गंध दरवळला...
The smell
गंध दरवळला,
नव्याने बहरला,
माझ्या मनात...
गंध दरवळला,
सुवास ताे आला,
पसरला दारात...
गंध दरवळला,
तुम्हांस वाटला,
पसरला जगात...
गंध दरवळला,
प्रत्येकजण माेहरला,
गंधाच्या प्रेमात...
गंध दरवळला,
ह्रदयात अडकला,
आहे ताे कणात...
गंध दरवळला,
देवादिकांना दिला,
ठेवला ताे पूजेत...
© दीपक अहिरे,
नाशिक
No comments:
Post a Comment