माझ्या नजरेत बघ...
look into my eyes
माझ्या नजरेत बघ
किती हा आत्मविश्वास,
जीवनभर साेडला नाही
मी या कामाचा ध्यास...
माझ्या नजरेत बघ
साेडत नाही प्रयत्न,
कष्टानेच कमवताे
हाच माझा जीवनयत्न...
माझ्या नजरेत बघ
भयंकर दुःख,यातना,
बनवले मी मनाला
सहनशीलता आहे ना...
माझ्या नजरेत बघ
कल्पनांचे विश्व अनेक,
साकार करेल एकला
मीच मात्र एकमेव...
© दीपक अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment