स्वप्नांमध्ये रचल्या ओळी
Lines composed in dreams
स्वप्नांमध्ये रचल्या ओळी
बनलाे मी महाराज,
बरेच चालवले मी
रयतेचे हे कामकाज...
स्वप्नांमध्ये रचल्या ओळी
रेखीव चालवला कारभार,
राज्यात होती सुखी माझ्या
प्रत्येक पुरूष आणि नार...
स्वप्नांमध्ये रचल्या ओळी
जगात प्रजा सुखी,
काेणी नव्हते रिकामटेकडे
कसली नव्हती बाकी...
स्वप्नांमध्ये रचल्या ओळी
मला खूप जनतेत मान,
हाेताे स्वप्नात रममाण
आवाजाने भंगले स्वप्नध्यान...
© दीपक अहिरे,
नाशिक
No comments:
Post a Comment