार,

जोपर्यंत तुम्ही

बेईमानी दाखवणार...


© दीपक अहिरे, नाशिक


नाेकरी गेली (The job is gone)

नाेकरी गेली.. 
 The job is gone

The job is gone

नाेकरी गेली 

चालेना धंदा,

संसाराचा माझा

झालाय वांदा...


नाेकरी गेली

शाेधताे आता काम,

सत्कर्मानेच हाेईल

माझे आता नाम...


नाेकरी गेली 

नाही उरले काम,

कसा मिळेल पैसा

मिळत नाही दाम.. 


नाेकरी गेली

राहताेय बिनघाेर,

मनात नाचताेय

व्यवसायाचा हा माेर...


© दीपक अहिरे, नाशिक


पाझर (seepage)

पाझर मायेचा 
seepage


Seepage


पाझर मायेचा

फुटू द्या आता,

वर्षाव प्रेमाचा

पितरांप्रती माथा..


पाझर प्रेमाने

पृथ्वीलाेकी ते आले,

जीवंतपणी दे ते सुख

मृत्यूलाेकी धन्य झाले...


पाझर दयेने

आठव त्यांची कृती,

टाळ आता तू

तुझ्यातली विकृती..


पाझर स्तुतीचा

आठवण त्यांची काढ,

प्रेमाच्या पितरांना

श्रध्देने जेवण वाढ...


© दीपक अहिरे, नाशिक


माझे शहर (My City)

माझे शहर
My City


Maze Shahar    
माझे शहर
म्हणजे नाशिक नगरी,
येथे आहेत द्राक्ष
विविधतेने सारी...

माझे शहर
प्राचीन रामाची नगरी, 
येथे हाेवून गेले
थाेर विचारवंत सारी...

माझे शहर
धार्मिकतेचा वारसा,
कृषी पर्यटनाचा
घेतलाय आम्ही वसा...

माझे शहर 
मुंबईची परसबाग, 
येथील समृद्धतेला
येताेय भरघोस लाग... 

© दीपक अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

रिमझिम झरणारी बरसात (Drizzling rain)

रिमझिम झरणारी बरसात
Drizzling rain

Drizzling Rain

रिमझिम झरणारी बरसात
शेतकरी दादा सुखावला,
शेतीची  सर्व कामे करून
हरिनामात दंग झाला...

रिमझिम झरणारी बरसात
असते शेतीसाठी चांगली,
बहरते जाेमात पीक
पाहून दंग हाेते माऊली...

रिमझिम झरणारी बरसात
हाेते धनधान्य समृद्धी,
अशा पावसामुळे माझी
हाेते सुखासमाधानात वृध्दी...

रिमझिम झरणारी बरसात
माझ्यासाठी या अमृतधारा,
आवश्यक त्या मेहनतीने
फिरकताे सुखाचा वारा....

© दीपक अहिरे, नाशिक

नवी पिढी (New generation)

नवी पिढी...  
New generation


New generation


नवी पिढी

हुशार आणि आश्वासक,

तुमच्यावर भविष्य

असते तारणहारक...   


नवी पिढी

देते जुन्याला दाद,

नसताे त्यांच्याकडे

नाहक जुना वाद...


नवी पिढी

नवनिर्माणाचे स्वागत,

विविध सेवासुविधांची

असते नेहमी पंगत...


नवी पिढी

 चैतन्यानी भारलेली,

डाेळ्यात आश्वासने

नेहमीच आसुसलेली...


© दीपक अहिरे, नाशिक



अशांत मन... (Troubled mind)

अशांत मन...  
 Troubled mind

Troubled mind

अशांत मन
वणवण भटकते,
नकारात्मक गाेष्टीत
खाेलवर अडकते...

अशांत मन
अर्थहिन वागते, 
मनातील हितगुज
काेणा न बाेलते...

अशांत मन
नसते थाऱ्यावर,
संभ्रम जाणवतो
गाेंधळाच्या वाऱ्यावर...

अशांत मन
अस्पष्ट  ध्येय असते, 
विनाकारण आपला
वेळ वाया घालवते... 

© दीपक अहिरे, नाशिक

वेगळी वाट (A different path)

वेगळी वाट 
A Different Path

A different path


वेगळी वाट युवकांनाे
निवडा तुम्ही आता, 
स्वयंरोजगाराच्या तुम्ही
करा आता बाता

वेगळी वाट निवडणारे
कितीतरी आपण पाहताे,
धंद्यात पडले तरी
उभे राहतांना बघताे

वेगळी वाट चाेखाळावी
गरज काळाची,
शासकीय नाेकरी
नाही राहिली हक्काची

वेगळी वाट निवडून
विश्व उभारावे आपले, 
घ्यावी प्रशिक्षणाची जाेड
बारकावे शिकावे धंद्यातले

© दीपक अहिरे, नाशिक

जबाबदारी... (Responsibility)

जबाबदारी
Responsibility

Responsibility


जबाबदारीचं नवं ओझं

गेलात तुम्ही टाकून,

नव्या जबाबदारीने मी 

आणखी गेलाे वाकून...


नियतीचा खेळ सारा

लपंडाव कसा खेळताे,

जबाबदारी पेलून मी

परीस्थिती ती  दर्शवतो..


जबाबदारी अंगावर 

काेवळ्या वयात आली,

माझी सारी स्वप्न

विस्कटून बघा गेली...


बनलाे आता कणखर

जबाबदारी ही पडली,

नशिबाने दैवयोगाची

जबाबदारी ही पालटली..


© दीपक अहिरे, नाशिक


वादळं (Storms)

वादळं
Storms

Storms

वादळं आयुष्यात

नेहमीच येतात,

वादळं माणसाला

काहीतरी शिकवतात...  


वादळवाऱ्यांना घाबरून

साेडायची नसते वाट,

ही तर सत्व परीक्षेची

असते अनामिक लाट...


वादळं येतात

अचानक तात्कालिक,

काेलमडून टाकतात 

मनामनातलं पीक...


वादळं पचवून

काढायचा मध्यम मार्ग,

वेळोवेळी निचरा

करायचा हा विसर्ग...


© दीपक अहिरे, 

नाशिक


माझ्या नजरेत बघ (look into my eyes)

माझ्या नजरेत बघ...  
look into my eyes


Look into my eyes


माझ्या नजरेत बघ
किती हा आत्मविश्वास,
जीवनभर साेडला नाही
मी या कामाचा ध्यास...

माझ्या नजरेत बघ
साेडत नाही प्रयत्न, 
कष्टानेच कमवताे
हाच माझा जीवनयत्न...

माझ्या नजरेत बघ
भयंकर दुःख,यातना,
बनवले मी मनाला 
    सहनशीलता आहे ना...      
माझ्या नजरेत बघ
कल्पनांचे विश्व अनेक, 
साकार करेल एकला
मीच मात्र एकमेव... 

© दीपक अहिरे, नाशिक

लिहिले तुझ्यासाठी (Written for you)

लिहिले तुझ्यासाठी...
Written for you


Written for you


लिहिले तुझ्यासाठी

भरपूर ते प्रेरक,

तुझ्यासारखा भेटला

नाही ताे वाचक...


लिहिले तुझ्यासाठी

भविष्य साकार,

पण वेळोवेळी घेतली

ऐनवेळी माघार...


लिहिले तुझ्यासाठी

भल्याचा विचार,

पण लावले नाही

झेंडे तू अटकेपार...


लिहिले तुझ्यासाठी

आयुष्य पणाला लावले,

एवढं करूनही तु मला

नाही समजून घेतले...


© दीपक अहिरे, नाशिक

हे गणराया (Hey Ganrayaa)

हे गणराया... 
Hey Ganrayaa


Hey ganrayaa

हे गणराया
अनाथांच्या नाधा,
लिहिताे कवितेत 
जगण्याच्या गाथा...

हे गणराया 
भिज पाऊस पाड, 
दुष्काळ, औदासिन्य
हे तर कायमचे गाड... 

हे गणराया
राेगराई हटव,
कराेनासारखे राेग
कायमचे कटव...

हे गणराया
उत्सव तुझ्या भक्तीचा, 
पुनरावलोकन कर आम्हा
प्रत्यय तुझ्या शक्तीचा... 

© दीपक अहिरे, नाशिक

उत्सव मराठी..(Utsav Marathi)

उत्सव मराठी...
Utsav Marathi

Utsav marathi

उत्सव मराठी...उत्साह मराठी

बाेलताे मराठी...ऐकताे मराठी

उत्सव मराठी....साजरा मराठी

वेळ देताे मराठी...गणेशोत्सवासाठी

उत्सव मराठी.... जल्लोष मराठी

जाेशात मराठी...
गणेशोत्सव तरुणाईसाठी

© दीपक अहिरे, नाशिक

आतुरता बाप्पाच्या आगमनाची (Eagerness of Bappa's arrival)

आतुरता बाप्पाच्या आगमनाची...
Eagerness of Bappa's arrival


Eagerness of Bappa's arrival


आतुरता बाप्पाच्या
आगमनाची, 
आतुरता विद्येच्या
अधिपतीची, 

आतुरता सुखकर्ता
गणरायाची, 
आतुरता मंगलमूर्ती
भालचंद्राची, 

आतुरता गाैरीसुता
गजाननाची, 
आतुरता लंबाेदर
विघ्नहर्ताची, 

आतुरता वक्रतुंड 
माेरयाची, 
आतुरता सकलांच्या
प्रथमेशाची.... 

© दीपक अहिरे, नाशिक

Eagerness of Bappa's arrival

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

Telegram :

Facebook :

Instagram :

YouTube


Linkedin :

https://www.linkedin.com/in/deepak-ahire-2550a8248?utm_source=share&utm_campaign=share_via&utm_content=profile&utm_medium=android_app

Koo :
कू ऐप पर@दीपक1N673के दिलचस्प विचार सुनें https://www.kooapp.com/profile/दीपक1N673

Share chat :

Twitter :
@DeepakA86854129

Website :

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...