माणूस शाेधताे मी...
Searching human being
माणसांच्या गर्दीतला माणूस शाेधताे मी,
अशा खऱ्या माणसांची खूप आहे कमी...
माणसे येतात जन्माला, 'माणूसकी' नाही बनवताे,
नीतीमुल्ये तुडवताे पायदळी, सत्यही लाथाडताे...
माणसांच्या गर्दीतला माणूस शाेधताे मी,
असे जग व्हावे बेईमानी,माणूसपण शोधतो नभी...
स्वार्थाच्या पलिकडे पाहून उभा राहावा माणूस,
छलकपट नसे ह्दयी अंतरंगी, माणसी नसावा मागमूस...
© दीपक अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment