मज नव्हते ठाऊक
मज नव्हते ठाऊक
अचानक आले वादळ,
गेले छप्पर उडवून
राहिले आता कातळ..
मज नव्हते ठाऊक
हाेत्याचे नव्हते हाेईल,
वृध्दाअवस्थेत आता
काेण छाया देईल..
मज नव्हते ठाऊक
वारा घेईल गिरकी,
आता संपूर्ण आयुष्याने
घेतली माझी फिरकी..
मज नव्हते ठाऊक
वादळ हाेईल अस्मानी,
जीव तगून राहिला तर
करेल सर्व दमानी..
© दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा